Satej Patil Prithviraj Chavan esakal
पश्चिम महाराष्ट्र

Loksabha Election : लोकसभा जवळ येताच पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेसकडून मोठा बदल; 'या' नेत्यांना दिली महत्वाची जबाबदारी

समन्वयक म्हणून अभय छाजेड व रणजित देशमुख यांची निवड

सकाळ डिजिटल टीम

काँग्रेस पक्षाकडून लोकसभा क्षेत्रनिहाय निरीक्षक व समन्वयकांची नियुक्ती करण्यात आली.

कोल्हापूर : लोकसभा क्षेत्रातील स्थानिक पातळीवरील राजकीय स्थितीची सविस्तर माहिती मिळावी याकरता काँग्रेस पक्षाकडून लोकसभा क्षेत्रनिहाय निरीक्षक व समन्वयकांची नियुक्ती करण्यात आली.

यामध्ये कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सतेज पाटील (Satej Patil) यांची रत्नागिरी व रायगड जिल्ह्याच्या निरीक्षकपदी निवड झाली. ही निवड मुंबई येथे प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी जाहीर केली.

निवड झालेले निरीक्षक व समन्वयक यांनी संबंधित जिल्हाध्यक्ष यांच्याबरोबर समन्वय साधून ७ ते १४ ऑगस्टदरम्यान निरीक्षकांच्या लोकसभा क्षेत्राचा विधानसभानिहाय दौरा व बैठकीचे नियोजन करायचे आहे.

लोकसभा क्षेत्रातील आजी-माजी खासदार, आमदार, प्रमुख नेते, प्रदेश पदाधिकारी, जिल्हा पदाधिकारी, ब्लॉक अध्यक्ष, आघाडी संघटना विभाग व सेलचे जिल्हा पदाधिकारी यांना बैठकीत निमंत्रित करून तसा अहवाल प्रदेश काँग्रेसला पाठवायचा आहे. तर कोल्हापूर व हातकणंगले मतदारसंघासाठी पृथ्वीराज चव्हाण यांची निरीक्षक म्हणून तर समन्वयक म्हणून अभय छाजेड व रणजित देशमुख यांची निवड करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anand Paranjpe Sharad Pawar Meeting : पक्ष प्रवेश एकनाथ शिंदेंच्या पक्षात, भेट घेतली शरद पवारांची; ठाणेकर आनंद परांजपेंच्या भेटीने चर्चांणा उधाण

Pune : शिवसेना ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखाचा भीषण अपघात, फॉर्च्युनरची रिक्षाला धडक; एकाचा मृत्यू, तिघे जखमी

'बालिका वधू'च्या गहनाने १० रुपयांच्या वस्तूपासून बनवला ब्रँड; कमावतेय कोट्यवधी, तुमच्याही घरात असेलच, काय आहे ती वस्तू?

NEET Paper Leak Case : नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयचा मोठा खुलासा; कोर्टात उघड झाले धक्कादायक तपशील, मनिषा मांढरेचा घटनाक्रम सांगितला

Night Heat Reason : सूर्य मावळला तरी घरात उकडतंय? रात्रीसुद्धा एवढं गरम का वाटतं? वैज्ञानिकांनी सांगितलं आश्चर्यकारक कारण

SCROLL FOR NEXT