Sanjay Patil Lakshmi Hebbalkar
Sanjay Patil Lakshmi Hebbalkar esakal
पश्चिम महाराष्ट्र

Sanjay Patil : काँग्रेस आमदारासह 'हा' नेता भाजपात प्रवेश करणार; माजी आमदारानं फोडला राजकीय बॉम्ब

सकाळ डिजिटल टीम

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातलं राजकारण चांगलंच तापलंय.

बेळगाव : कर्नाटकात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातलं राजकारण चांगलंच तापलंय. त्यातच आता भाजपच्या माजी आमदारानं मोठा गौप्यस्फोट केलाय. काँग्रेस (Congress) हे बुडणारं जहाज आहे. तर, भाजप हा उगवता सूर्य आहे. सर्वजण उगवत्या सूर्यासमोर नतमस्तक होतात. बुडत्या जहाजावर कोणीही चढत नाही, असं स्पष्ट मत माजी आमदार संजय पाटील यांनी व्यक्त केलंय.

काँग्रेस आमदार लक्ष्मी हेब्बाळकर (Lakshmi Hebbalkar) आणि त्यांचे बंधू चन्नराज हट्टीहोळी (Channaraj Hattiholi) हे दोघंही लवकरच भाजपमध्ये (BJP) प्रवेश करणार असल्याचं समजतं, असं सांगत माजी आमदार संजय पाटील (Sanjay Patil) यांनी पत्रकार परिषदेत राजकीय बॉम्ब टाकलाय.

काँग्रेस एमएलसी चन्नराज हट्टीहोळी यांनी बेळगावचे काही भाजप नेते काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचं सांगितलं होतं. त्यावर शनिवारी बेळगावात प्रतिक्रिया देताना भाजपचे माजी आमदार संजय पाटील यांनी, लक्ष्मी हेब्बाळकर आणि चन्नराज हट्टीहोळी हे दोघंही भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं वृत्त असल्याचं सांगितलं. भाजप हा उगवता सूर्य आहे, तर काँग्रेस हे बुडणारं जहाज आहे, बुडत्या जहाजावर कोणीही चढणार नाही. त्यामुळं पक्षात कोणाचा समावेश करायचा याचा निर्णय भाजप हायकमांड घेईल, असं सांगत त्यांनी नवा बॉम्ब फोडला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Dravid India coach : राहुल द्रविडनंतर कोण होणार टीम इंडियाचा कोच...? बीसीसीआयसमोर आहेत 'ही' तगडी नावं

Arvind Kejriwal : अरविंद केजरीवाल यांची तिहार तुरुंगातून सुटका, 1 जूनपर्यंत अंतरिम जामीन

Fact Check: लालकृष्ण अडवाणी राहुल गांधींना 'भारतीय राजकारणातील हिरो' म्हटले नाहीत, फेक पोस्ट व्हायरल

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंमुळे गोविंदाची उडाली तारांबळ; 20 मिनिटं हॉटेलबाहेर ताटकळत उभं राहावं लागलं

Brij Bhushan Singh : ब्रिजभूषण सिंह विरोधात सबळ पुरावे हाती! कोर्टाकडून आरोप निश्चित करण्याचे आदेश

SCROLL FOR NEXT