Many farmers in Atpadi taluka are waiting for compensation 
पश्चिम महाराष्ट्र

आटपाडी तालुक्‍यात अनेक शेतकरी भरपाईच्या प्रतीक्षेत

नागेश गायकवाड

आटपाडी : अवकाळीने कंबरडे मोडलेल्या शेतकऱ्यांना सावरण्यासाठी राज्य शासनाने नुकसान भरपाई जाहीर केली. घोषणेनुसार आटपाडी तालुक्‍याला दोन टप्प्यात 13 कोटी 24 लाख रुपये मिळाले. मात्र अद्यापही अनेक गावचे शेतकरी भरपाईच्या प्रतीक्षेत आहेत. तीन कोटी 70 लाख रुपये मदतीची वंचित शेतकरी चातकाप्रमाणे वाट पाहत आहे. 

आटपाडी तालुक्‍यात या वर्षी अतिवृष्टीने कहर केला. जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्‍टोंबर या चार महिन्यात सतत पाऊस कोसळत राहिला. एकाचवेळी शंभर मिलिमीटरवर तीन वेळा पाऊस झाला. माणगंगा नदीसह बहुतांश ओढ्यांना पूर आला. अनेक पूल पाण्याखाली गेले. काही पूल आणि रस्ते वाहून गेले. शेकडो घरांची पडझड झाली. शेतातील पिके पाण्याखाली बुडाली. त्याचा सर्वात मोठा फटका डाळिंब उत्पादकांना बसला. 

अतिवृष्टीच्या तडाख्यातून सावरण्यासाठी राज्य शासनाने फळ पिकासाठी हेक्‍टरी 25 आणि इतर पिकासाठी हेक्‍टरी दहा हजार रुपयाच्या मदतीची घोषणा केली होती. ही मदत दिवाळी आगोदर शेतकऱ्यांना देण्यासाठी महसूल विभाग, कृषी विभाग आणि पंचायत समितीच्या माध्यमातून तलाठी, कृषी सहाय्यक आणि ग्रामसेवकाना वेगाने पंचनामे करण्याचे आदेश दिले. त्याप्रमाणे अवघ्या दहा दिवसात पंचनामे पूर्ण केले. आटपाडी तालुक्‍यातून पंचनामे केलेल्या आकडेवारीनुसार शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी 17 कोटीवर राज्य शासनाकडे मागणी केली. पहिल्या टप्प्यात सात कोटी 69 लाख रुपये मिळाले. त्यानंतर पाच कोटी 56 लाख रुपयेचा दुसरा टप्पा गेल्या महिन्यात मिळाला. 

आलेला निधी गावच्या नावाच्या आद्याक्षरांप्रमाणे संपूर्ण मदत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली. मात्र अद्यापही "श' अक्षराच्या पुढील गावांची नावे असलेल्या गावातील शेतकऱ्यांना अवकाळीची नुकसान भरपाई मिळालेली नाही. मदतीपासून वंचित शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी तीन कोटी 70 लाखांची गरज आहे. या निधीची मागणीही करण्यात आली आहे. दिवाळीला मदत करण्याची घोषणा नावालाच झाली. दिवाळी होऊन शिमगा तोंडावर आला, तरीही शेवटच्या शेतकऱ्यांपर्यंत अवकाळीची भरपाई अद्याप पोहोचलेली नाही. या शेतकऱ्यांचे अवकाळीच्या मदतीकडे नजरा लागल्या आहेत. 

अवकाळीच्या भरपाईपोटी 13 कोटी 24 लाख मिळाले. अजूनही तीन कोटी 70 लाखांची गरज आहे. मदत लवकरच मिळेल. 
-पोपट पाटील, तालुका कृषी अधिकारी, आटपाडी 


संपादन : प्रफुल्ल सुतार 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Devendra Fadnavis : महाराष्ट्रातील एक कोटी महिलांना लखपती बनविणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

Raj Thackeray : पुराणमतवाद्यांना शिंगावर घेणारे आजोबा! राज ठाकरेंनी शेअर केला प्रबोधनकरांसोबतचा लहानपणीचा फोटो; जयंतीनिमित्त सांगितली आठवण

IND vs PAK: सूर्यकुमारचा अपमान करणाऱ्या पाकिस्तानी खेळाडूच झाला ट्रोल; आता म्हणतोय, आफ्रिदीला कुत्रा म्हणणाऱ्या इरफान पठाणला...

दीड वर्षही झालं नाही आणि झी मराठीची आणखी एक मालिका घेणार निरोप? अभिनेत्रीच्या भावुक पोस्टमुळे चर्चेला उधाण

6G India : भारतात लवकरच सुरू होणार 6G इंटरनेट; IIT हैदराबादच्या विद्यार्थ्यांनी बनवला प्रोटोटाइप, हे नेमकं आहे तरी काय? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT