Merchant reacher, farmers poor; The brother who will fall will suffer a great loss because of the purchase of grap 
पश्चिम महाराष्ट्र

व्यापारी मालामाल, शेतकरी कंगाल; पडेल त्या भावाने द्राक्षांच्या खरेदीमुळे अतोनात नुकसान

सदाशिव पुकळे

झरे (जि. सांगली) ः झरे परिसरात द्राक्षांची पुडेल भावाने खरेदी व्यापारी करीत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत आहे. द्राक्षाला जादा दर का नाही असे विचारले असता?, कोरोना आहे त्यामुळे पुढे मार्केटमध्ये द्राक्षे कोणी घेत नाही असे व्यापाऱ्यांकडून सांगितले जाते आणि कमी दराने द्राक्षाची खरेदी केली जाते. 

आटपाडी पश्‍चिम भाग झरे परिसर म्हटलं की दुष्काळ डोळ्यापुढे उभा राहतो. परंतु टेंभू योजनेचे पाणी काही भागामध्ये आल्याने अनेक सुशिक्षित शेतकऱ्यांनी द्राक्ष बागेकडे कल वळवला आहे. त्यामुळे द्राक्ष बागेचे प्रमाण वाढू लागले आहे. परंतु व्यापारी दर पाडून द्राक्षे खरेदी करीत असल्याने शेतकऱ्यांचा बागेसाठी घातलेला खर्चसुद्धा निघेना अशी परिस्थिती झाली आहे. 

टेंभूचे पाणी आल्याने द्राक्षबाग, ऊस, आंबा, डाळिंब, सीताफळ व अन्य फळबागा शेतकरी लागण करीत आहे. परंतु काही ठिकाणी आंब्याची रोग असणारी रोपे नर्सरीतून येत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक होत आहे. द्राक्ष बागांचे प्रमाण वाढले आहे सध्या बेदाणा शेतकरी बनवण्यासाठी दुर्लक्ष करीत आहे. द्राक्षे विकून जे पैसे मिळतील त्यामध्ये तो समाधान मानत आहेत. 

बेदाणा बनवायचां म्हटले तर आणखी खर्च वाढला, त्यानंतर त्या बेदाण्याला दर मिळतोय का नाही, याची धास्ती आहे. त्यामुळे प्रत्येक शेतकरी कमी-जास्त का दर असेना परंतु द्राक्षे विकण्यावर भर देत आहे. याचाच फायदा व्यापाऱ्यांनी उठवला आहे. आणि जिथे 40 रुपये ते 60 रुपयांपर्यंत मिळणारा दर व्यापाऱ्यांनी ते पंचवीस ते 30 रुपयांवर आणला आहे. सध्या जास्तीत जास्त 20 ते 35 रुपयांपर्यंत द्राक्ष खरेदी करीत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचा घातलेला खर्च तरी निघतोय का नाही यात शंका आहे. 

व्यापाऱ्यांवर व द्राक्षाच्या दरावर कोणाचेही नियंत्रण नाही. त्यामुळे व्यापारी जमेल त्या दराने द्राक्षे खरेदी करीत आहेत. व्यापाऱ्यांवर नियंत्रण असायला पाहिजे अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.  

संपादन : युवराज यादव 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur News: सुंच आठ वर्षांपासून चालवत होता किडनी विक्रीचे रॅकेट; एका किडनीमागे सव्वा कोटी, मुलीच्या वडिलांनीही दिला होता नकार!

Viral Video : रोहित भाऊ, वडापाव खाणार का? प्रेक्षकांमधून मिळाली आवडत्या पदार्थाची ऑफर; भारी होती हिटमॅनची रिअ‍ॅक्शन

Shukra Gochar 2026: वर्षाच्या पहिल्याच गोचरमध्ये ‘या’ राशींचं नशीब फुलणार, करिअरला मिळणार मोठी उंची

Vijay Hazare Trophy : पहिल्याच दिवशी २२ शतकं, गोलंदाजांची धुलाई; फलंदाजांनी मोडले अनेक विक्रम

पहिल्याच सामन्यात शतक, आता विराट कोहली, रोहित शर्मा यांचा Vijay Hazare Trophy मधील पुढील सामना कधी? वाचा सर्व डिटेल्स

SCROLL FOR NEXT