police
police 
पश्चिम महाराष्ट्र

तुम्हाला ऐकू येत नाही का? मी डिपार्टमेंटचा माणूस आहे!

परशुराम कोकणे

सोलापूर : पोलिस असल्याचे सांगून युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीच्या निवृत्त व्यवस्थापकाची अंगझडती घेतली. तपासणीच्या बहाण्याने हातचलाखी करून सोनसाखळी आणि अंगठी लंपास केली. ही घटना शनिवारी सकाळी सव्वाआठच्या सुमारास जुळे सोलापुरातील टिळक विद्यापीठाच्या परिसरात घडली. 

संपतलाल शंकरलाल खाबिया (वय 66, रा. श्रीकांतनगर, जुळे सोलापूर) यांनी विजापूर नाका पोलिसांत फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खाबिया हे युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीतून व्यवस्थापक पदावरून निवृत्त झाले आहेत. शनिवारी सकाळी सव्वाआठच्या सुमारास भाजी आणण्यासाठी डी मार्टच्या दिशेने निघाले होते. अंदाजे वय 40 असलेला व्यक्ती दुचाकीवरून आला. मी तुम्हाला किती वेळ आवाज देत आहे, तुम्हाला ऐकता येत नाही का? मी डिपार्टमेंटचा माणूस आहे. आमची गस्त चालू आहे. सध्या गांजा, अफू व चरस याचा वापर आणि विक्री चालू आहे.

त्याबद्दल आमची चेकिंग चालू आहे असे म्हणून खाबिया यांना बाजूला घेऊन कच्च्या रस्त्यावर नेले. अंगाची तपासणी करून दीड तोळा वजनाची सोनसाखळी, अर्धा तोळा वजनाची सोन्याची अंगठी काढून घेतली. मोबाईल, घड्याळ, खिशातील 80 रुपयांची रक्कमही काढून घेतली आणि खाबिया यांच्याकडील रुमालामध्ये ठेवली. गाठ मारून रुमाल खाबिया यांच्याकडे दिले. त्याच वेळी रस्त्यावरून जाणाऱ्या एका अनोळखी व्यक्तीला अडविले. त्याच्या बॅगेची तपासणी केली. तुम्ही पोलिस असल्याचे ओळखपत्र दाखवा असे तो म्हणाला. ओळखपत्र दाखविल्यासारखे करून त्याला शिवीगाळ केली. चापट मारून तू चल पोलिस स्टेशनला असे म्हणून दुचाकीवर बसविले. डि मार्टसमोरून विजापूर रोडकडे ते दोघे निघून गेले. थोडे अंतर पुढे जाऊन खाबिया यांनी रुमालाची गाठ काढून पाहिली. आतमध्ये मोबाईल, घड्याळ व पैसे होते, पण सोनसाखळी आणि अंगठी नव्हती. यानंतर फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने खाबिया यांनी पोलिसांत धाव घेतली. याप्रकरणी विजापूर नाका पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UAPA: ओसामा बिन लादेनचे फोटो, ISIS चे झेंडे बाळगणे गुन्हा नाही: हायकोर्ट

Viral: पवार गटाचं काम करणाऱ्याला दत्ता भरणे यांच्याकडून शिवीगाळ? व्हिडिओ रोहित पवारांकडून शेअर

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : महाराष्ट्रात 11 वाजेपर्यंत 18.18 टक्के मतदान; बारामतीमध्ये सर्वात कमी मतदानाची नोंद

Met Gala 2024 : परी म्हणू की सुंदरा! रेड कार्पेटवर ईशाचाच जलवा, स्पेशल फ्लोरल ड्रेस बनवण्यासाठी लागले तब्बल 10 हजार तास

Latest Marathi News Live Update: 'पन्नू हत्येप्रकरणी भारताच्या तपास अहवालाची वाट पाहतोय': अमेरिका

SCROLL FOR NEXT