Mahad Vikas Aghadi Should Give Chance in Madha lok sabha election Ignoring Dynasty Caste Money Issues Prafulla Kadam Sakal
पश्चिम महाराष्ट्र

Sangola News : घराणेशाही, जात, पैसा मुद्द्यांना बाजूला सारून महाविकास आघाडीने माढ्यात संधी द्यावी - प्रफुल्ल कदम

स्वर्गीय गणपतराव देशमुख यांच्या विचारांचा आणि कार्याचा खरा मीच वारसदार आहे. केवळ घराणेशाही, जात, पैसा या गोष्टीकडे न पाहता चळवळीची कार्य करणाऱ्याला प्रामाणिक नेतृत्वाला संधी द्यावी.

दत्तात्रय खंडागळे :

सांगोला : स्वर्गीय गणपतराव देशमुख यांच्या विचारांचा आणि कार्याचा खरा मीच वारसदार आहे. केवळ घराणेशाही, जात, पैसा या गोष्टीकडे न पाहता चळवळीची कार्य करणाऱ्याला प्रामाणिक नेतृत्वाला संधी द्यावी. अन्यथा शरद पवार साहेबांनी स्वतः माढ्यात लढावे असे मत किसान आर्मी व वॉटर आर्मीचे संस्थापक प्रफुल कदम यांनी केले आहे.

सांगोला येथे पत्रकार परिषद घेऊन प्रफुल्ल कदम यांनी माढा लोकसभा निवडणूक लढविण्याचे संकेत दिले आहेत. यावेळी बोलताना प्रफुल कदम म्हणाले की, गेली दहा वर्षे केवळ माढा लोकसभा मतदारसंघातच नव्हे तर इतर भागातही शेती प्रश्नाकडे कोणीही लक्ष देत नाही.

टाटा कोयनासारखे पाण्याचे प्रश्न, विठ्ठल रुक्मिणी एअरपोर्टचा प्रश्न सोडविण्यासाठी खंबीर नेतृत्वाची गरज आहे. घराणेशाही, जात, पैसा या सगळ्या चुकीच्या मुद्द्यांना बाजूला सारून केवळ शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर ही निवडणूक लढवली गेली पाहिजे.

टेंभू, म्हैसाळ, जिरे कठापूर, उरमोडी यासारखे अनेक उपसा सिंचन प्रकल्पांना आज मूळ तरतुदीपेक्षा जादा पाण्याची तरतूद माझ्या अभ्यास अहवालामुळे, संघर्षामुळे झाली आहे. मी या मतदारसंघाचा खासदार झालो तर मतदारसंघ शंभर टक्के सिंचनाखाली निश्चितपणे येईल.

टाटा कोयनाचे 116 टीएमसी पाणी सोलापूर, सातारा, सांगली यादी जिल्ह्यांना आणणे, आमदार, खासदाराप्रमाणे ग्रामपंचायत सदस्य व नगरसेवकांना स्वतंत्र वार्ड विकास निधी देणे, पंढरपूर भागात विठ्ठल रुक्मिणी आंतरराष्ट्रीय दर्जाचे एअरपोर्ट उभारणे, गाव तिथे कृषी कार्यालय उभारणे,

वेड्या बाभळीपासून वीज निर्मिती प्रकल्प राबवणे, आरबीआयचे निर्देश व फेमा कायद्याची उल्लंघन करून लोकांची फसवणूक करून सोलापूर, सातारा, सांगलीसह राज्यभर बेकायदेशीर फॉरेक्स ट्रेडिंगवर कारवाई करणे, लॉटरीप्रमाणे मटका व्यवसायात सुधारणा करून त्याला शासन मान्यता देणे,

जमिनीचे वाद कायमस्वरूपी बंद करण्यासाठी देशातील पहिल्या लँड अँड स्टडी मॅनेजमेंट कॉलेजला मान्यता देणे, सांगोला ते पुणे - मुंबई जलद सेवा (माणदेश एक्सप्रेस) सुरू करणे अशा अनेक विषयांचे महत्त्वपूर्ण अभ्यासपूर्ण मागणीचे प्रस्ताव त्यांनी राज्य शासनाकडे सादर केल्याचे सांगितले.

21 राजकीय प्रश्नावलीसह नागरिकांनाच विचारले प्रश्न -

किसान व वॉटर आर्मी संघटनेचे संस्थापक प्रफुल कदम यांनी आपल्याला माढा लोकसभा लढविण्याचे महाविकास आघाडीने संधी द्यावी असे आवाहन केले आहे. यासाठी त्यांनी 21 प्रश्नांची राजकीय प्रश्नावली तयार केली असून यामध्ये अनेक प्रश्न तयार करून त्यांनी केलेल्या कामाचा पाढाच वाचला आहे. नागरिकांनी या राजकीय प्रश्नावलीच्या आधारे आपला उमेदवार ठरवावा असे आवाहन प्रफुल कदम यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: हा व्हिडिओ खास आहे... नातं रक्ताचं नव्हतं, पण... जंगलात वाजली शहनाई, CRPF जवानांनी निभावलं वधूच्या भावाचं कर्तव्य

Ashadhi Wari 2025 : बंधुभेटीच्या सोहळ्याने अवघे वैष्णव भावुक; संत ज्ञानेश्वर महाराज-संत सोपानदेवांच्या भेटीचा सोहळा अनुभवण्यासाठी गर्दी

Satara Crime : धोमच्या चोरीप्रकरणी एकास अटक; नवनाथ दत्त मंदिरातील दानपेटी फोडून रोख रक्कम लंपास

Public Health Corruption: आरोग्य खात्यात साहित्य खरेदीत गैरव्यवहार; आमदार डाॅ. राहुल पाटील यांचा विधानसभेमध्ये आरोप

Latest Maharashtra News Updates : अमित शहांचा आज पुणे दौरा, वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT