MIDC will pick up speed from Monday
MIDC will pick up speed from Monday 
पश्चिम महाराष्ट्र

एमआयडीसी सोमवारपासून रफ्तार पकडणार 

सकाळ वृत्तसेवा

नगर ः ""एमआयडीसीतील कामगारांच्या बाबतीत प्रशासनाने दिलासादायक निर्णय घेतला. त्यामुळे एमआयडीसीतील बोटावर मोजण्याइतके अर्थात दहा टक्के लघू उद्योजकांनी आपल्या कामाचा श्रीगणेशा केला आहे. मोठे उद्योगही सोमवारपासून सुरू करण्याचा बहुतांश उद्योजकांचा मानस आहे. परंतु मोठ्या उद्योजकांना कामगारांसाठी बसची व्यवस्था करताना दमछाक होणार आहे.

उद्योजकांना ये-जा करण्यासाठी चारचाकी वाहनाच्या परवानगीसाठी प्रयत्न सुरू असून, लवकरच यावर तोडगा निघेल, अशी अपेक्षा आहे,'' अशी माहिती "एल अँड टी'चे सरव्यवस्थापक अरविंद पारगावकर यांनी दिली. 

पारगावकर म्हणाले, ""एमआयडीसीतील उद्योग गेल्या महिनाभरापासून बंद असल्याने मशिनचे मेंटेनन्स करण्यासाठी वेळ जाणार आहे. त्यातच प्रशासनाने कामगारांच्या ये-जा करण्याची अट रद्द केली असली, तरी बसची व्यवस्था करण्याचे उद्योजकांना नियोजन करावे लागणार आहे.

उद्योजकांना ये-जा करण्यासाठी वाहनांची परवानगी द्यावी, यासाठी एमआयडीसीतील अधिकारी प्रशासनाशी चर्चा करीत आहेत. एमआयडीसीत साधारणतः दहा हजार कर्मचारी काम करीत आहेत. "एल अँड टी'मध्ये एक हजार 500 कर्मचारी काम करतात. मात्र, सुरवातीला काही कामगारांना आणून सुरवात करण्यात येईल, तरी सर्व काम सुरळीत होण्यासाठी एक महिन्याचा कालावधी जाईल.'' 

सीमाबंदीची अडचण 
एमआयडीसीतील बहुतांश उद्योजकांना राज्य, जिल्ह्याबाहेरून कच्चा माल आणण्यासाठी सीमाबंदीची अडचण येणार आहे. सुरवातीला आम्ही काही उद्योजक ऑफिस सुरू करून मशिन मेंटेनन्सचे नियोजन करत आहोत. त्यानंतर उद्योग सुरू करण्याबाबत विचार करणार आहोत, अशी माहिती असोसिएशन ऑफ अहमदनगर मन्युफॅक्‍चरिंग इंडस्ट्रीजचे (आमी) संस्थापक अशोक सोनवणे यांनी दिली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT