politics esakal
पश्चिम महाराष्ट्र

सांगली जिल्हा बँकेत 'या' 2 विरोधक भाऊंची दमदार एन्ट्री

जे दोन गट एकत्र त्यांचा विजय हे शिराळच्या राजकारणाचे समीकरण होते.

- शिवाजीराव चौगुले

जे दोन गट एकत्र त्यांचा विजय हे शिराळच्या राजकारणाचे समीकरण होते.

शिराळा - सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीत भाजपाच्या शेतकरी विकास पॅनेलच्या मजूर संस्था गटातून सत्यजित देशमुख हे निवडून आले आहेत. महाविकास आघाडीच्या सहकार विकास पॅनेल मधून सोसायटी गटातून आमदार मानसिंगराव नाईक हे बिनविरोध झाल्याने सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेत दोन भाऊंची एन्ट्री झाली असल्याने सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. सत्यजित देशमुख यांच्या विजयामुळे भाजपला आपले अस्तित्व सिद्ध करता आले. त्यामुळे तालुक्यात आनंदोत्सव सुरु आहे.

शिराळचे राजकारण हे नेहमी वेगळ्या वळणावर असते. येथे कोण कोणाचा कायमचा शत्रू नसतो. प्रत्येकजण आपापल्या सोयीचे राजकारण करत असतात. सत्यजित देशमुख हे काँग्रेसमध्ये असताना काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांनी तालुक्यात आघाडीचा धर्म पाळत ग्रामपंचायत ते जिल्हा परिषद सर्व निवडणुकीत माजी आमदार शिवाजीराव नाईक यांना सत्यजित देशमुख व आमदार मानसिंगराव नाईक या दोन भाऊंच्या जोडीने कायम राखण्याचा प्रयत्न केला. मात्र २०१९ ला या दोन भाऊंच्या समीकरणात बदल झाला. सत्यजित देशमुख यांनी भाजपात प्रवेश केला अन् कट्टर विरोधक असणारे शिवाजीराव नाईक हे जवळचे सहकारी बनले तर मित्रत्व जोपासणारे मानसिंगराव नाईक हे कट्टर विरोधक झाले.

जे दोन गट एकत्र त्यांचा विजय हे शिराळच्या राजकारणाचे समीकरण होते. ते २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत मानसिंगराव नाईक यांनी बाजी मारून बदलले. जो मजबूत तोच टिकेल हे नवीन समीकरण तयार झाले आहे. सत्यजित देशमुख यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांची या बँकेच्या निवडणुकीच्या माध्यमातून पहिलीच निवडणूक होती. ही निवडणूक शिराळा तालुका भाजपच्या प्रतिष्ठेची होती. शिराळा तालुक्यातुन विरोधक का असेना पण दोन भाऊ बँकेत गेले असल्याने तालुक्यातील लोकांत उत्साहाचे वातावरण आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Middle Class: 5 मिनिटांत बँक बॅलन्स 43,000 रुपयांवरून 7 रुपयांवर आला; भाड्यापासून ते EMIपर्यंत.. मध्यमवर्ग आर्थिक संकटात

Latest Maharashtra News Updates : मुक्ताईनगर तालुक्यातील पूर्णाड चौफुलीवर असलेल्या अतिक्रमण काढले

Supreme Court: सरकारी बंगला रिकामा करून ताब्यात घ्या; माजी सरन्यायाधीशांच्या निवासस्थानाबाबत न्यायालयाचे पत्र

Prithvi Shaw: ठरलं! मुंबई सोडलेल्या पृथ्वी शॉला मिळाला नवा संघ, आता ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार

Video: धक्कादायक! रिलसाठी अल्पवयीन मुलाने ट्रेन ट्रॅकवर जीव धोक्यात टाकला, व्हायरल व्हिडिओ

SCROLL FOR NEXT