MIDC Regional Officer Arrested In Bribe Case In Sangli 
पश्चिम महाराष्ट्र

पाच हजारांची लाच घेताना एमआयडीसी प्रादेशिक अधिकारी जाळ्यात 

सकाळ वृत्तसेवा

सांगली - कन्सेंट प्रमाणपत्रासाठी पाच हजारांची लाच घेतल्याप्रकरणी औद्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी स्वाती संतोष शेंडे (वय 43, रा. विश्रामबाग, मूळ रा. विटा) यांच्यासह तिघांना आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. सहायक क्षेत्र व्यवस्थापक सुभाष मारूती माळी (53, रा. एमआयडीसी, कुपवाड) आणि कंत्राटी लिपीक सुनील भुपाल कुरणे (30, रा. विजयनगर, मूळ रा. म्हैसाळ) अशी अन्य दोघांची नावे आहेत. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज सायंकाळी एमआयडीसीच्या कार्यालयात ही मोठी कारवाई केल्याने शहरात खळबळ उडाली आहे. 

कारवाईबाबत या विभागाने दिलेली माहिती अशी - तक्रारदार यांनी त्यांच्या पत्नीच्या नावाने कडेगाव येथे औद्योगिक विकास महामंडळाचा प्लॅट 95 वर्षांच्या कराराने घेतला आहे. तेथे बांधकाम केले आहे. उद्योगास आवश्‍यक कच्चा माल खरेदी करण्यासाठी तक्रारदार यांच्या पत्नीस बॅंक ऑफ महाराष्ट्रातून कर्ज मंजूर झाले आहे. या कर्जाची रक्कम मिळण्यासाठी औद्योगिक विकास महामंडळ यांच्याकडून कन्सेंट प्रमाणपत्राची गरज होती. तक्रारदार यांनी आवश्‍यक कागदपत्रांची पूर्तता करून अर्ज केला होता. त्यानुसार त्यांना प्रमाणपत्र देण्यात आले. 

लाच घेताना शेंडे ताब्यात

दरम्यान, तक्रारदार आणि त्यांची पत्नी दोघेही सोमवारी (ता.9) त्रैवार्षिक करार करण्यासाठी येथील एमआयडीसी कार्यालयात गेले होते. कन्सेंट प्रमाणपत्र दिल्याच्या मोबदल्यात बक्षीस म्हणून प्रादेशिक अधिकारी स्वाती शेंडे पाच हजार रूपये द्यावे लागतील, अशी मागणी लिपीक सुनील कुरणे याने केली. त्यानंतर तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयात तक्रार दिली. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर लिपीक सुनील कुरणे, सहायक क्षेत्रपाल सुभाष माळी यांच्यासह प्रादेशिक अधिकारी स्वाती शेंडे यांनी लाचेची मागणी केल्याचे निषन्न झाले. त्यानुसार आज सापळा रचण्यात आला. तक्रारदार यांच्याकडून पाच हजार रूपये घेताना शेंडे यांना ताब्यात घेण्यात आले. त्याच्यासह माळी आणि कुरणेविरोधात विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. 

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक राजेश बनसोडे, अप्पर अधीक्षक सुषमा चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली उप अधीक्षक राजेंद्र साळुंखे, निरीक्षक गुरूदत्त मोरे, प्रशांत चौगुले, जितेंद्र काळे, संजय कलकुटगी, संजय संकपाळ, अविनाश सागर, राधिका माने, अश्‍विनी कुकडे, भास्कर भोरे, रवींद्र धुमाळ, श्रीपती देशपांडे, बाळासाहेब पवार यांनी कारवाईत भाग घेतला. 

तक्रारीसाठी टोल फ्री क्रमांक 

लाच मागणाऱ्यांविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागास तक्रार द्या. याशिवाय 1064 या टोल फ्री क्रमांकावरही तक्रार देता येऊ शकते, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

New ST Buses Decision : सतेज पाटलांनी मागणी करताच राज्य सरकार नवीन आठ हजार एसटी बसेसची खरेदी करणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

Nagpur Street Food Price Hike : इराण-इस्रायल युद्धाचा नागपूरकरांना झटका! उद्यापासून तर्री पोहे आणि समोसा खाणे महागणार; पाहा काय आहेत नवीन दर?

Women Cricket: क्रिकेटमधील महिलांचा उत्साह दुपटीने वाढला; भारतातील १४ राज्यांचा सर्व्हे, युवा खेळाडूंची पावले सरसावली

Rural LPG Crisis News:गॅस टंचाईमुळे ग्रामीण भागात पुन्हा पेटल्या चुली; महिलांची अडचण वाढली; धूरमुक्त स्वयंपाकघर पुन्हा धुरकट

कसं झालेलं दादा कोंडके यांचं निधन? महाराष्ट्राच्या 'सोंगाड्या'च्या मृत्यूचं कोडं कधीच सुटलं नाही

SCROLL FOR NEXT