Chandrakant Jadhav vs Rajesh Kshirsagar
Chandrakant Jadhav vs Rajesh Kshirsagar 
पश्चिम महाराष्ट्र

कोल्हापूर उत्तर : चाैदा दिवसांच्या बॅटिंगने चंद्रकांत जाधव मॅन आॅफ द मॅच | Election Results 2019  

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर - काँग्रेसचे उमेदवार चंद्रकांत जाधव यांनी केवळ 14 दिवसांत बॅटिंग करून शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांची हॅट्ट्रिक रोखली. कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघ क्रमांक 276 मध्ये जाधव हे 15 हजार 199 मतांनी विजयी झाले. त्यांना 91 हजार 53 मते मिळाली. यामध्ये कसबा बावड्यातील मतांचा त्यांना आधार ठरला.

विद्यमान आमदार क्षीरसागर यांना 75 हजार 854 इतकी मते मिळाली. 16 फेऱ्यांअखेर 3 हजार 39 नोटा मतदान झाले आहे. 118 मतदान अवैध ठरले आहे. दुपारी 3 वाजून 23 मिनिटांनी हा निकाल अधिकृत जाहीर करण्यात आला. 

कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात दोन लाख 86 हजार 169 इतके मतदार होते. पैकी एक लाख 72 हजार 168 इतके मतदान झाले होते. एका जागेसाठी आठ उमेदवार रिंगणात होते. पैकी शिवसेनेचे विद्यमान आमदार राजेश क्षीरसागर आणि कॉंग्रेस आघाडीचे उमेदवार उद्योजक चंद्रकांत जाधव यांच्यात चुरशीची लढत होती. 3 ऑक्‍टोबरला जाधव यांना कॉंग्रेस पक्षाचा "ए' आणि "बी' फॉर्म मिळाला. त्यांनी 4 ऑक्‍टोबरला कार्यकर्त्यांशी चर्चा करून उमेदवारी निश्‍चित केली.

5 ऑक्‍टोबरला उमेदवारी अर्ज दाखल केला. तेव्हापासून ते 19 ऑक्‍टोबरपर्यंत केवळ 14 दिवसांत त्यांनी मतदारांसमोर जाऊन विद्यमान आमदारांच्या विरोधातील मुद्दे ठळकपणे मांडले आणि त्यांची हॅट्ट्रिक रोखण्याचा प्रयत्न केला. बेरोजगारांच्या हाताला काम देणे, पर्यटन, उद्योग, विकास करण्याच्या मुद्यांवर त्यांनी प्रचार केला होता. विजय अपेक्षित असल्याची प्रतिक्रिया त्यांनी विजयी झाल्यानंतर दिली. तसेच माझ्या विजयाचे शिल्पकार जनताच असल्याचेही त्यांनी "सकाळ'शी बोलताना स्पष्ट केले. 

20 टेबलवर एकाच वेळी मोजणी झाली. पहिल्याच फेरीत जाधव यांनी साडेचार हजार मतांनी आघाडी घेतली. साधरण प्रत्येक फेरीतील मते मोजण्यासाठी 20-25 मिनिटांचा कालावधी लागत होता. साधारण नऊच्या सुमारास एकाएका फेरीचे निकाल जाहीर होऊ लागले. दुसऱ्या फेरीअखेर तब्बल दुप्पट मतांचा फरक दोघांमध्ये दिसून आला.

जाधव यांना 16 हजार 368 मते मिळाली. त्यानंतर तिसऱ्या फेरीत क्षीरसागर यांना सव्वाशे मते अधिक मिळाली. त्यानंतर पुन्हा या आकडेवारीत बदल होईल, अशी आशा मतमोजणी केंद्रावर असलेल्या शिवसैनिकांना होती. मात्र, चौथ्या फेरीतच ही आकडेवारी पुन्हा जाधव यांच्याबाजूने झुकली. त्यामुळे शिवसैनिक पुन्हा नाराज झाले. 

साधारण सहाव्या-सातव्या फेरीपर्यंत शिवसैनिकांनी आपण विजयी होईल, अशी अपेक्षा ठेवली होती. मात्र, पुढे शहरातील प्रत्येक भागातील मोजणी प्रक्रिया पूर्ण होत असतानाच 60-40, 70-30 अशीच आकडेवारी पुढे येऊ लागली. क्षीरसागर यांच्या राहत्या घराच्या परिसरात त्यांना चांगले मतदान मिळाले. तसेच मंगळवार पेठेतील काही भागात सुद्धा त्यांना मते मिळाली.

मात्र, इतर ठिकाणी राजारामपुरीसह कदमवाडी, बावडा, जवाहरनगर, शास्त्रीनगर, यादवनगर या परिसरात 60-40 अशी स्थिती राहिली. अखेर आपण विजयी होणार नसल्याचा अंदाज घेत शिवसैनिकांनी मतमोजणी केंद्रातून काढता पाय घेतला. दुपारी बाराच्या सुमारास मतमोजणीचे 80 टक्के काम पूर्ण झाले होते. याचवेळी जाधव यांचा विजय निश्‍चित होता. त्यामुळे राजेश लाटकर, माजी उपमहापौर विक्रम जरग, महेश जाधव आकड्यांची जुळवाजुळव करण्यात पुढे होते. एक एक फेरीची मोजणी होत गेली आणि अखेर 16 व्या फेरीपर्यंत जाधव यांची आघाडी कायम राहिली. 

दुपारी दोननंतर व्हीव्हीपॅटच्या पाच यंत्रातील मतमोजणी करण्यात आली. त्यानंतर 16व्या फेरीचा निकाल जाहीर करून कॉंग्रेसचे चंद्रकांत जाधव विजयी झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी श्रावण क्षीरसागर यांनी जाहीर केले. 

उमेदवारांना मिळालेली मते : 

अजय प्रकाश कुरणे ः बहुजन समाज पार्टी ः 842 
चंद्रकांत पंडित जाधव ः राष्ट्रीय कॉंग्रेस ः 91 हजार 053 
राजेश विनायक क्षीरसागर ः शिवसेना ः 75 हजार 854 
सतीशचंद्र बाळकृष्ण कांबळे ः भारतीय कम्युनिस्ट पक्ष ः 1 हजार 483 
राहुल अनादपिंड राजहंस ः वंचित बहुजन आघाडी ः 1 हजार 154 
अमित अरविंद अतिग्रे ः अपक्ष ः 421 
सलीम नुरमहम्मद बागवान ः अपक्ष ः 342 
संभाजी ऊर्फ बंडा साळुंखे ः अपक्ष ः 1 हजार 19 

जुलमी राजकारण चालू होते, ते जनतेने एकवटून उधळून लावले. विजयाने जनता माझ्या बरोबर आहे, हे दाखवून दिले आहे. आणि तीच माझ्या विजयाची शिल्पकार आहे. उद्योग, पर्यटन, क्रीडा अशा वेगवेगळ्या माध्यमातून विकास करणार आहोत. सध्या बंद असलेल्या आणि नव्या स्त्रोतांच्या माध्यमातून रोजगार निर्मिती मोठ्या प्रमाणात करणार आहे. उद्योजक, व्यापार, महापुरातील पुनर्वसनाचे प्रश्‍न आहेत. ते मी ताकदीने सोडवणार आहे. अर्थमंत्र्यांना भेटून याबाबत सोल्युशन काढणार आहे. निवडून येणार याची खात्री होती म्हणूनच कॉंग्रेसने उमेदवारी दिली. 
- चंद्रकांत जाधव 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

Rohit Sharma Rinku Singh : पत्रकार परिषदेनंतर रोहित रिंकूला भेटला; केकेआरनं केलं ट्विट

SRH vs RR Live IPL 2024 : दोन धक्क्यानंतर यशस्वी, रियाननं डाव सावरला; राजस्थान 10 षटकात शतक पार

Akola News : अनुपजी..भाजपचे पैसे पोहचले नाही; व्हीडिओ व्हायरल, बार्शिटाकळीत गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT