electricity problem 
पश्चिम महाराष्ट्र

शेतात रात्रीस "खेळ' चाले... 

सकाळ वृत्तसेवा

श्रीरामपूर ः तालुक्‍यातील ग्रामीण भागात सध्या विजेचा लपंडाव सुरू आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे. अवघ्या पाच मिनिटांत ट्रीप होणाऱ्या मोटारींमुळे आता शेतकरी त्रासले आहेत. पिकांना पाणी देण्यात विजेचा अडथळा येत आहे. त्यात दिवसा नियमित वीजपुरवठा होत नसल्यामुळे शेतकऱ्यांना रात्री जागरण करून पिकांना पाणी देण्यासाठी जावे लागते. 
सध्या कडाक्‍याची थंडी जाणवत असताना, रात्री कुडकुडत अनेक शेतकरी पिकांना पाणी देत आहेत. यंदा विहिरींना चांगला पाणीसाठा आहे. मात्र, नियमित वीजपुरवठा होत नसल्याने, या पाण्याचाही काहीच उपयोग घेता नसल्याची खंत शेतकरी व्यक्त करीत आहेत. काही शेतकऱ्यांच्या विहिरी शेतापासून दूर आहेत. त्यात पाच-पाच मिनिटांनी वीज गायब होते. त्यामुळे वीजपंप सुरू करण्यासाठी या शेतकऱ्यांना मोठी पायपीट करावी लागते. त्यामुळे काही शेतकऱ्यांना थेट विहिरीजवळ पंप सुरू करण्यासाठी एकाची नेमणूक करावी लागत आहे.

 नवीन समस्या
शेतकऱ्यांसाठी सरकारने मोफत नियमित पूर्ण वेळ वीजपुरवठा द्यावा, अशी मागणी शेतकरी संघटनेने केली आहे. शेतकऱ्यांना नियमित वीजपुरवठा होत नसल्यामुळे, अनेकांनी वीज कंपनीच्या कारभारावर नाराजी दर्शविली आहे. तसेच, ग्रामीण भागातील विजेच्या रोहित्रावर अधिक भार असल्यामुळे रोज नवीन समस्या उद्‌भवत असल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली आहे. 

शेतकऱ्यांची डोकेदुखी

विजेच्या लपंडावामुळे शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढली असून, दिवसभरात आठ ते दहा वेळा वीज गायब होते. दिवसभरात फक्त चार तास वीज मिळते. वीज गेल्यावर अर्धा तास पंप बंद होतात. सध्या पाण्याचे प्रमाण चांगले असल्यामुळे, सर्वांचेच पंप सुरू आहेत. दिवसा भरणे होत नसल्यामुळे रात्री जागरण करून थंडीत पाणी भरण्यावर शेतकरी भर देतात. सरकारने शेतकऱ्यांच्या हिताचे धोरण राबवावे. - सोन्याबापू शिंदे, सरपंच, नाऊर (श्रीरामपूर) 

400 मेगावॉट वीजपुरवठा

फीडरवरील वीजभाराची क्षमता वाढल्यामुळे वीज ट्रीप होते. सध्या तालुक्‍यात 400 मेगावॉट वीजपुरवठा होतो. परंतु एकाच वेळी वीजपंप सुरू होतात. त्यामुळे अनावश्‍यक भार सहन करावा लागत आहे. हा भार कमी करण्यासाठी वीजचोरी करणाऱ्यांवर तातडीने कारवाई केली जाणार आहे. - शरद बंड, कार्यकारी अभियंता, महावितरण, श्रीरामपूर 


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शेवटच्या क्षणापर्यंत गुप्तता; ऑपरेशन सिंदूरचा आदेश चिठ्ठीतून पोहोचला, नेमकं काय घडलं होतं? धक्कादायक खुलासा

AUS vs BAN: ऑसी दिग्गजांचा पारा चढला! बांगलादेशविरुद्ध लाजिरवाण्या पराभवानंतर पाँटिंगसह माजी खेळाडूंनी ऑस्ट्रेलियन संघाला सुनावलं

Police Honour: उपमहानिरीक्षक विजयकुमार मगर यांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी राष्ट्रपती पोलिस पदक

Health Schemes: महात्मा फुले व पंतप्रधान जन आरोग्य योजनेंतर्गत हृदय व कर्करोग उपचारांसाठी रुबी हॉल क्लिनिकशी राज्य सरकारचा करार

Marathi News Live Updates : नाशिकरोड भागात असलेल्या गोसावी वाडी चौफुलीवर गोळीबार

SCROLL FOR NEXT