MLA Shindes efforts to get more water in Sina river 
पश्चिम महाराष्ट्र

सीनेत कुकडीचे आणखी पाणी यावे, यासाठी प्रयत्न सुरू 

अशोक मुरूमकर

सोलापूर : महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर सीना नदीत कुकडीचे पहिल्यांदाच पाणी आले आहे. याचा उपयोग सोलापूर व नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना होणार आहे. येणाऱ्या काळात हे पाणी सोलापूर जिल्ह्यातील तरटगाव, पोटेगाव, संगोबा या बंधाऱ्यांसह कोळगाव धरणापर्यंत यावे, म्हणून जास्तीत जास्त प्रयत्न करणार असल्याचे करमाळ्याचे आमदार संजय शिंदे यांनी "सकाळ'ला सांगितले. 
सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्‍यात सीना नदीवर असलेल्या खडकी, आळजापूर, तरटगाव, बिटरगाव (श्री), पोटेगाव, पोथरे, बोरगाव, निलज, करंजे, भालेवाडी आदी गावांना व नगर जिल्ह्यातील जवळा या गावांना नेहमी दुष्काळाशी सामना करावा लागतो. सीना नदीवर ही गावे असूनसुद्धा पावसाच्या लहरीपणामुळे नदी सतत कोरडी राहते. त्यामुळे या भागात कुकडीचे पाणी सोडण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. त्यातूनच महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर सीना नदीवरील खडकी येथील बंधाऱ्यात पहिल्यांदाच थोडे पाणी आले आहे. त्याचा प्रवाह वाढवला तर आणखी पाणी येऊ शकेल, अशी आशा शेतकरी करत आहेत. 

हेही वाचा- भाजप खासदाराच्या पत्रकार परिषदेला शिवसेनेचे आमदार 
हक्काचे पाणी आवश्‍यक 

याबाबत आमदार शिंदे म्हणाले, कुकडी ते सीना नदी हे अंतर जास्त आहे. त्यामुळे पाणी येण्यास अडचणी येत आहेत. मात्र, या वेळी पहिल्यांदाच खडकीच्या बंधाऱ्यापर्यंत पाणी आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त होत आहे. या भागाचा कायमचा दुष्काळ हटवण्यासाठी सर्व बंधाऱ्यात हक्काचे पाणी येणे आवश्‍यक आहे. त्यासाठी माझा प्रयत्न सुरू आहे. ठरल्याप्रमाणे खडकी बंधाऱ्यात पाणी आले आहे. यामध्ये आणखी पाणी कसे सोडता येईल, हा सुद्धा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. खडकी बंधाऱ्याचा उपयोग सोलापूर जिल्ह्यातील खडकी या गावाला होतो. तर नगर जिल्ह्यातील जवळा, आगी, दिगी या गावांना या पाण्याचा उपयोग होत आहे. 
सीना नदीतील खडकी येथील बंधाऱ्यात पाणी देण्याचे आश्‍वासन कर्जत-जामखेड मतदारसंघाचे राष्ट्रवादीे आमदार रोहित पवार यांनीही आश्‍वासन दिले होते. या पाण्यासाठी त्यांनीही प्रयत्न केले आहेत, असे या भागातील शेतकरी सांगत आहेत. 

मागणी कायम 
सीना नदीवरील करमाळा तालुक्‍यातील सर्व बंधारे कुकडीच्या पाण्याने भरावेत व हक्काचे पाणी मिळावे, अशी कुकडी सीना संघर्ष समितीची मागणी कायम आहे. खडकीपर्यंत पाणी आले म्हणजे त्याखाली असलेले तरटगाव, पोटेगाव व संगोबा येथील बंधाऱ्यापर्यंत पाणी येऊ शकेल. त्यासाठी जास्त दिवस पाणी सोडावे व प्रवाहातील अडथळे दूर करून वेग वाढवावा, अशी मागणी केली जात आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Russian Woman: रशियन महिला सापडली ते गोकर्णचं घनदाट जंगल... माणूस हरवला की रस्ता ही सापडणार नाही, फोटो पाहा

रशियन महिलेच्या मुलींचे वडील कोण? भारतात का आली होती? मोठे अपडेट समोर

Latest Maharashtra News Updates : पंचगंगा नदीची पाणी पातळी चोवीस तासांत सहा फूट सहा इंचांनी वाढली

Local Elections 2025 : नेत्यांचे आरोप-प्रत्यारोप, इच्छुकांचा अभ्यास, जिल्हा परिषद गट-गण प्रारूप रचना; निवडणूक मोर्चेबांधणीला सुरुवात

Kolhapur Chappal Prada : ‘प्राडा’ची टेक्निकल टीम कोल्हापुरी पायतान बघून भारावली, कारागिरांची हस्तकला पाहून म्हणाले...

SCROLL FOR NEXT