setu-office
setu-office 
पश्चिम महाराष्ट्र

मंगळवेढा सेतू कार्यालयामध्ये नागरिकांची लूट

प्रशांत माळी

आंधळगाव - मंगळवेढा सेतू कार्यालयामध्ये नागरिकांची मोठया प्रमाणात अर्थिक लूट होत आसून, सेतू कार्यालयात विविध प्रकारच्या दाखल्यासाठी येणा-या नागरिकांना चक्क कोरी पावती देवून प्रमाणापेक्षा जास्त रक्कम त्याच्याकडून घेतली. जात असल्याची तक्रार भाजपा तालुका उपाध्यक्ष चंद्रकांत जाधव यांनी तहसीलदार यांच्याकडे निवेदनाव्दारे केली. 

मंगळवेढा सेतू कार्यालयात सध्या कर्मचाय्राची मनमानी कारभार सुरू असून विविध प्रकारचे दाखले काढण्यासाठी आलेल्या नागरिकांकडून सेतूची कोरी पावती देवून मनमानीपणे अर्जदाराकडून अवास्तव रक्कम घेतली जात आहे. नागरकांनी चैकशी केली असता त्यांना उद्वटपणे व उडवाउडवीची उत्तरे देवून आरेवारीची भाषा वापरली जाते.

चंद्रकात जाधव (रा.आंधळगाव, ता.मंगळवेढा) हे आपले विभक्त रेशनकार्ड करण्यासाठी सेतू कार्यालयात गेले असता. त्यांच्या 100 रूपये स्टॉम्पवर लक्ष्मण हणमंत बिराजदार या दुस-या व्यक्तीचा फोटो ऑपेडेट करून त्यांना देण्यात आला. या विषयी त्यांनी सेतू मध्ये जाब विचारला असता तेथिल कामगारांनी त्याच्यांशी हुज्जत घालून तुम्ही दुसरा स्टॉप घेवून या पुन्हा आॅपिडेट करून देतो पैसे माघारी मिळणार नाहीत किंवा को-या कागदावर तुम्ही ऑपिडेट करून घ्या. असा मोफतचा सल्ला देण्यात आला.  देशात, राज्यात सत्तेत असलेल्या पक्षाच्या तालुका उपाध्यक्षाशी सेतू कार्यालयातील कामगार अशी वागणुक मिळत असेल, तर सर्वसामान्य निरक्षर नागरिकांना किती त्रास देण्यात देत असेल. यांची चौकशी करून सेतू चालक व कामगारावर करवाई करण्यात यावी अशी मागणी चंद्रकांत जाधव यांनी केलेल्या तक्रारी अर्जद्वारे करण्यात आली आहे. यापुर्वी जादा रक्कम घेत असल्याची तक्रार नगराध्यक्ष अरूणा माळी यांनी केली होती.माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांनीही या प्रकारांची गंभीर दखल घेत तहसिलदार कार्यालयात आल्यावर जबाबदार अधिकाय्रानी तिथून काढता पाय घेतला.एवढा मोठा प्रकार होवून अधिकाय्राची हातमिळवणी असल्याने सर्वसामान्य नागरिकांची आर्थिक पिळवणूक होत असल्याने सर्वसामान्याना कोण वालीच नसल्याचा अनुभव येत आहे.याबाबत तहसीलदाराशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होवू शकला नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal: नायब राज्यपालांकडून केजरीवाल पुन्हा टार्गेट! खलिस्तान्यांकडून पैसा घेतल्याची केली NIAकडं तक्रार

Team India Jersey: T20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया दिसणार नव्या रुपात, नवी जर्सी झाली लाँच; पाहा Video

IPL 2024 MI vs SRH Live Score: हार्दिक पांड्या ऑन फायर! तिसरी विकेट घेत हैदराबादला दिला सातवा धक्का

Hires Women to Seduce Men: पबमध्ये पुरुषांना भुरळ घालण्यासाठी महिलांची नियुक्ती; पोलिसांच्या छाप्यात धक्कादायक प्रकार उघड

Sunita Williams News : अभिमानास्पद! सुनीता विल्यम्स पुन्हा घेणार अंतराळात झेप; सोबत नेणार भगवद्‍गीता अन् 'ही' खास मूर्ती

SCROLL FOR NEXT