crime news 
पश्चिम महाराष्ट्र

अर्रार्र! कोरोनाच्या सर्व्हेसाठी गेलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यास जीवे मारण्याची धमकी 

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : शहरात कोरोनाविषयी जनजागृती करणाऱ्या वैद्यकीय पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना शहानवाज इब्राहिम शेख (रा. साईनाथ नगर, अमन हॉटेल जवळ) याने जीवे मारण्याची धमकी दिली. महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी सागर गुरुसिध्दप्पा हिप्परगी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शेख याच्याविरुध्द विजापूर नाका पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

महापालिकेचे आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी मंगळवारी (ता. 23) साईनाथ नगर भाग-3, नई जिंदगी परिसरात कोरोना आजाराच्या पार्श्‍वभूमीवर सर्व्हे करीत होते. त्यावेळी आरोपी शेख त्याठिकाणी आला आणि तुम्ही कोरोनाच्या नावाखाली दहशत निर्माण करीत असल्याप्रकरणी विचारपूस करु लागला. पुन्हा तुम्ही याठिकाणी दिसलात तर सोडणार नाही, तुम्हाला मारुन टाकेन, अशी धमकीही त्याने त्यांना दिली. व्हिडिओ शुटिंग काढून सोशल मिडियावर टाकतो म्हणत दमदाटी केली. सरकारी कामात त्याने अडथळा आणल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. 


मागील भांडणाच्या रागातून जीवे मारण्याचा प्रयत्न 
सोलापूर : घराशेजारी राहणाऱ्या सिध्दू शशिकांत सुतार, शशिकांत सुतार, सविता सुतार (रा. दत्त मंदिरजवळ, शास्त्री नगर) यांनी मिळून मागील भांडणाच्या रागातून मुलाला लाथाबुक्‍क्‍याने मारहाण केली. त्यानंतर सिध्दू सुतार याने त्याच्याकडील चाकूने छातीत वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. अशी फिर्याद अंबिका लक्ष्मण झंपले यांनी सदर बझार पोलिसांत दिली आहे. ही घटना मंगळवारी (ता. 23) दुपारी दोनच्या सुमारास घडली. झंपले यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार तिघांविरुध्द कलम 307 यासह अन्य कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


पोलिसांना धक्‍काबुक्‍की करणाऱ्यांविरुध्द गुन्हा 
सोलापूर : तक्रारीच्या अनुषंगाने पोलिस ठाण्यात आणलेल्या आरोपींनी पोलिस कर्मचाऱ्यांशी हुज्जत घातली. नाना बेशा शिंदे यांची कॉलर पकडून धक्‍काबुक्‍की केली. त्यानंतर हुज्जत घालून सर्वजण तेथून ते पळून गेले. या प्रकरणी शिंदे यांच्या फिर्यादीनुसार अंबादास मारुती गायकवाड, सुरेखा अंबादास गायकवाड, अरुणा अशोक जाधव (सर्वजण रा. पटवर्धन चाळ, वांगी रोड) यांच्याविरुध्द शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी सातजणांविरुध्द गुन्हा 
सोलापूर : सार्वजनिक वर्गणीचा हिशोब व्यवस्थीत द्या, नाहीतर तुम्हाला ठार मारतो, अशी आरोपींनी धमकी दिल्याची फिर्याद प्रमोद गायकवाड यांनी सदर बझार पोलिसांत दिली. सार्वजनिक वर्गणी व जमा-खर्चाच्या हिशोबावरुन आरोपी सागर सिध्दार्थ शिरसे, सुरज गौतम कांबळे, अतुल मिलिंद कांबळे, रिक्‍की मुकुंद शिवशरण, निखील अप्पासाहेब शिवशरण, राहूल अप्पासाहेब शिवशरण, मुकूंद रामचंद्र शिवशरण (सर्वजण रा. सिध्दार्थ हौसिंग सोसायटी) यांनी सर्वांनी मिळून बौध्द विहारच्या गेटजवळ लाथाबुक्‍क्‍यासह दगडाने मारहाण केल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. त्यानुसार पोलिसांनी सातजणांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anil Ambani Assets Seized : ईडीची अनिल अंबानींविरोधात सर्वात मोठी कारवाई; मुंबई, पुण्यासह देशभरातील हजारो कोटींची संपत्ती जप्त

Arjun Sonawane : धनुर्विद्येतील 'अर्जुन' हरपला! राष्ट्रीय पदकविजेता खेळाडू अर्जुन सोनवणेचे अपघाती निधन

Mumbai News: ...तर केवळ पहिलीपासून हिंदीला विरोध! नागरिकांच्या प्रतिसादानंतर समिती अध्यक्षांची माहिती

Stock Market Opening Bell : नोव्हेंबरची सुरुवात घसरणीने! पण बाजारात पुन्हा तेजीचा सूर? जाणून घ्या शेअर बाजारातील घडामोडी

Gold Rate Today: खुशखबर ! आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोने झाले स्वस्त, जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचा ताजा भाव

SCROLL FOR NEXT