Shinde-Thackeray Group Dispute Over Welcome Arch esakal
पश्चिम महाराष्ट्र

Miraj Ganeshotsav : ठाकरे सेनेच्या कमानीवर गुवाहाटीचे चित्र; शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांचा आक्षेप, वाद चिघळण्याची शक्यता

स्वागत कमानीवरील छायाचित्रांवर शिंदे गटाने आक्षेप घेतला आहे.

सकाळ डिजिटल टीम

पोलिसांनी हस्तक्षेप करीत शिंदे गटाला स्वागत कक्ष, तर ठाकरे गटाला स्वागत कमान देऊन समझोता केला.

मिरज : शिंदे-ठाकरे गटाच्या (Shinde-Thackeray Group) स्वागत कमानीने (Welcome Arch) संघर्षाची ठिणगी शहरानंतर मिरज तालुक्यातही पडली आहे. स्वागत कमानीवरील देखाव्यास शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख महेंद्र चांडाळ, मिरज शहरप्रमुख किरणसिंग रजपूत यांनी आक्षेप घेत विरोध दर्शवला आहे. स्वागत कमानीवरील छायाचित्रांवर आक्षेप घेतला आहे.

शहरातील संघर्ष मिरज तालुक्यातही पाहण्यास मिळत आहे. सुभाषनगर येथे ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख संजय काटे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात उभारलेल्या स्वागत कमानीवर ‘यावर होऊदे चर्चा...’ मथळ्याखाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाची बंडखोरीसह गुवाहाटीतील बैठक, मणिपूर येथील हिंसाचार व दिल्ली येथील कृषी कायद्याविरोधात झालेल्या शेतकरी आंदोलनाचे चित्र रेखाटले आहे.

मात्र या कमानीवर शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष महेंद्र चांडाळ, मिरज तालुकाप्रमुख किरणसिंग राजपूत यांनी आक्षेप घेतला आहे. मिरजेत गतवर्षी स्वागत कमानीच्या जागेवरून संघर्ष निर्माण झाला होता. पोलिसांनी हस्तक्षेप करीत शिंदे गटाला स्वागत कक्ष, तर ठाकरे गटाला स्वागत कमान देऊन समझोता केला.

यंदा पुन्हा शिंदे गट स्वागत कमान उभारणार असून मिरजेत महात्मा गांधी उद्यानासमोर कमानीची जागा निश्चित केली आहे. या कमानीसमोर किल्लाभाग येथील रस्त्यावर ठाकरे गटाला स्वागत कमानीसाठी परवानगी दिली आहे. यंदाही कमानी लक्षवेधी ठरत असून त्‍याच्‍यावरून नागरिकांना संदेश देण्‍याचा प्रयत्‍न संबंधित कार्यकर्त्यांकडून होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT