kirana maal.jpg 
पश्चिम महाराष्ट्र

मॉल-मोठ्या दुकानातून ग्राहकांची लूट : शासनाने ठरवून दिलेले दर बासनात 

सकाळवृत्तसेवा

सांगली- "लॉक डाऊन' आणि संचारबंदीच्या काळात जीवनावश्‍यक वस्तूसह भाजीपाल्याचे दर वाढवून राजरोस विक्री सुरू आहे. शासनाने ठरवून दिलेल्या दरापेक्षा पाच ते चाळीस रूपये जादा दर लावून जीवनावश्‍यक वस्तू विकल्या जात आहेत. काही मॉलमध्ये तर जादा दर लिहून ग्राहकांची दिवसाढवळ्या लूट केली जात आहे. मॉलसह मोठ्या दुकानात हीच परिस्थिती आहे. 


"कोरोना' चा प्रसार रोखण्यासाठी लॉक डाऊन आणि संचारबंदी केली आहे. अत्यावश्‍यक सेवांना त्यातून वगळण्यात आले आहे. त्यामुळे किराणा दुकाने, भाजीपाला विक्री, दूध, मेडिकल दुकाने, दवाखाने आदी अत्यावश्‍यक सेवा सुरू आहेत. मात्र लॉकडाऊन चा फायदा घेण्यासाठी नफेखोर सरसावले आहेत. गेले काही दिवस जीवनावश्‍यक वस्तूंची राजरोस जादा दराने विक्री केली जात आहे. ग्राहकांनी विचारणा केली तर मालाचा तुटवडा असल्याचे कारण सांगितले जाते. ग्राहकांपुढे पर्याय नसल्यामुळे ते जादा दराने खरेदी करत आहेत. 
मार्केट यार्ड आणि गणपती पेठेत सध्या होलसेल दुकाने सुरू आहेत.

परराज्यातून येणारा माल वगळता अन्य माल उपलब्ध होतो. किरकोळ दुकानदार तेथून माल खरेदी करून स्वत:चे जादा दर लावून ग्राहकांना विक्री करत आहेत. किरकोळ दुकानदारच नव्हे तर मोठ्या मॉलमधूनही ग्राहकांची लूट केली जात आहे. मॉलमध्ये तर काही मालांच्या अव्वाच्या सव्वा किंमती लावून त्याची जाहिरातबाजी केली जात आहे. शासनाने ठरवून दिलेल्या दरापेक्षा चाळीस रूपये जास्त दर दाखवून त्यात ग्राहकांना पाच-दहा रूपयाची सवलत दिल्याचे आमिष दाखवले जात आहे. आपत्तीच्या काळात जादा दराने जीवनावश्‍यक वस्तूंची विक्री केल्यास कारवाई करण्याचा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे. मात्र अद्याप अशी ठोस कारवाई झाल्याचे दिसून आले नाही. त्यामुळे संबंधित मॉल, मोठे दुकानदार यांचे फावले आहे. 
 

मॉलमध्ये यात होते लूट- 
साधा तांदूळ 53, ज्वारी- 75, बाजरी 46, साखर 43, मैदा 43, पोहे 57, तूरडाळ 118, मूग डाळ 154, सूर्यफूल तेल 149 असे जादार दर लावून मॉलमध्ये विक्री सुरू आहे. 
 

शासनाने ठरवलेले दर- 

  • गहू- 26 ते 32 रूपये 
  • तांदूळ (साधा) 28 ते 34 रूपये 
  • ज्वारी- 22 ते 35 रूपये 
  • बाजरी- 25 ते 28 रूपये 
  • साखर- 34 ते 37 रूपये 
  • शेंगदाणा- 110 ते 115 रूपये 
  • मैदा- 30 ते 32 रूपये 
  • पोहे- 40 ते 45 रूपये 
  • तूरडाळ- 90 ते 100 रूपये 
  • उडीद डाळ- 100 ते 120 रूपये 
  • हरभरा डाळ- 65 ते 70 रूपये 
  • मूग डाळ- 120 ते 130 रूपये 
  • शेंगदाणा तेल- 140 रूपये 
  • करडई तेल- 130 ते 140 रूपये 
  • सूर्यफूल तेल- 100 ते 110 रूपये 
  • सरकी तेल- 95 ते 105 रूपये. 
     

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Heavy Rain: पुण्यात मुसळधार पाऊस! रस्त्यांना नद्यांचं स्वरुप, वाहतूक ठप्प; पुणेकर खोळंबले

Hyderabad Gazette : मराठा समाजाला दिलासा! ‘हैदराबाद गॅझेट’ विरोधातील याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली

Girl Period Problems: बाहेरून मुलगी, आतून मुलगा? १७ वर्षांची झाली तरी पीरियड्स आले नाही म्हणून तपासणी केली अन् सत्य आलं समोर

Education News : टीईटी परीक्षा उत्तीर्ण न झाल्यास नोकरी सोडावी लागणार; शिक्षकांमध्ये भीतीचे वातावरण

Latest Maharashtra News Updates : अक्कलकोट तालुक्यात ओला दुष्काळाची स्थिती – जयकुमार गोरे

SCROLL FOR NEXT