NCP
NCP 
पश्चिम महाराष्ट्र

Loksabha 2019 : नगरच्या बैठकीत शरद पवारांचा राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना कानमंत्र

सकाळवृत्तसेवा

नगर : "सर्वांनी आघाडीच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी एकजुटीने काम करा. महाआघाडीचा धर्म पाळा,'' असा कानमंत्र राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पदाधिकाऱ्यांना दिला. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर आज त्यांनी पदाधिकाऱ्यांची चार तास प्रदीर्घ बैठक घेतली. 

विधानसभा मतदारसंघनिहाय घेतलेल्या बैठकीत थेट तालुका पातळीवरील पदाधिकाऱ्यांशी त्यांनी हितगूज केले. जिल्ह्यातील रणनीती आखण्यासाठी पवार यांनी हॉटेल राज पॅलेसमध्ये पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्या वेळी त्यांनी थेट तालुका पातळीवरील कार्यकर्त्यांशी संवाद साधला. तालुक्‍यातील वस्तुस्थितीचे प्रश्‍न विचारत एकूण स्थितीचा अंदाजही घेतला. 

पवार यांचे ठीक तीन वाजता नगरमध्ये आगमन झाले. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, राष्ट्रवादीचे नेते अंकुश काकडे, आमदार जितेंद्र आव्हाड, माजी मंत्री मधुकर पिचड, आमदार अरुण जगताप, संग्राम जगताप, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांच्यासह जिल्ह्यातील आमदार, माजी आमदार, पदाधिकारी उपस्थित होते. 
अकोले- संगमनेर, त्यानंतर संगमनेर, कोपरगाव, शिर्डी, श्रीरामपूर-राहुरी, कर्जत-जामखेड, नेवासे, शेवगाव-पाथर्डी, श्रीगोंदे-नगर, राहुरी-नगर, अहमदनगर अशी मतदारसंघनिहाय पदाधिकाऱ्यांची बैठक पवारांनी घेतली. 

पवारांच्या प्रश्‍नांची सरबत्ती 
बूथ कमिटीची स्थिती काय? कमिटीच्या कामावर जोर लावा. वातावरण कसे आहे? तालुक्‍यात पंचायत समिती व जिल्हा परिषदेत असलेले बलाबल कसे? मागील निवडणुकीत आघाडीच्या उमेदवाराची स्थिती? यंदा एकूण किती मतदान? सध्या काय तयारी आहे, असे प्रश्‍न विचारत आघाडीचे उमेदवार विजयी होण्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकदिलाने काम करण्याचा सल्ला पवारांनी दिला.

ढोल-ताशांच्या गजरात पक्षप्रवेश 
आमदार शिवाजी कर्डिले यांचे पुतणे रोहिदास व देविदास कर्डिले यांनी पवार यांच्या उपस्थितीत ढोल-ताशांच्या गजरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. 

उत्तरेतील वावटळ दक्षिणेत टिकणार नाही 
उत्तरेतील आलेली वावटळ दक्षिणेत टिकणार नाही, अशी विखेंवर टीका करत आमदार संग्राम जगताप यांच्या विजयासाठी पाथर्डी, राहुरी, पारनेर, श्रीगोंदे तालुक्‍यातून जास्तीत-जास्त मतदान घडवून आणू, असा विश्‍वास रोहिदास कर्डिले यांनी बैठकीत व्यक्त केला.  
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT