malayalam mission start from sangli the activity of kerala government in sangli 
पश्चिम महाराष्ट्र

मल्याळम मिशनची सांगलीत सुरुवात

सकाळ वृत्तसेवा

मिरज (सांगली) : केरळमधील मल्याळी बांधवाना मल्याळम भाषेची माहिती करुन देण्यासाठी केरळ राज्य सरकारने राबविलेल्या मल्याळम मिशन या उपक्रमाचा शुभारंभ नुकताच सांगलीमध्ये झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केरळ समाजमचे अध्यक्ष टी.जी. सुरेशकुमार होते. मल्याळी बांधवाना मल्याळम भाषा बोलता, लिहिता आणि वाचता येण्यासाठी देण्यासाठी केरळ सरकारने हा उपक्रम सुरू केला आहे.

येत्या काही दिवसात हा उपक्रम सर्व भाषिकांसाठी खुला केला जाणार आहे. जगातील कानाकोपऱ्यात केरळमधील मल्याळी बांधव उद्योग, व्यवसाय नोकरीसाठी गेले आहेत. अगदी टायरचा पंक्‍चर काढण्यापासून ते बेकरीसह हॉटेल व्यवसायातही ही मंडळी सक्रिय आहेत. नोकरीनिमीत्तही ही मंडळी विविध ठिकाणी स्थायिक झाली आहे. अनेक वर्षांपासून केरळपासुन दूर झालेल्या या समाजातील स्त्री-पुरुषांचा त्या-त्या ठिकाणच्या इतर भाषिकांशी विवाहही झाले आहेत. यामुळे किंवा दुसऱ्या प्रदेशात राहिल्याने त्यांच्या मुलाबाळांना मल्याळम भाषा केवळ बोलता येते, पण लिहिता वाचता येत नाही. 

मल्याळम भाषा ही अतिषय मृदु आणि नम्र भाषा समजली जाते. मूळचे केरळचे रहिवासी असलेल्या मल्याळी बांधवाना मल्याळम भाषा येणे केरळ सरकारला गरजेचे वाटते आहे. अनेक मल्याळम जोडप्यांनाही मल्याळम भाषा बोलता येते, पण लिहिता-वाचता येत नाही. त्यामुळे त्यांच्यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. अन्य भाषिकांमध्येही मल्याळम भाषेचा प्रचार होण्याच्या उद्देशानेण या उपक्रमाच्या दुसऱ्या टप्प्यात अन्य भाषिकांनाही यासाठी मल्याळम भाषा शिकण्याची संधी दिली जाणार आहे. या भाषा शिकणाऱ्या स्नातकांना केरळ सरकार विशेष प्रमाणपत्र देणार आहे.

या उपक्रमाच्या प्रारंभप्रसंगी केरळ समाजमचे ज्येष्ठ सभासद पी. एस. प्रभु, पुरषोत्तमन, टी. विजयन, मोहन मुसद यांच्याहस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रमास डॉ. मधुकुमार नायर, के. बी. जॉन्सन, श्री सजीवन, लिजीष, गीता सुरेशकुमार, ज्योती नायर, सिम्मी दिलीप, किर्तना करुण, नीता सजीवन, आदी उपस्थित होते. स्वागत प्रास्ताविक समाजमचे सचिव टी विजयन यांनी केले, तर सुत्रसंचालन मोहन मुसद यांनी केले. आभार सजिवन यांनी मानले.  

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

Latest Maharashtra News Live Updates: "सरकार संवेदनाशून्य, भाजप मराठी माणसाचा खरा शत्रू" ; आदित्य ठाकरे यांचा घणाघात

Mumbai University: मुंबई विद्यापीठात इतर भाषिकांना मिळणार मराठीचे ऑनलाइन धडे

Mughal Treasury Found: बापरे! मुगल काळातील खजिना सापडला, मनरेगा कामगारांना उत्खननादरम्यान असं काही सापडलं की प्रशासनही हादरलं

Success Story: १४ तास अभ्यास, परीक्षेच्या २० दिवस आधी घरातील सदस्य गमावला, अडचणीवर मात करून तरुण सीए बनला

SCROLL FOR NEXT