MLA Nitesh Rane esakal
पश्चिम महाराष्ट्र

भिवंडीत मस्जिदजवळ गणेश मूर्तीवर दगड मारला, आता त्यांचे विचारवंत कुठं दडून बसलेत? नीतेश राणेंचा स्पष्ट इशारा

MLA Nitesh Rane : आमच्या धर्माला आव्हान दिले जात आहे. मात्र, हिंदुत्ववाबाबत तडजोड होणार नाही.

सकाळ डिजिटल टीम

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान हे समान हक्काचे प्रतीक आहे. मग हा दुजाभाव का निर्माण होत आहे. याचे आत्म परीक्षण करण्याची वेळ आली आहे.

शिराळा : आमच्या धर्माला आव्हान दिले जात आहे. मात्र, हिंदुत्ववाबाबत तडजोड होणार नाही. हिंदूंची बाजू घेणे, हक्क मागणे म्हणजे दंगल घडवणे नव्हे. आमच्या मिरवणुकीकडे वाकड्या नजरेने पाहू नये. देवदेवतांच्या मिरवणुकीवर दगड मारणे आता चालणार नाही. ही दगड फेक बंद न झाल्यास तुमच्या मिरवणुकीवर येणाऱ्या दगडाचा हिशेब ठेवावा लागेल. आता आम्ही गप्प बसणार नाही. जो नियम मुस्लिम (Muslim Community) बांधवाना असेल तोच हिंदूंना असेल त्यावेळी हिंदू सखल मोर्चे दिसणार नाहीत, असा इशारा आमदार नीतेश राणे (Nitesh Rane) यांनी दिला.

शिराळा येथे आयोजित हिंदू जनआक्रोश मोर्चावेळी (Hindu Janakrosh Morcha) झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. मोर्चा अंबामाता मंदिर, मरिमी चौक, सोमवार पेठ, कुरणे गल्ली, पूल गल्ली, बस स्थानक मार्गे तहसील कार्यालयाजवळ आला. नंतर मोर्चाचे रूपांतर जाहीर सभेत झाले. व्यासपीठावर अनिल देवळेकर, सुनिल धुमाळ उपस्थित होते.

राणे म्हणाले, जे आमच्या बाबत दिल्लीला तक्रार करतात त्यांनी आपल्या गणपती मिरवणुकीवर दगड मारणाऱ्याबद्दल ही तक्रार करायला हवी. त्यांनी त्याचा निषेध करायला हवा होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान हे समान हक्काचे प्रतीक आहे. मग हा दुजाभाव का निर्माण होत आहे. याचे आत्म परीक्षण करण्याची वेळ आली आहे. आमची उंची मोजणाऱ्यांनी आमच्या नादी लागू नये.

MLA Nitesh Rane Hindu Janakrosh Morcha Shirala

भिवंडीमधील हिंदुस्तान मस्जिदजवळ गणेश मूर्तीवर दगड मारला. त्यांचे विचारवंत आत्ता कुठे दडून बसले आहेत. विशाळगडावर दगड, हत्यारे कुठून आली. तुमचा धर्म तुम्हाला जितका प्रिय आहे. तितकेच आमचे हिंदुत्व धगधगते आहे. प्रारंभी स्वामी भक्त सुनिल धुमाळ, कीर्तनकार अनिल देवळेकर यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी सत्यजित देशमुख,सम्राट महाडिक, सुखदेव पाटील, पृथ्वीसिंह नाईक,केदार नलवडे, सम्राट शिंदे, कुलदीप निकम उपस्थित होते.

ज्ञानेश महाराव यांना अटक करा

श्री राम प्रभू, स्वामी समर्थ यांच्यावरती ज्ञानेश महाराव याच्या कडून टीका करण्यात आली. त्यामुळे सकल हिंदू समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. काही लोक महंत रामगिरी महाराज यांच्या विरुद्ध संविधानाचे उल्लंघन करून आंदोलन करत आहेत. त्यांच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा व त्‍यांना अटक करावी.

दगडफेकीचा पवारांनी आक्षेप नोंदवला का?

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे तक्रार करणेची भूमिका हा त्यांचा पक्षीय विषय आहे. मात्र, आपली हिंदुत्वबाबत तडजोड नाही. पवार यांनी गणेश विसर्जन मिरवणुकीवर केलेल्या दगडफेकीबाबत निषेध, अक्षेप नोंदवला का? त्यांनी हे केले असते तर त्यांना तक्रारही करावी लागणार नसल्याचे त्‍यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Railways New Menu : रेल्वे मंत्रालयानं जाहीर केलेलं नवं ‘मेन्यू कार्ड’ तुम्ही पाहिलं का?

Latest Maharashtra News Updates : सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश

Who Is Jamie Smith? टीम इंडियाची झोप उडवणारा जेमी स्मिथ कोण? ज्याने केलीय १५० धावांची ऐतिहासिक खेळी, मोडले अनेक विक्रम...

२५ वर्षांनी झी मराठीवर दिसणार लोकप्रिय अभिनेत्री, कधीकाळी ठरलेली गाजलेली नायिका; नव्या मालिकेतून करणार कमबॅक

Eknath Shinde: पुण्यात 'जय गुजरात'ची घोषणा; मुंबईत सारवासारव, अमित शहांसमोर दिलेल्या नाऱ्यावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT