Nagar 
पश्चिम महाराष्ट्र

पंधरा वर्षात काही केले नाही, ते हल्लाबोल करायला निघाले : आमदार कोल्हे

अरुण गव्हाणे

पोहेगाव (जि. नगर) : गेल्या 15 वर्षामध्ये ज्यांना सर्वसामान्य जनतेसाठी काही करता आले नाही, तेच आज भाजप-शिवसेना सरकार विरूध्द हल्लाबोल करायला निघाले आहेत. आधीच वेळोवेळी प्रश्न सोडविले असते तर ही वेळ त्यांच्यावर आली नसती, अशी टीका भाजपा आमदार स्नेहलता कोल्हे यांनी माहेगाव देशमुख ( ता. कोपरगाव ) येथे केली. 

धारणगाव ते सुरेगाव या 11 किलो मिटर रस्त्याच्या खडीकरण व डांबरीकरणाचे भुमीपुजन शुक्रवारी कोल्हेंच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजप तालुकाध्यक्ष शरद थोरात होते. व्यासपिठावर संजीवनी कारखान्याचे उपाध्यक्ष सोपान पानगव्हाणे, माहेगावचे संरपंच बाळासाहेब पानगव्हाणे, ग्रा.पं. सदस्या वैशाली पानगव्हाणे, केशव भवर, के.पी. रोकडे, मच्छिंद्र केकाण आदी उपस्थित होते. कोल्हे म्हणाल्या, माजी मंत्री शंकरराव कोल्हे हे तत्कालीन आघाडी सरकारच्या मंत्र्यांना पाणी प्रश्नावर वेळोवेळी बोलवत होते. तेंव्हा ते आले असते, तर आपल्या पदरात काही पडले असते. त्यामुळे आता हल्लाबोल करून काय साधणार आहे. निळवंडे धरणातुन शिर्डी ते पुढे कोपरगाव शहराला पाणी योजना आणल्याचे विरोधकांनी राजकारण केले.

सिंचनाचे पाणी पळविले जात असल्याचा खोटानाटा कांगावा केला. परंतु त्यांच्या भुलथापांना कोणीही बळी पडणार नाही. न्याय देणारे जिथे आहेत, तेथे आपण थांबणार आहोत. कोणी कोणतीही आंदोलने केली तरी कोपरगावचे शेतकरी कामे करणारांमागेच उभे राहतात हे या मंडळींनी लक्षात ठेवावे. सरकारमध्ये असले तरी शेतकरी संपात सर्वप्रथम मी सहभागी झाले. शेतक-यांच्या प्रश्नांवर लढण्यास कधीही मागेपुढे पाहणार नाही. कर्जमाफीमध्ये शेतक-यांना समाधान देता आले, ही खुप मोठी गोष्ट आहे. आमदार म्हणुन प्रत्येक गावाला काहीना काही देण्याचा प्रयत्न केला. अजुनही खुप कामे करायची आहेत. गेल्या तीन वर्षात तालुक्यात रस्ते, पाणी, विज ही मुलभुत विकासाची कामे केली. दळणवळण व व्यापार टिकला पाहीजे म्हणुन तालुक्यातील रस्ते सुस्थितीत आणले. एक विज केंद्र व 5-6 उपकेंद्र मंजुर करून आणले. शहराला 35 व ग्रामीण भागाला 150 विद्युत रोहीत्र मिळवुन दिले. 51 कोटी रूपयांचे 23 सिमेंट नाला बंधारे मंजुर झाले आहे. गोदावरी नदीवरील कोल्हापुर टाईप बंधा-यांना नवीन फळया बसविण्यासाठी 1 कोटी 25 लाख 67 हजारांचा निधी उपलब्ध केला. जड वाहतुक व अवैध वाळुच्या वाहनांमुळे रस्ते खराब होतात, ही गंभीर बाब आहे. प्रशासनाने याची दखल घेतली पाहिजे. धारणगाव ते सुरेगाव या इतर जिल्हा मार्गाची दर्जोन्नती करून प्रमुख जिल्हा मार्ग केला. या कामासाठी 3 कोटी 74 लाखांचा खर्च होणार आहे.

माहेगाव परीसरातील नागरीकांना घरकुले, दाखले, रेशनकार्ड, जात प्रमाणपत्र देण्यासाठी समाधान शिबिर आयोजित केले जाईल. स्मशानभुमीचे काम मार्गी लावु. धार्मीक कार्यात येणा-या अडचणींवर मार्ग काढावे लागतील. मात्र कामे अडवुन ठेवणा-या अधिका-यांची वेळीच दखल घेवु असा इशारा कोल्हे यांनी दिला.  सरपंच बाळासाहेब पानगव्हाणे यांनी गावातील विविध समस्या मांडल्या. केषव भवर यांनी कोल्हे यांच्या तीन वर्शातील कामांची माहिती दिली. पी.आर. काळे यांनी गावाचा पाणीप्रष्न सोडवविण्यासाठी साठवण तलावाची मागणी केली. सार्वजनिक बांधकामचे सहाय्यक अभियंता संजय कोकणे यांनी प्रस्तावित रस्त्याचा लेखाजोखा मांडला. सुत्रसंचालन भागवत पानगव्हाणे यांनी केले. या प्रसंगी संजीवनीचे संचालक मनेश गाडे, शिवाजी निंबाळकर, शिवाजी कदम, दत्तात्रय पानगव्हाणे, भिमराज रोकडे, बेबी गोंधळे, सुर्यभान धिरोडे आदीसंह ग्रामस्थ उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cyclone Montha: चक्रीवादळ 'मोंथा'मुळे देशभरातील हवामान बदलणार ; पुढील पाच दिवसांत 'या' राज्यांना पावसाचा इशारा!

मोठी बातमी! राज्यात १५,६३१ पोलिसांची भरती; उमेदवारांना करता येईल २९ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबरपर्यंत ‘या’ वेबसाईटवर अर्ज; एका पदासाठी एकाच अर्जाची अट

Montha Cyclone update : 'मोंथा' चक्रीवादळाचं थैमान सुरू! आंध्र प्रदेशात किनारपट्टी भागाला जोरदार तडाखा

Fake Acid Attack Case : धक्कादायक! दिल्लीत विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ल्याचं प्रकरण बनावट असल्याचे निष्पन्न!

दिवाळीपूर्वी मदत देण्याची घोषणा, तरी..! निम्मा सोलापूर जिल्हा अतिवृष्टीच्या मदतीपासून दूर; 3.95 लाख शेतकऱ्यांना मिळाली नाही भरपाई, तालुकानिहाय संख्या...

SCROLL FOR NEXT