मिरज : पंढरपूर-यशवंतपूर शुक्रवारपासून धावणार Sakal
पश्चिम महाराष्ट्र

मिरज : पंढरपूर-यशवंतपूर शुक्रवारपासून धावणार

म्हैसूर-निजामुद्दीन सुपरफास्ट शनिवारपासून येणार रुळावर

सकाळ वृत्तसेवा

मिरज : विठ्ठलाच्या दर्शनाची ओढ लागलेल्या वारकऱ्यांसह विठ्ठल भक्तांसाठी खूशखबर आहे. गेली दोन वर्षांपासून बंद असलेली यशवंतपूर-पंढरपूर ही साप्ताहिक एक्स्प्रेस शुक्रवारपासून धावणार आहे. प्रत्येक आठवड्याच्या शुक्रवारी सकाळी ९ वाजता मिरज स्थानकातून ती सुटेल; तर पंढरपूर येथे ११ वाजून २५ मिनिटांनी पोहोचेल. मिरज-पंढरपूर मार्गावरील सांगोला स्थानकावरच या गाडीस थांबा देण्यात आला आहे.

शुक्रवारी एकाच दिवशी पंढरपूरकडे जाण्यासाठी मिरजेतून तीन गाड्या उपलब्ध आहेत. यामध्ये पहाटे मिरजेतून धावणारी कोल्हापूर-धनबाद, यशवंतपूर-पंढरपूर या गाड्या शुक्रवारी सुटतात; तर कोल्हापूर-नागपूर गाडी आठवड्यातून सोमवारी आणि शुक्रवारी सुटते. याशिवाय म्हैसूर-निजामुद्दीन एक्स्प्रेस (क्र. ०६२१५) ही गाडीही शुक्रवारपासून (ता. १२) धावू लागणार आहे.

ही गाडी शनिवारी (ता. १३) सकाळी मिरजेत पोहोचेल. येथून १० वाजून २० मिनिटांनी ती पुढे रवाना होईल. नंतर सांगली-१०.३५, कराड-११.४०, सातारा-१२.४० आणि पुणे स्थानकात ४.१० वाजता पोहोचेल. तसेच हजरत निजामुद्दीन स्थानकावर तिसऱ्या दिवशी सायंकाळी ५.५० वाजता पोहोचेल.

परतीच्या प्रवासात हजरत निजामुद्दीन गाडी (क्र. ०६२१६) १५ नोव्हेंबरपासून प्रत्येक सोमवारी पहाटे ५.१० वाजता सुटून दुसऱ्या दिवशी पुणे स्थानकात ०६.४०, सातारा- ०९.३०, कराड- १०.२५, सांगली १०.३५; तर मिरज स्थानकात १२.१० वाजता पोहोचेल. ही गाडी हासन, अरसिकेरे, बिरूर, दावणगिरे, हरिहर, राणीबेन्नूर, हावेरी, हुबळी, धारवाड, बेळगाव, मिरज, सांगली, कराड, सातारा, पुणे, दौंडकार्ड, अहमदनगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, खांडवा, इटारसी, भोपाल, बीना, झांसी, ग्वाल्हेर, आगरा कैंट आणि मथुरा या स्थानकांवर थांबेल.

‘कोल्हापूर-गोंदिया’ चे एसी कोच वाढवले

दिवाळी गर्दीच्या अनुषंगाने कोल्हापूर-गोंदिया गाडीस रेल्वे प्रशासनाकडून एक थ्री टियर आणि टू टियर एसी कोच ११ ते २२ नोव्हेंबरपर्यंत अतिरिक्त जोडण्यात येणार आहेत. गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.

एसटी संपामुळे रेल्वेला गर्दी

राज्य परिवहन कर्मचाऱ्यांच्या संपामुळे मिरज रेल्वे स्थानकावर प्रवाशांनी गर्दी केली होती, गेली दोन दिवस संप सुरूच असल्यामुळे तिकीट खिडकीसह स्थानकाबाहेर प्रवाशांची गर्दी पाहण्यास मिळाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT