कोपरगाव : टंचाईमुळे एकीकडे पालिका शहरात सहा दिवसांआड पाणीपुरवठा करते. असे असताना शहरातील शिंदे-शिंगीनगर भागातील टाकी "ओव्हर-फ्लो' झाल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले. मुख्याधिकारी, अधिकारी व व्हॉल्व्हमन याबाबत अनभिज्ञ होते. पत्रकारांनी माहिती दिल्यावर पालिकेची यंत्रणा खडबडून जागी झाली.
हेही वाचा- कर्जमाफीत व्याजाचा भुर्दंड सेवा संस्थांवर नको : तनपुरे
पालिकेच्या टाकीच्या "ओव्हर-फ्लो' चेंबरमधून तब्बल 10 ते 15 फूट उंच पाणी बाहेर पडत होते. नेमके हे पाणी कुठून जात आहे, हेच अधिकारी-कर्मचाऱ्यांना समजत नव्हते. कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांना मोबाईलवरून चुकीची माहिती देत वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला. या भागातील कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे लाखो लिटर पाणी वाया गेले.
मुख्याधिकारी, अधिकारी व व्हॉल्व्हमन अनभिज्ञ
दिवसभर पाण्याची अशी नासाडी सुरू असताना, पालिकेच्या व्हॉल्व्हमॅनपासून ते मुख्याधिकाऱ्यांपर्यंत कोणालाही याची कल्पना नव्हती. त्यामुळे पाण्याबाबत पालिका प्रशासन किती सतर्क आहे, हे दिसून आले. लाखो लिटर वाया जाणारे पाणी टाकीजवळ जाऊनही कर्मचाऱ्यांना दिसले नाही. अखेर पाणीपुरवठा विभागाच्या अभियंत्यांनी टाकीचा पाणीपुरवठा मुख्य जलवाहिनीवरून बंद केला. त्यानंतर ही गळती थांबली.
ठळक बातमी- गोदावरीच्या चारच आवर्तनांवर बोळवण
प्रशासनाला पाण्याचे महत्त्व नाही
शहरात विक्रमी 23 दिवसांआड पाणीपुरवठा करणाऱ्या पालिका प्रशासनाला अजूनही पाण्याचे महत्त्व कळलेले नाही. त्यामुळे अशा प्रकाराकडे गांभीर्याने पाहिले जात नाही. वाहिनीच्या लिकेजच्या नावाखाली लाखो रुपयांची बिले काढली जातात. या सर्वांत भरडला जातो तो सामान्य कोपरगावकरच..!
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.