पश्चिम महाराष्ट्र

महाराष्ट्रातून कर्नाटकात जाताना नाक्यावर टेस्टिंग; 5 जण आढळले पॉझिटिव्ह

शहर व तालुक्यातील ८ चेकपोस्टवर महाराष्ट्रातून येणाऱ्या प्रवाशांची कोरोना तपासणी करण्यात येत आहे.

अमृत वेताळ

बेळगाव : शेजारील महाराष्ट्र राज्यात कोरोनाचा (covid-19 positive) संसर्ग पुन्हा एकदा वाढत असल्याने सीमेवरील बेळगावात (belgaum) कठोर निर्बंध हाती घेण्यात आले आहेत. शहरात प्रवेश करणारे सीमावर्ती भागातील सर्व रस्ते सील करण्यात आले असून त्याठिकाणी पोलिसांनी २४ तास बंदोबस्त ठेवला आहे. (police) शहर व तालुक्यातील ८ चेकपोस्टवर महाराष्ट्रातून (maharashtra) येणाऱ्या प्रवाशांची कोरोना तपासणी सुरु आहे. आतापर्यंत 5 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.

महाराष्ट्र आणि केरळ राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने बेळगावसह आठ जिल्ह्यात विकेंड कर्फ्यू (weekend curfew) लागू करण्यात आला आहे. विशेष करून सीमावर्ती भागात विशेष लक्ष देण्याची सूचना करण्यात आली आहे. त्यामुळे बेळगाव जिल्ह्यात एकूण २३ ठिकाणी चेकपोस्ट सुरू करण्यात आले आहेत. बेळगाव तालुक्यातील बेक्कीनकेरे, राककोप्प, शिनोळी, बाची, मध्यवर्ती बसस्थानक, रेल्वे स्थानक सांबरा विमानतळ आणि काकती महामार्ग अशा आठ चेक पोस्टवर बाहेरून येणाऱ्यांची तपासणी केली जात आहे.

महाराष्ट्र आणि गोव्यातून (goa) येणाऱ्यावर नजर ठेवण्यात आली आहे. आर्टिपीसीआर निगेटिव्ह (RT-PCR negative) अहवाल नसलेल्यांना पोलिस माघारी पाठवत आहेत. त्याचबरोबर आरोग्य खात्याच्यावतीने तेथेच कोरोना टेस्ट करण्यात येत आहे. टेस्ट करताना महाराष्ट्रातून आलेले पाच प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले आहेत. या पार्श्‍वभूमीवर स्वतः पोलिस उपायुक्त डॉ. विक्रम आमटे यांनी बाची चेक पोस्टला भेट देऊन तेथील परिस्थितीची पाहणी केली. या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या वाहन चालकांची केवळ आर्टिपीसीआर रिपोर्ट असलेल्यांनाच प्रवेश देण्यात येत आहे.

यावेळी डीसीपी डॉ. विक्रम आमटे म्हणाले, कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन, पोलिसखात्याच्यावतीने सरकारच्या आदेशाचे काटेकोरपणे पालन करण्यात येत आहे. नागरिकांनी कर्नाटकात प्रवेश करायचा असल्यास त्यांच्याकडे ७२ तासांच्या आतील आर्टिपीसीआर निगेटिव्ह रिपोर्ट असणे जरुरीचे आहे. विकेंड कर्फ्यू आणि नाईट कर्फ्यू काळात विनाकारण फिरणार्‍यांची वाहने जप्त केली जात आहेत. बेळगाव शहर आणि सीमाभागात पोलिसांकडून विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. करोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी आरोग्य खात्यासह इतरांकडून संयुक्तरित्या प्रयत्न केले जात आहेत. नागरिकांनी सरकार आणि अधिकाऱ्यांच्या प्रयत्नाला सहकार्य करणे आवश्यक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pandharpur Darshan: पंढरपुरात विठ्ठल दर्शनासाठी पैसे घेतल्याचा धक्कादायक प्रकार; ऑडिओ क्लिप व्हायरल, अधिक मास सुरू होताच पंढरपुरात खळबळ..

Mumbai Goa Highway Toll Collection : मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम अपूर्ण, टोल वसुली सुरू; नितीन गडकरींच्या आवाहनाला केराची टोपली

लाईव्ह सामन्यात रवी शास्त्रींची मोठी चूक! नाणेफेकीच्या वेळी शुभमन गिलला काय बोलले?

Child Rescue Operation: पंजाबमध्ये कूपनलिकेतून नऊ तासांनंतर मुलगा बाहेर; घराबाहेर खेळताना पडला होता खड्ड्यात, होशियारपूरमध्ये थरारक रेस्क्यू ऑपरेशन!

Rajdhani Express धावत्या राजधानी एक्सप्रेसमध्ये आगीचा भडका, एसी कोच जळून खाक

SCROLL FOR NEXT