ramdas aathavale.jpg
ramdas aathavale.jpg 
पश्चिम महाराष्ट्र

मातंग समाजाच्या आरक्षणासाठी प्रयत्नशील

सकाळवृत्तसेवा

सांगली- मातंग समाजाला बौद्ध समाजाप्रमाणे जास्त प्राधान्य मिळाले नाही. सरकारी नोकरीत बौद्ध व हरिजनांना अधिक संधी मिळाली आहे. मातंग समाजाला वेगळे स्वतंत्र आरक्षण मिळाले पाहिजे. जनगणनेनंतर जातीच्या टक्केवारीप्रमाणे त्यांना स्वतंत्र आरक्षण देण्यात अडचण येणार नाही असा विश्‍वास केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी येथे व्यक्त केला.

 
बहुजन समता पार्टीच्यावतीने सत्यशोधक अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दीनिमित्त भावे नाट्यमंदिरात आयोजित महाअधिवेशनात ते बोलत होते. प्रा. मच्छिंद्र सकटे, पुष्पलता सकटे, प्रकाश वायदंडे, विजय चांदणे, प्रा. शहाजी कांबळे, बाबासो कांबळे, जगन्नाथ ठोकळे, संजय कांबळे, उत्तम चांदणे, लालासो नाईक, प्रकाश कांबळे आदींची प्रमुख उपस्थिती होती. 


श्री. आठवले म्हणाले, ""शाळेमध्ये न गेलेले अण्णाभाऊ साठे हे प्रतिभावंत साहित्यिक बनले. पूर्वी लोकनाट्यामध्ये काम करणारे अशिक्षित होते. अलिकडे शिकलेले लोक या क्षेत्रात आहेत. कलेचा आणि मातंग, बौद्ध समाजाचे नाते अनेक वर्षापासूनचे आहे. गेल्या काही वर्षात बौद्ध आणि हरिजनांना अनेक संधी मिळाल्या. शिक्षणामुळे ते शक्‍य झाले. परंतू मातंग समाजात शिक्षणाचे प्रमाण कमी असल्यामुळे ते मागे आहेत. 2021 च्या जनगणनेत सर्वजातींची टक्केवारी समजेल. त्यामुळे सरकारला आरक्षणाबाबत निर्णय घेता येईल. मातंग समाजाला वेगळे आरक्षण मिळावे अशी मागणी आहे. जनगणनेनंतर त्यांना टक्केवारीप्रमाणे आरक्षण देण्यात अडचण येणार नाही असे वाटते.'' 


ते पुढे म्हणाले, ""डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध आणि मातंग यांनी एकत्र यावे असा विचार मांडला होता. ते एकत्र आले तर सगळ्या पक्षांची आपल्याकडे रांग लागेल. मी बौद्ध असलो तरी मातंग समाजाच्या विकासासाठी प्रयत्न करेन. समाजाने देखील उत्कर्षासाठी शिक्षण घेतले पाहिजे. स्वत:च्या पायावर उभे राहून स्वयंरोजगाराकडे वळले पाहिजे. अण्णाभाऊ साठेंबद्दल मला आदर आहे. स्मारकासाठी निधी मंजूर आहे. नव्याने आराखडा तयार करून त्यांचे वाटेगावात स्मारक उभे करावे. अण्णाभाऊ मुंबईत ज्या मिलमध्ये काम करत होते तेथेही स्मारक उभे करावे यासाठी पाठपुरावा केला जाईल.'' 
प्रा. सकटे यांनी बहुजन समता पार्टीच्या महाअधिवेशनातील पार्श्‍वभूमी सांगितली. अधिवेशनासाठी सांगली आणि परिसरातून कार्यकर्ते उपस्थित होते. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT