Minister Awhad thinks CAA is the birth of Manusmriti 
पश्चिम महाराष्ट्र

मंत्री आव्हाडांना वाटतंय, सीएए म्हणजे मनुस्मृतीचा जन्म 

अमित आवारी

नगर : ""सुधारित नागरिकत्व कायद्याच्या विरोधातील आंदोलनाला कृपया कोणीही रंग देऊ नका. या कायद्याचा फटका सर्व धर्मांतील नागरिकांना बसणार आहे. या कायद्याचे सर्वाधिक परिणाम हिंदू धर्मीयांना सहन करावे लागणार आहेत. त्यामुळे ही लढाई इन्सान व इन्सानियतसाठीची लढाई आहे,'' असे राज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आज स्पष्ट केले.

पुरोगामी नेत्यांची हजेरी 
राष्ट्रीय नागरिकत्व कायद्याविरोधी राज्यव्यापी जनजागृती सभा नगरच्या कोठला परिसरातील ईदगाह मैदानावर आज सायंकाळी झाली. त्या वेळी आव्हाड बोलत होते. कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस विनायक देशमुख, आमदार संग्राम जगताप, माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील, आमदार लहू कानडे, नदीम सिद्धीकी, मौलाना इशाद इल्ला मगदुमी, सोमनाथ जंगम महाराज, भन्ते सुमेद बोधी, बाळासाहेब मिसाळ, संजीव भोर, अशोक गायकवाड, रेव्हरंड तेजपाल उजागरे आदी उपस्थित होते. 

आम्हाला शिक्षणाचा अधिकार नव्हता 
आव्हाड म्हणाले, ""मुसलमानांकडे 500 वर्षे जुनी कागदपत्रे सापडतात. त्यांच्या विवाहाच्या नोंदीही असतात. हिंदू धर्मातील शूद्र वर्णात शिक्षणाचाच अधिकार नव्हता. त्यांच्याकडे कोणतीही जुनी कागदपत्रे नाहीत. बहुजन समाज शिक्षण घेऊन पुढे येत आहे. त्यांना मागे खेचण्यासाठी हा कायदा आहे. शिक्षणाने सर्वांना मानसिक समानता दिलेली नाही. मी त्या आईच्या पोटी जन्माला आलो, जिला जातीय भेदभावाची शिकार व्हावे लागले.'' 

इतके दिवस तिरंगा का फडकावित नव्हते 
नगर शहरात चांदबीबी, शाहशरीफ दर्गा आहे. यात धार्मिक व स्त्री-पुरुष समानतेचा इतिहास आहे. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी "डिस्कव्हरी ऑफ इंडिया' ग्रंथ येथेच लिहिला. मौलाना अबूल कलाम आझाद, नेहरू, आचार्य कृपलानी यांच्यासारखे 14 सर्वधर्मीय नेते या किल्ल्यात इंग्रजांनी कैदेत ठेवले होते. आमचे पूर्वज इंग्रजांशी लढले, त्या वेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे लोक कुठे होते? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा राष्ट्रध्वज तिरंग्याला विरोध होता. म्हणून त्यांच्या कार्यालयावर स्वातंत्र्यानंतर 45 वर्षांत तिरंगा फडकावण्यात आला नव्हता, असा आरोप आव्हाड यांनी केला. 


देश गंभीर आर्थिक स्थितीत अडकला आहे. त्यातून लक्ष विचलित करण्यासाठी हा कायदा आणला आहे. नोटाबंदीच्या वेळी आम्ही रांगेत उभे राहिलो; पण आता नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी आम्ही रांगेत उभे राहणार नाही. त्यांना बुद्धिवाद मिटवायचा आहे. कारण बुद्धिवादी लोक त्यांचा खरा चेहरा दाखवितात. त्यामुळे विद्यापीठांवर हल्ले होत आहेत. या प्रवृत्तींविरोधात आता विद्यार्थीच उभे राहिले आहेत, असे आव्हाड यांनी सांगितले. 

जय भीम घोषणा इंजेक्‍शन आहे 
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृतीचे दहन करून देशातील भेदभाव नष्ट केला होता. नागरिकत्व कायदा म्हणजे दुसऱ्या मनुस्मृतीचा जन्म आहे. यातून वर्णव्यवस्थेच्या तळाशी असलेल्यांना देशातून हद्दपार करण्याचा प्रयत्न होत आहे. हे आरक्षण संपविण्याचे षङ्‌यंत्र आहे. जयभीम घोषणा हे इंजेक्‍शन आहे, असे मत जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केले. 


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Trump wishes Modi : ट्रम्प यांनी केला मोदींना फोन दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा अन् म्हणाले...

High Court Decision : उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय! अवैध विवाह संबंधातून जन्मलेल्या मुलाला वडिलांच्या मालमत्तेत वाटा मिळण्याचा हक्क

Athletics Championships: छत्रपती शिवाजी महाराज की जय! चीनमध्ये सर्वेश कुशारेची जागतिक मैदानी स्पर्धेत अभिमानास्पद कामगिरी

Israel-Gaza War: इस्राईलकडून गाझा शहरात लष्करी कारवाईला सुरुवात; नागरिकांना दक्षिणेकडे निघून जाण्याचं आवाहन

Devendra Fadnavis: ''मी शंभर रुपये द्यायला तयार आहे, पण...'' उद्धव ठाकरेंच्या भाषणावरुन फडणवीसांचं आवाहन

SCROLL FOR NEXT