Market ready for Diwali; waiting for customers; Retail price increase for decoration materials 
पश्चिम महाराष्ट्र

आली दिवाळी : बाजार सजलाय, प्रतीक्षा ग्राहकांची;  सजावट साहित्याची किरकोळ दरवाढ 

अजित झळके

सांगली ः दिवाळी खरेदीचा पहिला टप्पा सुरू झालाय. एकेक वस्तू खरेदी करून ऐनवेळची धांदल, गडबड आणि अचानक होणारी दरवाढ टाळण्यासाठी लोक बाहेर पडले आहेत. त्यात प्राधान्याने सजावट साहित्य खरेदी करण्यावर भर आहे. चीनमधून साहित्याची आवक नाही, भारतातच अनेक वस्तू यंदा निर्माण झाल्या आहेत. तरीही, गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा अगदीच किरकोळ दरवाढ झाली आहे. केवळ "बार्गेनिंग' करण्याची तयारी ठेवा. सजावट बाजाराला ग्राहकांची प्रतीक्षा आहे. 

मार्चमध्ये कोरोनाचा लॉकडाऊन सुरू झाले आणि लोकांनी स्वतःला घरात कोंडून घेतले. बहुतांश सण घरीच गेले. अगदी गणेशोत्सव, नवरात्रोत्सव आणि दसरा सणही सुणासुणा गेला. अर्थात, त्यामुळे कोरोना रुग्णसंख्या वाढीला आळा बसला. आता दिवाळी मात्र धूमधडाक्‍यात, उत्साहात, जल्लोषात साजरी करण्याचा लोकांचा मूड आहे. संपूर्ण काळजी घेऊन ती करावा, असे आवाहन सर्व पातळीवर केले गेले आहे. 

आता बाजारात गर्दी वाढू लागली आहे. दिवाळी जवळ येईल तशी गर्दी ओसंडून वाहणार असेच दिसू लागले आहे. सजावट साहित्यात सुमारे 80 प्रकारचे प्लास्टिक फुलांचे तोरण आले आहेत. त्याला झेंडू, मोगरा या फुलांसारखा आकार देण्यात आला आहे. झेंडू फुलांसारख्या माळा अंगणातील भिंती सजवण्यासाठी उपयुक्त आहेत. 50 ते 60 रुपयांना एक या दराने त्या उपलब्ध आहेत. तोरणांचे दर 150 रुपयांपासून ते तीन हजाराहून अधिक आहेत. त्यात प्लास्टिकसह काच, हिऱ्याच्या आकाराच्या वस्तू, मोती आकाराचे मणी आदींचा वापर केला आहे. देशी, विदेशी बनावटीचे शंभराहून अधिक प्रकारचे आकाश कंदील सजले आहेत. श्री लक्ष्मी पूजनासाठीच्या असंख्य वस्तू आहेत. लक्ष्मीची पावले, दिवे, पणत्या यांना आकर्षक स्वरूप देण्यात आले आहे. 

विजेच्या माळा, मेड इन इंडिया 
सजावटीत विजेच्या माळांना फार मागणी असते. यंदा भारतात बनवण्यात आलेल्या माळांची क्रेझ आहे. अर्थात, त्यातील एलईडी दिवे हे चीन किंवा विदेशातूनच आलेले असले तरी माळा येथे बनवलेल्या आहेत. विक्रेते त्याचे मार्केटिंग करत आहेत. 

सजावट साहित्यात फार दरवाढ नाही

खरेदीला हळूहळू वेग येतोय. सजावट साहित्यात फार दरवाढ झालेली नाही, साहित्यही मुबलक आहे. लोक उत्साहाने खरेदी करतील अशा आशा आहे. 
- संजय शिंदे, विक्रेते 

संपादन :  युवराज यादव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Bengaluru Highway : मोठी बातमी! पुणे-बंगळूर महामार्ग काही काळासाठी बंद; कधी सुरु होणार मार्ग? वाहनांच्या लागल्या लांबलचक रांगा, काय आहे कारण?

Security Warning : तुमचा फोन आहे धोक्यात! सरकारने 'या' 4 कंपनीचे मोबाईल वापरणाऱ्यांना दिला इशारा; पटकन करा 'हे' काम नाहीतर...

Uddhav Thackeray : अहमदाबादचं नामांतर कधी? उद्धव ठाकरेंना कळली संघाची अंदर की बात! अमित शहा आणि मोदींबद्दल दिली मोठी अपडेट

Parliament Winter Session: १९ दिवस १५ बैठका अन्... संसदेचे हिवाळी अधिवेशन १ डिसेंबरपासून सुरू होणार; पाहा संपूर्ण तपशील

UPSC IFS Main Exam 2025: UPSC IFS मुख्य परीक्षेचे प्रवेशपत्र जाहीर; आता असे करा डाउनलोड

SCROLL FOR NEXT