पश्चिम महाराष्ट्र

कोल्हापूर दक्षिण : ऋतुराज पाटील आघाडीवर | Election Results 2019

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर - येथील दक्षिण मतदार संघात चाैथ्या फेरी अखेर ऋतुराज पाटील यांनी १० हजार 923 मतांनी आघाडी घेतली आहे. सलग चारही फेऱ्यात त्यांनी आघाडी कायम ठेवली आहे.

चाैथ्या फेरीत भाजपचे उमेदवार अमल महाडिक यांना 5458 मते मिळाली तर ऋतुराज पाटील (काँगेस) यांना  7613 मते मिळाली. 

दक्षिण मतदारसंघात सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरूवात झाली.पहिल्या फेरीमध्ये काँग्रेसचे ऋतुराज पाटील यांना आघाडी मिळाली आहे. 

दरम्यान या मतदारसंघात एकूण १७ फेऱ्या होणार आहेत. पहिल्या फेरीत भाजपचे अमल महाडिक यांना 6040 मते तर काँग्रेसचे ऋतुराज पाटील यांना 9842 मते मिळाली आहेत. 

कोल्हापूर दक्षिणमध्ये पारंपरिक विरोधकांच्या लढतीतील प्रचारात विकासापेक्षा वैयक्तिक टीकाटिप्पणीवर भर दिला गेला. आमदार अमल महाडिक यांच्या विरोधात थेट बोलण्याचा मुद्दा नसल्याने त्यांचे वडील माजी आमदार महादेवराव महाडिक, चुलत भाऊ व माजी खासदार धनंजय महाडिक हेच टीकेचे लक्ष्य झाले. महाडिक यांच्याकडूनही काँग्रेसचे उमेदवार ऋतुराज यांच्यावर टीका करण्यासाठी विषय नसल्याने त्यांनीही त्यांचे चुलते आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनाच ‘टार्गेट’ केले गेले.

लोकसभा निवडणुकीत पाटील यांनी आघाडी धर्माला तिलांजली देत माजी खासदार महाडिक यांच्या पराभवासाठी कंबर कसली. त्यामुळे अलीकडे हा संघर्ष वैयक्तिक पातळीवर पोचला. अशा पार्श्‍वभूमीवर या लढतीत दोन्ही बाजूंचे उमेदवार राहिले बाजूला, त्यांच्या नातेवाइकांतच जुंपली. धनंजय महाडिक यांचा भाजप प्रवेश आणि तत्पूर्वी लोकसभा निवडणुकीत त्यांच्याकडून भाजपवरच झालेल्या टीकेचा व्हिडिओ विरोधकांनी सोशल मीडियावर व्हायरल केला. त्याला प्रत्युत्तर म्हणून महाडिक यांच्याकडून लोकसभा निवडणुकीतील आमदार पाटील यांच्या भूमिकेचा पर्दाफाश केला गेला.

मराठा समाजाचे प्राबल्य या मतदारसंघात आहे. त्यात महापालिकेतील १७ प्रभाग या मतदारसंघात येतात. दोन्हीही उमेदवार मराठा समाजाचे आहेत. दोघांची ताकद तुल्यबळ आहे. काँग्रेसने महाडिक यांच्या गटातील काहींना फोडून त्यांचा पाठिंबा मिळवला. त्याला प्रत्युत्तर म्हणून महाडिक यांनीही अनेक वर्षे पाटील यांच्या पाठीशी असलेल्यांना आपल्या बाजूने वळवले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naseem Khan: नसीम खान यांची नाराजी दूर करण्यात काँग्रेसला यश? पुण्यात धंगेकरांच्या प्रचारासाठी लावली हजेरी

MI vs KKR Live IPL 2024 : मुंबईच्या गोलंदाजांची कमाल, केकेआरला पॉवर प्लेमध्येच दिले चार धक्के

Rohit Sharma MI vs KKR : टी 20 वर्ल्डकपचा संघ जाहीर होताच मुंबईच्या प्लेईंग 11 मधून रोहितचं नाव गायब, काय आहे कारण?

Pune Loksabha election 2024 : ''आरक्षणाच्या पन्नास टक्क्यांच्या मर्यादेबद्दल मोदींनी भूमिका जाहीर करावी, आमचं ठरलंय...'' राहुल गांधी स्पष्टच बोलले

Latest Marathi News Live Update : मोदी आता ओबीसी असल्याचं सांगत नाहीत- राहुल गांधी

SCROLL FOR NEXT