MLA Rohit Pawar visits Maliwada bus station 
पश्चिम महाराष्ट्र

सत्तेचा ताळमेळ अन्‌ नगरची भेळ 

दौलत झावरे

नगर  : जिल्हा परिषदेत महाविकास आघाडीच्या सत्तेचा ताळमेळ झाल्याची खात्री पटल्यानंतर कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी माळीवाडा बसस्थानकात जाऊन भेळीवर ताव मारला. नूतन अध्यक्ष राजश्री घुले यांचे पुतणे डॉ. क्षितिज, तसेच राष्ट्रवादीचे कपिल पवार, माजी जिल्हा परिषद सदस्य सचिन जगताप यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. 

जिल्हा परिषदेतील अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडीच्या पार्श्‍वभूमीवर आज (मंगळवारी) आमदार पवार शहरात आले होते. सत्तासमीकरणाची जुळवाजुळव झाल्यावर ते निवांत झाले. नगरमध्ये नाश्‍त्यासाठी काय प्रसिद्ध आहे, अशी विचारणा पवार यांनी केली. त्यावर कार्यकर्त्यांनी नगरच्या भेळीविषयी माहिती पुरवली. वाहनांचा ताफा नेण्याऐवजी मोटरसायकलवर जाण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली. लगेच मोटरसायकली दिमतीला आल्या; परंतु हेल्मेट नसल्याने त्यांनी मोटरसायकलवरून प्रवास करणे टाळले. 

कार्यकर्त्यांनी त्यांना माळीवाडा बसस्थानकातील बाबासाहेब भेळ स्टॉलवर नेले. तेथे गेल्यावर एकेक करीत कार्यकर्ते गोळा झाले. नेतेमंडळींचीही रीघ लागली. भेळीवर ताव मारत असताना पवार यांनी गारडे यांच्याकडून व्यवसायाची माहिती घेतली. भाडे किती आहे, किती वर्षांपासून व्यवसाय करता, प्रतिसाद कसा आहे, असे प्रश्‍न विचारून त्यांनी भेळीचा इतिहास जाणून घेतला. 

भेळ संपल्यानंतर रोहित यांनी बसस्थानक पाहण्याची इच्छा व्यक्त केली. तेथील वृद्ध प्रवाशांचीही त्यांनी आस्थेने विचारपूस केली. प्रवाशांनाही त्यांच्यासोबत सेल्फी घेण्याचा मोह आवरला नाही. अधिकाऱ्यांशीही संवाद साधून बस व स्थानकाविषयी माहिती घेतली. अस्वच्छतेबाबत मात्र पवार यांनी नाराजी व्यक्त केली. स्थानकाची स्वच्छता नेमकी कोण करते, असा सवालही त्यांनी केला. 

काही विद्यार्थ्यांनी, "आम्हाला पास काढण्यासाठी नेहमीच तारकपूरला जावे लागते. तेथेही एकच खिडकी सुरू आहे. त्यांना दुसरी खिडकी सुरू करण्यास सांगावे,' असा आग्रह विद्यार्थ्यांनी पवारांकडे केला. बसस्थानकातील हॉकर्सशीही हितगूज करून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. 

विद्यार्थ्यांसमवेत सेल्फी

आमदार रोहित पवार बसस्थानकात अचानक आल्याचे पाहून विद्यार्थ्यांना आनंद झाला. अनेकांनी त्यांच्याबरोबर हस्तांदोलन करीत सेल्फी घेतले. पवार यांनीही नाराज न होता त्यांच्याबरोबर सेल्फी घेतले. हे सेल्फी घेत असताना विद्यार्थ्यांना, कितवीला आहात, अभ्यास कसा सुरू आहे, एसटी वेळेत येते का, असे प्रश्‍न विचारायला ते विसरले नाही. 
 

सर्व बसस्थानकांवर देणार व्हील चेअर 
वृद्ध व दिव्यांग प्रवाशांसाठी बसस्थानकात पुरेशा व्हील चेअर नसल्याकडे आमदार पवार यांचे लक्ष वेधले. सर्व बसस्थानकांमध्ये किती व्हील चेअर लागतील, याचा प्रस्ताव तयार करून द्या; याबाबत आपण जिल्ह्यातील सर्व आमदारांशी चर्चा करून त्या उपलब्ध करून देण्यासाठी निश्‍चित प्रयत्न करू, असे आश्‍वासन त्यांनी दिले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

S. k. Patil: मुंबईचा अनभिषिक्त सम्राट; तरीही ठाकरे म्हणतात मराठी माणसाचा शत्रू! भाषणात उल्लेख केलेले स. का. पाटील नेमके कोण?

Devayani Farande : नाशिकच्या रस्त्यांवरील खड्ड्यांवरून महापालिकेत आरोप-प्रत्यारोप: आमदार फरांदे यांनी अधिकाऱ्यांच्या चौकशीची मागणी केली

Devendra Fadnavis : राज ठाकरेंचे आभार, तर उद्धव ठाकरेंवर टीका, मराठी विजय मेळाव्यावर काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

Pune News : खडकमाळ आळीतील खड्ड्यांचे ‘मनसे’कडून हार-फुले वाहून पूजन

Maharashtra Politics: माळेगावच्या अध्यक्षपदी अजित पवार तर उपाध्यक्षपदी संगीता कोकरे यांची निवड

SCROLL FOR NEXT