maratha kranti morcha.jpg 
पश्चिम महाराष्ट्र

#MarathaKrantiMorcha मराठा अरक्षणासाठी ३० जुलै रोजी अक्कलकोट बंदचे आवाहन

राजशेखर चौधरी

अक्कलकोट : सकल मराठा समाज यांच्या वतीने मराठा समाजास स्वतंत्र १६ टक्के आरक्षण द्यावे या मागणीसाठी सोमवारी (ता.३० जुलै) अक्कलकोट बंदचे आवाहन सकल मराठा समाजाच्यावतीने आज शनिवारी आयोजित बैठकीत करण्यात आले आहे. सर्जेराव जाधव सभागृहात सकल मराठा समाजाची बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला.  सोलापूर जिल्हा बंदच्या पार्श्वभूमीवर जन्मेजय भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली अमोल भोसले व नगरसेवक महेश इंगळे यांच्या नेतृत्वाखाली  सदरच्या बैठकीस मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते. या बैठकीत सकल मराठा समाजास आरक्षण व अन्य मागण्यासाठी राज्यात शांततापूर्ण ५८ मोर्चा काढण्यात आले. परंतु सरकार अद्याप याबाबत निर्णय घेत नसल्याने शासनाला जाग आणण्यासाठी सोमवारी अक्कलकोट बंदचे आवाहन करण्यात आले. या बंदमध्ये सर्वपक्षीय नेते सहभागी होणार आहेत.

दरम्यान अक्कलकोट तालुक्याचे आमदार सिध्दाराम म्हेत्रे यांनी आंदोलनास पाठिंबा दिल्याचे पत्रकार परिषदेत जाहीर केले व ते स्वत: अक्कलकोट बंदच्या मोर्चात सहभागी होणार असल्याचे सांगितले. यापूर्वी झालेल्या आंदोलनात सर्वपक्षीय नेते इतर समाजाचे समाज बांधव देखील सहभागी झाले होते. या बरोबरच सर्व व्यापारी बंधूंनी देखील आंदोलनास सहकार्य केले आहे. या बंदमध्ये अक्कलकोट शहर व तालुक्याचा समावेश आहे, असे समाजाच्यावतीने प्रसिध्दी पत्रकान्वये कळविण्यात आले आहे.
यावेळी उत्तर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक भगवानराव निंबाळकर, एस.टी.आगार व्यवस्थापक व व्यापारी आणि बागवान असोसिएशन, जिप व रिक्षा चालक-मालक संघटना, शाळा, महाविद्यालय आदींना निवेदन देण्यात आले. यावेळी अमोल भोसले, नगरसेवक महेश इंगळे हे स्वत: फिरुन बंदचे आवाहन करुन निवेदन सादर केले आहे. 

याप्रसंगी बाबासाहेब निंबाळकर, अरुण जाधव, बाळासाहेब मोरे, विक्रम शिंदे, बंडोपंत घाटगे,  राम जाधव, तम्मा शेळके, सुभाष गडसिंग, दिलीप काजळे, मनोज गंगणे, मनोज इंगुले, शितल फुटाणे, बाळासाहेब घाटगे, संदीप केत, मंगेश फुटाणे, केदार तोडकर, सुरेश कदम, ज्ञानेश्वर भोसले, अंबादास जाधव, योगेश पवार, सागर शिंदे, विशाल गव्हाणे, सागर गोंडाळ, संतोष भोसले, प्रविण घाडगे, गणेश भोसले, नाना मोरे, प्रशांत साठे, चेतन शिंदे, गोविंद शिंदे-माकणे, राजु शिंदे, सुखदेव चव्हाण आदी उपस्थित होते.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Motor Vehicle Tax: वाहनधारकांना मोठा दिलासा! नवीन वाहनांवर ५०% पर्यंत कर सूट मिळणार; सरकारने ठेवली फक्त एकच अट, पण कोणती?

Samruddhi Accident: समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; ट्रॅव्हल्स जळून खाक, चालकाचा होरपळून मृत्यू

Pune Shocking Incident : ऐकाव ते नवलच! पतीनं झोपेचं सोंग घेतलं म्हणून उकळता चहा आणला अन् नको 'त्या' ठिकाणी ओतला...

Mobile Phone Tips: मोबाईलच्या चार्जिंग पोर्टजवळ असणारा हा छोटासा छिद्र कशासाठी असतो? जाणून घ्या

Students Protest : MPSC विद्यार्थ्यांचा छत्रपती संभाजीनगरमध्ये एल्गार, रस्त्यावर येत सरकारविरोधात केल्या घोषणाबाजी

SCROLL FOR NEXT