MLA P N Patil Activist Upset Due To Not Getting Ministry Kolhapur Marathi News  
पश्चिम महाराष्ट्र

मंत्रिपद न मिळाल्याने 'या' आमदारांचे कार्यकर्ते नाराज 

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर - राज्य मंत्रिमंडळात मंत्रिपद न मिळाल्याने नाराज झालेल्या आमदार पी. एन. पाटील यांच्या गटाचा मेळावा उद्या (ता. 1) फुलेवाडी नाक्‍यावरील अमृत हॉलमध्ये सकाळी 11 वाजता होणार आहे. श्री. पाटील यांना मंत्रिपद नाकारल्याने त्यांचे कार्यकर्ते आक्रमक असून उद्याच्या मेळाव्यात श्री. पाटील यांच्यासह त्यांच्या गटाची भुमिका स्पष्ट केली जाणार आहे. 

श्री. पाटील यांनी आतापर्यंत सहावेळा विधानसभेची निवडणूक लढवली, त्यापैकी दोन वेळाच त्यांना विजय मिळवता आला. 2014 च्या निवडणुकीत तर अतिशय कमी मतांनी त्यांचा पराभव झाला होता. पक्षांतर्गत कुरघोडीचा त्यांना फटका बसल्याच्या भावना त्यांच्या कार्यकर्त्यांच्या होत्या. यावेळी श्री. पाटील यांनी दणदणीत विजय मिळवला. विधानसभेतील जिल्ह्यातील ज्येष्ठ आणि दुसऱ्यांदा आमदार झाल्याने मंत्रीपदाचे प्रबळ दावेदार समजले जात होते. पण त्यांना डावलून विधानपरिषद आमदार सतेज पाटील यांची राज्यमंत्रीपदी निवड झाल्याने श्री. पाटील यांच्यासह कार्यकर्त्यांत प्रचंड नाराजी आहे. या नाराजीतूनच उद्याचा मेळावा बोलवण्यात आला आहे. 

पक्षाशी नेहमीच एकनिष्ठ

कॉंग्रेसचे निष्ठावंत अशी पी. एन. यांची ओळख आहे. त्यातही गांधी घराण्याशी प्रामाणिक म्हणूनही ते ओळखले जातात. त्यामुळेच त्यांच्या पुढाकाराने स्वर्गीय पंतप्रधान राजीव गांधी यांचा पुर्णाकृत्ती पुतळा मध्यवर्ती बसस्थानक परिसरात उभारण्यात आला. गेली 22 वर्षाहून अधिक काळ स्वर्गीय राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त ते दरवर्षी सद्‌भावना दौड आयोजित करतात. अनेकदा पराभव आणि पक्षांतर्गत कुरघोडीचा सामना करावा लागला तरी त्यांनी पक्षापासून कधी फारकत घेतली नव्हती. पण मंत्रीपदाची संधी असताना डावलल्याने त्यांच्या गटात नाराजी आहे. त्याचे प्रतिबिंब उद्याच्या मेळाव्यात उमटणार आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT