Political 
पश्चिम महाराष्ट्र

राजकारण : ‘येथे’ पक्षनेतेपदाच्या नावातच बदल

हुकुम मुलाणी

मंगळवेढा (सोलापूर) : सत्ता स्थापनेत राज्यात झालेल्या नाट्यमय घडामोडींची पुनरावृत्ती नगरपालिकेच्या विषय समितीच्या निवडणुकीत येथे दिसून आली. विद्यमान पक्षनेते पांडुरंग नाईकवडी यांच्याऐवजी अजित जगताप यांची निवड झाल्याची माहिती विषय समितीच्या निवडी दरम्यान उघड झाल्यामुळे खळबळ उडाली. 

हेही वाचा - शिक्षक सघांची महामंडळ कोल्हापूरात १९ जानेवारीला सभा
राहुल शहा यांची निवड

याबाबत सविस्तर हकिगत अशी, की तीन वर्षांपूर्वी झालेल्या नगरपालिका निवडणुकीमध्ये कॉंग्रेसचे तत्कालीन आमदार भारत भालके व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राहुल शहा या दोन्ही गटांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या आघाडीच्या प्रमुखपदी राहुल शहा यांची निवड करण्यात आली. नगरपालिकेमध्ये सदस्यांना बजावण्याचे अधिकार हे त्यांना असताना त्यांनी त्यावेळी पक्षनेते म्हणून ते अधिकार अजित जगताप यांना दिले होते, परंतु ते अधिकारदेखील त्यांनी मध्यंतरीच्या काळात त्यांच्याकडून काढले आणि पांडुरंग नाईकवडी यांची पक्षनेते म्हणून निवड केली. दरम्यान, राहुल शहा यांनी पालिकेच्या राजकारणातून अंग काढून घेतले. नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीत राहुल शहा यांनी आमदार परिचारक गटाचे नेतृत्व स्वीकारले तर त्यांचे समर्थक असलेले पक्षनेते पांडुरंग नाईकवाडे यांनी आमदार भारत भालके यांचे नेतृत्व स्वीकारले. 

हेही वाचा - माळशिरच्या झेडपी सदस्यांची गुरुवारी सुनावणी
अजित जगताप पक्षनेतेपदी

तहसीलदार स्वप्नील रावडे यांच्या अध्यक्षतेखाली विषय समितीच्या निवडी पार पडल्या. त्यामध्ये पांडुरंग नाईकवडी यांच्याऐवजी पक्षनेते म्हणून अजित जगताप यांची निवड झाल्याची माहिती पालिकेत समजताच खळबळ उडाली. अजित जगताप यांनी सुचवलेल्या निवडीत विद्यमान उपनगराध्यक्ष चंद्रकांत घुले यांची पाणीपुरवठा समिती सभापतिपदी, आरोग्य सभापतिपदी प्रवीण खवतोडे, बांधकाम समिती सभापतिपदी राजश्री टाकणे, महिला बालकल्याण समिती सभापतिपदी रतन पडवळे, नियोजन समिती सभापतिपदी सुमन शिंदे आदी निवडी बिनविरोध करण्यात आल्या. या निवडीवर विद्यमान पक्षनेते पांडुरंग नायकवडी यांनी पक्षनेत्यांची निवड बेकायदेशीर असून त्यावर आक्षेप घेतला असल्याचे समजते. दरम्यान, पक्षनेते म्हणून कोणाला संधी द्यायची, याचे सर्वाधिकार राहुल शहा यांना असल्याने राहुल शहा यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Rain: मुंबईत मुसळधार पाऊस! पवई तलाव ओव्हरफ्लो, ७ जलाशयातील पाणीसाठ्याबाबत मोठी अपडेट समोर

युरोपात ३०-३५ डिग्री सेल्सिअसने हाहाकार, भारतात ४५वर पारा पोहोचूनही रस्ते वितळत नाहीत; कारण काय?

Jagannath Puri Rath Yatra 2026: कधी आहे जगन्नाथ पुरी रथयात्रा 2026? जाणून घ्या योग्य तारीख, महत्त्व आणि परंपरा

तेजश्री प्रधानला रिप्लेस करणारी अभिनेत्री होणार आई; समुद्रकिनारी फोटोशूट करत दाखवला बेबी बंप, तुम्ही ओळखलंत का?

५ सामने, ३० चौकार, २९ षटकार अन् ३५५ धावा... Vaibhav Sooryavanshi ची इंग्लंडमधील कामगिरी भारताला विचार करायला लावणारी..

SCROLL FOR NEXT