पश्चिम महाराष्ट्र

Video : मुंबईनंतर 'यांना'ही हवी नाईट लाईफ

सकाळ वृत्तसेवा

महाबळेश्वर : महाबळेश्वरचे वेगळेपण आपण सर्वांनी जपले पाहिजे. पर्यटकांना सुविधा देण्यासाठी प्रयत्नशिल राहू अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. 
 
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे महाबळेश्वर येथे आले आहेत. त्यांनी आज (शनिवार) महाराष्ट्र राज्य शासन व रेड क्रॉस सोसायटी संचालित बेल एअर हॉस्पिटलला भेट दिली. तेथे सर्व अधिकाऱ्यांसमोर येथील ग्रामीण रुग्णालयाची चित्रफीत दाखवून माहिती सादर करण्यात आली. मुख्यमंत्री ठाकरे यांनी स्वत: हॉस्पिटलची पाहणी केली. त्यानंतर राजभवन येथे जिल्हाधिकारी शेखर सिंग यांनी सातारा जिल्ह्यातील विविध विकासकामांबाबतचे सादरीकरण केले. वाई पोलादपूर रस्ता, वेण्णालेक बाह्य मार्ग, डि.पी निश्चित नाही, ब वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा मिळविण्यासाठी प्रयत्न, वेण्णा लेक सुशोभीकरण, पालिका हद्दीमधील सर्व पॉईंट विकसित करण्यासाठी निधी, रस्ते व फुटपाथ विकसीत करणे, विद्युत खांब, सुभाषचंद्र बाेस व छत्रपती शिवाजी महाराज चौक विकसित करणे असे विविध प्रस्ताव महाबळेश्वर पालिकेने सादर केले.

नक्की वाचा - Budget 2020 : वास्तवाचे भान हरवलेला आणि केवळ स्वप्नांच्या दुनियेत रमवणारा अर्थसंकल्प - उद्धव ठाकरे

महाबळेश्वर येथे नाईट लाईफच्या धर्तीवर ११ ऐवजी एकपर्यंत वेळ दिला जावा अशीही मागणी करण्यात आली. यावेळी उपस्थितांनी स्ट्रॉबेरीबाबत चर्चा, स्टॉबेरी लागवड क्षेत्र वाढविणे, स्टॉबेरी संशोधन केंद्राची बाळासाहेब भिलारे यांनी मागणी केली. तसेच रोपे आयात करण्यापेक्षा इथेच तयार करुन वितरीत करता येऊ शकतील असेही नमूद केले.

हेही वाचा -    उद्धव ठाकरेंचे आगमनाने महाबळेश्वरकरांच्या जून्या आठवणी ताज्या

यावेळी महाबळेश्वरच्या घरपट्टी वाढीबाबत, किल्ले प्रतापगड संवर्धनाबाबत निवेदन देण्यात आले. या बैठकीस पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई, उद्याेगमंत्री सुभाष देसाई, अजय चौधरी, शांती कन्स्ट्रक्शनचे डी.एल.शिंदे, जयसिंग मरिवाला, फादर टॉमी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत, सिव्हील सर्जन अमोल गडीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, प्रांताधिकारी संगिता राजापुरकर - चौगुले, तहसिलदार सुशमा पाटील -चौधरी, मुख्याधिकारी अमिता दगडे - पाटील उपस्थित हाेते.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Phaltan Election Result: फलटणला रामराजेंचा ‘करेक्‍ट कार्यक्रम’; तीस वर्षांची एकहाती सत्ता उलथवत रणजितसिंह ठरले किंगमेकर!

Transformer Theft: लासगाव येथील विज वितरण कंपनीच्या सबस्टेशनवर चोरी

Malkapur Municipal Result: मलकापुरात पहिल्यांदाच कमळ फुलले; मनोहर शिंदेच निर्णायक, नगराध्यक्षपदासह मिळवल्या १९ जागा..

नवऱ्याला ८० हजार पगार, तरीही हुंड्यात मागतोय म्हैस; पत्नी तीन वर्षांपासून माहेरी, पोलिसांत जात नवऱ्याचे काळे कारनामे केले उघड

Kolhapur Election : कोल्हापूर महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू; २० प्रभागांसाठी ५८४ मतदान केंद्रांची अधिकृत घोषणा

SCROLL FOR NEXT