Shripad Chindam
Shripad Chindam 
पश्चिम महाराष्ट्र

श्रीपाद छिंदमची रवानगी होणार दुसऱ्या कारागृहात! 

सूर्यकांत नेटके

नगर : शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारे नगरचे उपमहापौर श्रीपाद छिंदम याला न्यायालयाने चौदा दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यानंतर त्याची लगेच जिल्हा कारागृहात रवानगी केली. मात्र तेथे कैद्यांकडून मारहाण झाल्याच्या पार्श्‍वभूमीवर कायदा-सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून त्याला नगर जिल्ह्याच्या बाहेरील न्यायालयात रवानगी केली जाणार असल्याचे जिल्हा कारागृह प्रशासनाने सांगितले. न्यायालय परिसरात गर्दी होऊन कायदा व सुव्यवस्थेच्या पार्श्‍वभूमीवर त्याला सकाळी आठ वाजताच अत्यंत गोपनीयतेने न्यायालयात हजर केले. न्यायालयाने चौदा दिवसाची पोलिस कोठडी सुनावली. 

नगर महापालिकेचे भाजपचे उपमहापौर श्रीपाद छिंदम यानी महापालिकेच्या बांधकाम विभागातील कर्मचारी अशोक बिडवे यांना फोन केला होता. छिंदम यांच्या प्रभागातील खड्डे बुजविण्याच्या कामासाठी कर्मचारी पाठविले नाही या कारणावरुन फोनवर विचारणा केली. "शिवजयंती झाल्यानंतर माणसे पाठवितो'', असे बिडवे यांनी सांगितल्यावर छिंदम याने अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन शिवाजी महाराज व शिवजयंतीबाबत अपशब्द वापरले. 

बिडवे आणि छिंदम याच्या संभाषणाची ऑडियो क्‍लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आणि शहरासह जिल्हाभरात गदारोळ झाला. त्याचे पडसाद राज्यभर उमटले. नागरिक संताप व्यक्त करु लागले. महापालिकेतही कर्मचाऱ्यांनी कामबंद अांदोलन केले. छिंदम याच्याबद्दल रोष व्यक्त होऊ लागला असतानाच छिंदम गायब झाला होता. सायंकाळी शिराढोण (ता. नगर) शिवारात त्याला स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरिक्षक दिलीप पवार यांनी पकडले. आज त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याने न्यायालयात शिवप्रेमींची गर्दी होणार असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होणार होता. "न्यायालयाच्या परिसरात आज (शनिवारी) कडक बंदोबस्त असेल'' असे पोलिस अधिक्षक रंजनकुमार शर्मा यांनी सांगितले होते. मात्र कायदा सु-व्यवस्थेचा विचार करता आजच सकाळी आठ वाजताच छिंदमला न्यायालयात हजर केले. न्यायलयाने त्याला 1 मार्चपर्यत न्यायलयीन कोठडी दिली आणि लगेचच जिल्हा कारागृहात रवानगी केली. कारागृहात जाताच तेथील शिवप्रेमी कैद्यांनी छिंदम याच्या विरोधात घोषणाबाजी करत त्याला मारहाणही केली. पोलिसांनी मात्र या मारहाणीचा इन्कार केला आहे. 

छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल श्रीपाद छिंदम याने अपशब्द वापरल्याचे पडसाद कालपासून राज्यभर उमटले आहेतच; पण आज छिंदमला नगरच्या जिल्हा कारागृहात आणताच तेथेही त्याचे पडसाद पहायला मिळाले. त्यामुळे छिंदम येथील कारागृहात राहिल्यास कायदा व सुवव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होण्याची शक्‍यता गृहीत धरुन कारागृह व्यवस्थापनाने त्याला अन्य कारागृहात पाठवणार असल्याचे सांगितले आहे. दरम्याण शहरातील दिल्लीगेट परिसर, छिंदम यांचे निवासस्थान आदी भागात पोलिस बंदोबस्त आजही कायम होता. छिंदम खासदार दिलीप गांधी यांचे कट्टर समर्थक असल्याने त्यांच्यावर रोष व्यक्त केला जात आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Loksabha : पंतप्रधान मोदींची उद्या पुण्यात सभा ; सुमारे दोन लाख नागरिक उपस्‍थित राहणार,भाजपचा दावा

Apple Bug : अ‍ॅपलच्या यूजर्सना भेडसावतेय वेगळीच समस्या; रिसेट करावा लागतोय Apple ID पासवर्ड

लग्नाच्या दिवशी नवऱ्या मुलाने केली मोठी चूक; नवरीमुलीने थेट लग्न मोडलं

Viral Video: शिक्षिकेची गुंडागर्दी! शेजारच्या घरात घुसून गोंधळ, लहान मुलासह तीन जखमी.. व्हिडिओ व्हायरल

International Labour Day : राजीनाम्यानंतर नोटीस कालावधी पूर्ण करणे बंधनकारक आहे का? काय सांगतो नियम

SCROLL FOR NEXT