Marriage made by the witness of orphan children 
पश्चिम महाराष्ट्र

valentine day special ; अनाथ मुलांच्या साक्षीने त्यांनी बांधल्या आयुष्याच्या गाठी 

सकाळ वृत्तसेवा

बेळगाव : विवाहसोहळा हा आयुष्यात एकदाच होणारा क्षण. त्यामुळे विवाह हा थाटामाटात व्हावा, अशी प्रत्येकाचीच अपेक्षा असणे स्वाभावीक. यासाठी प्रसंगी लाखो रुपये खर्च करुन विवाह करण्याचीही तयारी असते. पण, अवाढव्य खर्चाला फाटा देत व्हॅलेंटाईन डे दिवशी अनाथ मुलांच्या उपस्थितीत विवाह सोहळा करण्याचा उपक्रम शुक्रवारी (ता. 14) बेळगावात राबविण्यात आला. 

हुक्‍केरीतील चंद्रकांत गवाणे आणि संकेश्वर येथील विणा मननाईक असे या वर-वधूचे नाव आहे. चंद्रकांत हा पूर्वीपासून अनाथ मुलांसाठी कार्य करतो. त्यामुळेच त्याने आपला विवाह अनाथ मुलांसमवेत साजरा करण्याची इच्छा व्यक्‍त केली. त्याला वधू विणानेही सहमती दर्शविली. त्यानुसार शुक्रवारी महेश फौंडेशनच्या सभागृहात हा विवाह सोहळा झाला. राष्ट्रकवी कुवेम्पू यांच्या "मंत्र मांगल्य' या संकल्पनेचा आदर्श घेऊन हा विवाह करण्यात आला. अतिखर्चात व प्रतिष्ठेतील विवाह टाळून सोप्या व साध्या पद्धतीने विवाह करणे हीच "मंत्र मांगल्य' यामागची संकल्पना आहे. मनुष्याच्या जीवनातील प्रत्येक क्षण अमूल्य असून त्याचे प्रदर्शन करू नका, अशी शिकवणही ही संकल्पना देते. त्याचेच अनुकरण करत चंद्रकांत व विणा यांनी अंत्यत साधेपणाने विवाह करुन एकमेकांना आयुष्यभराची साथ देण्याचे वचन दिले. 
महेश फौंडेशननेही स्वतःच्या कुटुंबातील सदस्याप्रमाणेच चंद्रकांत व विणा यांच्या विवाहाची उत्साहाने सर्व तयारी केली. महेश फौंडेशनच्या अनाथ मुलांनाही विवाहावेळी पाहुण्यांप्रमाणेच वागणूक देण्यात आली. त्यामुळे ही मुलेही भारावून गेली. यावेळी वधू-वराला शुभेच्छा देण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते डॉ. प्रकाश भट, शिवाजी कागणीकर, वीराण्णा मडिवाळ, दिनेश पाटील, आशा यमकनमर्डी, भावना हिरेमठ, शंकर चौगुले, महेश फौंडेशनचे अध्यक्ष महेश जाधव, व्यवस्थापक महेश्वर हंपीहोळी आदींसह शहरातील मान्यवर उपस्थित होते. 

लग्न हे दोन जीवांचे मिलन असते. त्याला मोठ्या थाटामाटाची गरज नाही. थाटामाटात विवाह करून होणाऱ्या अनावश्‍यक खर्चाला फाटा देऊन तो पैसा महेश फौंडेशनच्या अनाथ मुलांसाठी खर्च करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आपला विवाह साधेपणाने करण्यात आला. 
-चंद्रकांत गवाणे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DK Shivakumar : कर्नाटकातील १२ आमदारांची दोन लग्ने; खुद्द मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्याकडे यादी, बंगळूरला स्थायिक झाल्याची माहीती

Maharashtra Drought Fodder Camp : चारा छावणीसाठी शासनाचे नियम काय? किती अनुदान मिळते; जिल्हाधिकाऱ्यांना महत्त्वाचे अधिकार

पत्नीच्या वाढदिवसानिमित्त स्वप्नील जोशीची खास पोस्ट; सुरू केलाय खास व्यवसाय; म्हणतो- जितकी मेहनत या ब्रॅण्डसाठी घेतेयस...

ना ढोल-ताशे, ना गर्दी... एकट्या भक्ताचा स्वतः घडवलेला बाप्पाला भावूक निरोप; डोळे पाणावणारा Video Viral

Latest Marathi News Live Update : कोयना धरणातून ३,९०० क्युसेक पाण्याचा विसर्ग; नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

SCROLL FOR NEXT