dead_body
dead_body 
पश्चिम महाराष्ट्र

दोन दिवसांपासून बेपत्ता तरूणाचा मृतदेह नदीत

सकाळवृत्तसेवा

विंग (सातारा) : दोन दिवसांपासून बेपत्ता झालेल्या पोतले (ता. कऱ्हाड) येथील तरूणाचा मृतदेह वांग नदीत शुक्रवारी सकाळी आढळला. कुंटुबीय व ग्रामस्थांनी घातपाताचा संशय व्यक्त केल्याने खळबळ उडाली आहे. मृताची ओळख पटली आहे. अनिल आनंदराव पाटील (वय २२) असे संबंधिताचे नाव आहे. तालुका पोलीसात तेथील एका महिलेसह येणके येथील दोघांवर गुन्हा दाखल होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. अनिलचे वडील आनंदराव यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला आहे. पोलीसांनी संबधितावर खुनाचा गुन्हा नोंद करावा. अन्यथा मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पावित्रा ग्रामस्थांनी घेतल्याने वातावरण तंग झाले.

पोलीस व घटनास्थळावरून मिळालेली माहितीनुसार पोतलेतील जुने गावठाण येथील अनिल पाटील मंगळवारपासून संशयितरित्या बेपत्ता होता. नातेवाईक व ग्रामस्थ त्याच्या शोधात होते. बेपत्ता असल्याची तक्रार पोलीसांत दिली होती. आज सकाळी तेथील गावठाणालगत महारकी नावाच्या शिवारात वांग नदी जलाशयात तरूणाचा मृतदेह तरंगताना आढळला. तेथील शेतकऱ्याने पाहिले. त्यांनी ग्रांमस्थांना माहिती दिली व पोलीसांनाही कळवले. त्यानंतर तेथील युवकाच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आला. मृतदेह अनिलचा असल्याचे यावेळी उघडकीस आले. घटनास्थळी ग्रासस्थांनी मोठी गर्दी केली होती. घातपाताचा संशय ग्रामस्थांतून व्यक्त केला जात होता. कोळे दूरक्षेत्र पोलीस उपनिरिक्षक अशोक भापकर व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनास कऱ्हाडला पाठविला. वडील आनंदराव पाटील यांनी त्याबाबत कऱ्हाड पोलीसात दिलेल्या फिर्यादीवरून संशयित म्हणून पोलीसांनी तेथील महिलेसह येणके येथील अन्य दोघांना ताब्यात घेतले आहे. संशयितांवर खुनाचा गुन्हा नोंद करावा अशी मागणी नातेवाईक व ग्रामस्थांनी तालुका पोलीसांना यावेळी केली. त्याशिवाय मृतदेह ताब्यात न घेण्याचा पावित्रा घेतला. त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले. पोलीसांनी योग्य आश्वासन दिल्यानंतर सायंकाळी उशीरा मृतदेह ताब्यात घेतला. अनिलला पत्नी, एक मुलगा आई-वडील व अन्य दोन भाऊ असा परिवार आहे. गाव व परिसरात त्याचा मोठा मित्र परिवार होता. अचानक घडलेल्या घटनेमुळे गाव व परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal: नायब राज्यपालांकडून केजरीवाल पुन्हा टार्गेट! खलिस्तान्यांकडून पैसा घेतल्याची केली NIAकडं तक्रार

Team India Jersey: T20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया दिसणार नव्या रुपात, नवी जर्सी झाली लाँच; पाहा Video

IPL 2024 MI vs SRH Live Score: पीयूष चावलाच्या फिरकीची जादू चालली, हेडपाठोपाठ क्लासेनलाही केलं क्लिन-बोल्ड; हैदराबादचा निम्मा संघ गारद

Hires Women to Seduce Men: पबमध्ये पुरुषांना भुरळ घालण्यासाठी महिलांची नियुक्ती; पोलिसांच्या छाप्यात धक्कादायक प्रकार उघड

Sunita Williams News : अभिमानास्पद! सुनीता विल्यम्स पुन्हा घेणार अंतराळात झेप; सोबत नेणार भगवद्‍गीता अन् 'ही' खास मूर्ती

SCROLL FOR NEXT