पश्चिम महाराष्ट्र

खासदार न झाल्याची सदाभाऊ खोतांना खंत 

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर - आम्ही ठरवून हातकणंगले लोकसभा मतदार संघात उभी-आडवी पेरणी केली. गेली दोन वर्षे या मतदार संघात मी बहुजनांचा खासदार करण्याचा विचार पेरत होतो. यासाठी मतदार संघात चांगली बांधणी केली होती. मशागत केली, पेरणी केली. मात्र पिक दुसऱ्यानेच कापले. माझी मनापासून लोकसभा निवडणूक लढण्याची इच्छा होती मात्र ते झाले नाही, अशा शब्दात कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी खंत व्यक्त केली.

निवडणुकीच्या निकालानंतर मंत्री खोत यांनी सकाळ कार्यालयास भेट देत भावना व्यक्‍त केल्या. ते म्हणाले, माजी खासदार राजू शेट्टी यांनी माझ्या विरोधात मोठी तज्ञांची चौकशी समिती नेमली होती. सर्व युनोतील तज्ञ होते. त्यांनी मला संघटनेतून काढून टाकले. माझी मरेपर्यंत संघटना सोडयाची इच्छा नव्हती. मात्र या कमिटीने निर्णय घेतला. हा निर्णय मान्य असल्याची शेट्टी यांनी मान्यता दिली. या निर्णयाने माझा आत्मसन्मान दुखावला. तेव्हापासून हातकणंगले लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवायचे असा मी निर्णय घेतला होता. यासाठी दोन वर्षे खूप तयारी केली. सर्व वातावरण तयार करण्यात यश मिळाले. मात्र धैर्यशील माने हा मोठे भाग्य घेवून आला. असं भाग्य कोणाला मिळत नाही. माने यांनी उमेदवारी घेतली. त्यांच्या मागे आम्ही ठामपणे उभे राहिलो. ते निवडून आले. मात्र मला अजूनही खासदारकीच लढवायचे आहेत, असे सांगत भविष्यात आपण लोकसभा निवडणूकच लढणार असल्याचे मंत्री खोत यांनी स्पष्ट केले. 

राजू शेट्टी ही व्यक्‍ती प्रचंड धोरणी आहे. मात्र त्यांची त्यांच्याच बगलबच्च्यांनी फसवणूक केली. दिशाभूल केली  त्यांच्या विजयाचा गुलाला आम्हीच लावला आणि त्यांच्या पराभवाचा गुलालही आम्हीच लावला. यातूनच सर्वच नेत्यांना एक संदेश आहे, तो म्हणजे सर्वसामान्य कार्यकर्त्यांना अंतर दिल्यास काय होते, त्याचा हा परिणाम आहे.

- सदाभाऊ खोत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT