Marathi news about solapur budget 2020 Auto sector in boost to electricles Vehicles
Marathi news about solapur budget 2020 Auto sector in boost to electricles Vehicles 
पश्चिम महाराष्ट्र

#Union Budget 2020 : इलेक्ट्रिक वाहनांना बळ देण्याची गरज

अशोक मुरूमकर

सोलापूर : सध्या देशभरात वाढत असलेले प्रदूषण कमी करण्यासाठी अर्थसंकल्पाच्या माध्यमातून नागरिकांनी जास्तीत जास्त इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करावा यासाठी प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. त्यासाठी आर्थिक तरतुद करणे गरजेचे आहे, अशी आशा ऑटोमोबाईल क्षेत्रातील वाहन विक्रेते, सर्व सामान्य नागरिक व पर्यावरणप्रेमींनी ‘सकाळ’शी बोलताना केली.

हेही वाचा- कसा तयार होतो केंद्रीय अर्थसंकल्प? जाणून घ्या...
कोण काय म्हणाले...
ज्योती घोगरे : प्रदूषण कमी करण्यासाठी इलेक्ट्रिक वाहने येणे आवश्‍यक आहेत. सध्या पेट्रोल, डिझेलच्या वाहनांमुळे प्रदूषण मोठ्याप्रमाणावर वाढत आहे. त्याचा परिणाम मोठ्या शहरात जाणवतो. ग्रामीण भागात देखील वाहनांची संख्या वाढत आहे. त्यावर बंधने येईला हवीत. इलेक्ट्रिक वाहने आल्यास काही प्रमाणात प्रदूषण कमी होण्यास मदत होईल.

बंटी काळे : इलेक्ट्रिक वाहने येण्यापूर्वी त्याची व्यवस्था करणे आवश्‍यक आहे. रस्त्यावर ज्याप्रमाणे जागोजागी पट्रोलपंप आहेत. त्याप्रमाणे इलेक्ट्रिक वाहनांसाठी जागोजागी चार्जिग पॉइँट उभारणे गरजेचे आहे. याबरोबर गाडीत काही बिघाड झाला तर त्यासाठी व्यवस्था असणे आवश्‍यक आहे. या गाड्यांमध्ये बॅटरी एक्सेंज करण्याची सुविधा हवी. त्यामुळे नागरिकांना प्रवासात अढथळा येणार नाही. सध्या वाढते प्रदुषण कमी करण्यासाठी इलेक्ट्रीक वाहन हा पर्याय चांगला आहे. याशीवाय नागरिकांनही प्रदूषण कमी करण्यासाठी जवळच्या अंतरावर गाडी वापरु नये. शक्य तेथे गाडीपेक्षा सायकलवर जावे.  पेट्रोल व डिझेलच्या गाड्यांचा वापर कमी करुन इलेक्ट्रीक गाड्यांना प्राधान्य द्यावे.  शहरांमध्ये अनेक ठिकाणी घरात प्रत्येकाची स्वतंत्र गाडी असते. त्यावर बंधन येणे गरजेचे आहे. पैसे जास्त असणे व हैस म्हणून गाड्या घेतल्या जातात. यातून प्रदुषण वाढते व अपघाताचे प्रमाणही वाढत आहे. त्यामुळे सध्या नागरिकांनीही सजग राहून इलेक्ट्रीक गाड्यांचा वापर करावा. त्यासाठी सरकारने अर्थसंकल्पात तरतुद करणे आवश्‍यक आहे.

विनय पाटील : इलेक्ट्रिक वाहनांसाठी बजेटमध्ये तरतुद करुन कायदा करण्याची गरज आहे. एका घरात जेवढी माणसे तेवढ्या गाड्या होत आहेत. त्यामुळे प्रदूषण वाढत आहे. गाड्या घेण्यावर निर्बंध घालायला हवेत. एका गाडीत काम भागत असले तर जास्त गाड्या घेण्याची गरज नाही. त्यावर सरकारने कायदा बनवायला हवेत. सध्या ज्याप्रमाणे पेट्रोल, डिझेल व सीएनजीच्या गाड्या आहेत. तशाच इलेक्ट्रिकच्या गाड्या आल्या तर प्रदूषणा वाढीवर आळा बसेल.

स्वप्नील कट्टीमनी : सरकार कायदे खूप चांगले बनवते परंतु त्याची अंमलबजावणी होत नाही. त्यामुळे प्रदूषण वाढत आहे. गाड्यांमुळे प्रदूषण होऊ नये याची काळजी म्हणूनच सरकारने खूप चांगले कायदे केले आहेत. मात्र, त्याची पुरेशी अंमलबजावणी होत नाही. त्यामुळे कायद्यात काही त्रुटी असतील तर त्या दुरुस्त करुन इलेक्ट्रिक वाहनांचा सर्वांना परवडेल अशा किंमतीत उपलब्ध करुन दिली पाहिजेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

IPL 2024 MI vs SRH Live Score: सुरुवातीच्या मोठ्या धक्क्यांनंतर सूर्यकुमारचे दमदार अर्धशतक, तिलकनेही दिली भक्कम साथ

Vijay Wadettivar: वडेट्टीवारांविरोधात भाजपची निवडणूक आयोगात तक्रार; मुंबई हल्ल्यावरील विधानावर केलं होतं भाष्य

Arvind Kejriwal: नायब राज्यपालांकडून केजरीवाल पुन्हा टार्गेट! खलिस्तान्यांकडून पैसा घेतल्याची केली NIAकडं तक्रार

Team India Jersey: T20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया दिसणार नव्या रुपात, नवी जर्सी झाली लाँच; पाहा Video

SCROLL FOR NEXT