Maratha Reservation Manoj Jarange Patil esakal
पश्चिम महाराष्ट्र

Maratha Reservation : आमच्या लेकरांच्या जागा हडपल्या, आमचं आरक्षण का लपवून ठेवलं? विट्यातील जाहीर सभेत जरांगेंचा सवाल

ओबीसी नेत्यांचा दबाव राज्य सरकारवर होता.

दिलीप कोळी

सरकारला २४ डिसेंबरला आरक्षणाचा कायदा पारित करावा लागेल, अन्यथा १ जानेवारी पासून गावागावात शांततेच्या मार्गाने साखळी उपोषण सुरू झाले पाहिजे.

विटा : सरकारला १८०५ पासून ते १९६७ व १९६७ ते २०२३ पर्यंत जातीचे पुरावे सापडले असताना आमचं आरक्षण का लपवून ठेवलं? असा सवाल मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील (Manoj Jarange-Patil) यांनी केला. विटा येथील चौंडेश्वरी चौकात आरक्षणासंदर्भात (Maratha Reservation) झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते.

७० वर्षांपूर्वी मराठ्यांना आरक्षण दिले असते, तर मराठ्यांची जात प्रगत झाली असती. आरक्षण का दिले नाही, याचे उत्तर सरकारने द्यावे. आरक्षणाअभावी आमच्या लेकरांच्या जागा हडप केल्या. आरक्षणाने आमच्या लेकरांचा घात केलाय, असाही त्यांनी निशाणा साधला.

जरांगे-पाटील म्हणाले, ओबीसी नेत्यांचा दबाव राज्य सरकारवर होता. आरक्षणाचे पुरावे असताना सरकारने बुडा खाली ठेवले. मराठ्यांची एकजूठ बघून सरकारने पुरावे शोधण्यास सुरुवात केली. आरक्षणाची लढाई अंतिम टप्प्यात आली आहे. ज्या नेत्यांना तुम्ही आम्ही मोठं केलं. ते नेते मराठ्यांच्या बाजूने बोलायला तयार नाहीत.

सरकारला २४ डिसेंबरला आरक्षणाचा कायदा पारित करावा लागेल, अन्यथा १ जानेवारी पासून गावागावात शांततेच्या मार्गाने साखळी उपोषण सुरू झाले पाहिजे. मागे हटू नका, गावे पिंजून काढा असे आवाहनही जरांगे - पाटील यांनी उपस्थित मराठा बांधवांना केले. यावेळी हजारोंच्या संख्येने मराठा बांधव सभेला उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT