पश्चिम महाराष्ट्र

Good News - महालक्ष्मी एक्स्प्रेस 1 जुलै; नागपूर 2 पासून धावणार

रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांच्या सोयीसाठी रद्द केलेल्या गाड्या पूर्ववत वेळेत सोडण्याचे नियोजन

सकाळ डिजिटल टीम

मिरज : कोरोना संसर्गाच्या (corona) दुसऱ्या लाटेत अल्प प्रवाशांअभावी रद्द केलेली कोल्हापूर-मुंबई (mahalxmi express) महालक्ष्मी एक्स्प्रेस, कोल्हापूर-नागपूर (kolhapur -nagpur express) एक्स्प्रेस गाड्यांना रेल्वे प्रशासनाचा हिरवा झेंडा दाखविण्यात आला आहे, तर कोयना एक्स्प्रेस गाडी गदग-कोल्हापूर-मुंबई या पद्धतीने सोडण्याच्या विचाराधीन रेल्वे प्रशासन आहे. सध्या राज्यभरात कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव दिवसेंदिवस घटत आहे. रुग्णसंख्या कमी होत आहे. यामुळे रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांच्या सोयीसाठी रद्द केलेल्या गाड्या पूर्ववत वेळेत सो़डण्याचे नियोजन आहे. याच अनुषंगाने महालक्ष्मी आणि नागपूर एक्स्प्रेस अनुक्रमे १ आणि २ जुलैपासून धावणार आहेत.

सध्या मिरज (miraj) स्थानकातून गोवा निजामुद्दीन, कोल्हापूर-गोंदिया, हुबळी-दादर, पुद्दुचेरी-दादर, बंगळूर-जोधपूर, यशवंतपूर-निजामुद्दीन, मिरज-बंगळुरू राणी चन्नम्मा, कोल्हापूर-तिरुपती एक्स्प्रेस धावत आहेत, तर कोल्हापूर-नागपूर, कोल्हापूर-मुंबई(कोयना), कोल्हापूर-महालक्ष्मी गाड्या दुसऱ्या लाटेत रेल्वे प्रशासनाकडून अल्प प्रतिसादाचे कारण देऊन तब्बल महिनाभर बंद होत्या, मात्र जुलै महिन्यापासून या गाड्या पुन्हा पूर्ववत होत आहेत.

कोल्हापूर-नागपूर २ जुलैपासून पूर्वीच्या वेळेत म्हणजे आठवड्याच्या सोमवारी आणि शुक्रवारी जुन्या वेळेनुसार धावेल. तिच्या थांब्य़ात कोणतेच बदल करण्यात आले नाहीत, तर पुणे, मुंबईकरांची लाईफ लाईन असलेली कोल्हापूर-महालक्ष्मी एक्स्प्रेस १ जुलैपासून सुरू होईल, या दोन्ही गाड्यांचे तिकीट ऑनलाईन आणि रेल्वे स्थानाकातील बुकिंग खिडकीवर उपलब्ध करण्यात आले आहे.

कोल्हापूर गदग गाडीचे नियोजन

कोल्हापूर-मुंबई (कोयना) या गाडीचा गदग-कोल्हापूर-मुंबई या पद्धतीने विस्तार करण्याचे नियोजन रेल्वे प्रशासनाकडून सुरू आहे. ही गाडी रात्री नऊ वाजता कोल्हापूर येथे येते तिचा मुक्काम कोल्हापूर येथे असतो, मात्र कोल्हापूर गदग गाडीचे नियोजन झाल्यास ही गाडी दोन तासांच्या विश्रांतीनंतर पुन्हा मिरजमार्गे गदगकडे रवाना करण्याचे नियोजन सुरू आहे, मात्र याला अद्यापही रेल्वे प्रशासनाकडून अधिकृत दुजोरा दिला गेला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT