पश्चिम महाराष्ट्र

पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात 1 जानेवारीपासून मोबाईल बंदी

अभय जोशी

पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात 1 जानेवारीपासून मोबाईल बंदी


पंढरपूर : श्री विठ्ठल मंदिराच्या सुरक्षेच्या दृष्टीने 1 जानेवारी 2020 पासून मंदिरात मोबाईल नेण्यास बंदी करण्याचा निर्णय मंदिर समितीच्या आज झालेल्या बैठकीत घेण्यात आला. मंदिर समितीकडे जमा झालेली नाणी बॅंका स्विकारत नसल्याने समितीकडे तब्बल 55 लाख रुपयांची नाणी पडून आहेत. एचडीएफसी बॅंकेने ही नाणी घेण्याची तयारी दर्शवली असल्याने त्या बॅंकेत खाते उघडून ही नाणी मुदत ठेव स्वरुपात जमा करण्याचा निर्णयही घेण्यात आला.

हेही वाचा -


समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या अध्यक्षतेखाली आज बैठक झाली.अंतर्गत सुरक्षेसाठी 34 सुरक्षा कर्मचारी नियुक्त करण्याचे ठरवण्यात आले. श्री संत ज्ञानेश्‍वर महाराज संजीवन समाधी सोहळ्यासाठी श्री क्षेत्र पंढरपूर ते श्री क्षेत्र आळंदी दरम्यान श्री संत नामदेव महाराज पालखी सोहळ्यात जेसीबी मशीन घुसल्याने संत नामदेव महाराजांचे 17 वे वंशज सोपान महाराज नामदास तसेच अतुल महादेव आळशी यांचा अपघाती मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबियांकडे प्रत्येकी अडीच लाख रुपये मदत देण्यात येणार आहे.

हेही वाचा -

श्री विठ्ठल सभामंडप व श्री रुक्‍मिणी सभामंडप येथे मंदिर समितीचे कार्यक्रम वगळून सप्ताह, भजन, किर्तन आणि अन्य कार्यक्रमासाठी स्पिकर लावण्यास बंदी करण्याचे ठरलेश्री विठ्ठल रुक्‍मिणी भक्त निवासाच्या प्रसिध्दी साठी शहरात विविध ठिकाणी फलक लावण्यास व भक्त निवास मधील तबक उद्यान प्रति दिन 50 हजार रुपये प्रमाणे योग्य अटी आणि शर्तींवर भाडे तत्वावर देण्याचे ठरले. तेथील गाळे व ऑफीसेस ई लिलाव पध्दतीने मासिक भाड्यावर बोली न लावता सुरक्षा रकमेवर भाडे तत्वावर देण्याचे ठरवण्यात आले. निगडी येथील भक्ती शक्ती चौकाच्या धर्तीवर मंदिरावरील ध्वज उभारण्यास व श्री संत नामदेव महाराज यांची 750 वी जयंती मंदिर समिती मार्फत साजरी करावी तसेच संत नामदेव पायरीचे संवर्धन करण्याचा निर्णय घेण्यात आला.

हेही वाचा -

बैठकीस शकुंतला नडगिरे, संभाजी शिंदे, ज्ञानेश्‍वर महाराज जळगावकर, प्रकाश महाराज जवंजाळ, नगराध्यक्षा साधना भोसले, कार्यकारी अधिकारी विठ्ठल तथा सुनील जोशी, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड , लेखा अधिकारी सुरेश कदम उपस्थित होते.
मोबाईल बंदीमुळे भाविकांची गैरसोय
विठ्ठल मंदिरात मोबाईल नेण्यास पूर्वी पोलिस विभागाने बंदी घातली होती. त्यामुळे भाविकांची मोठी गैरसोय होत होती. भाविकांना त्यांच्याकडील मोबाईल मंदिरात दर्शनाला जाताना दहा, वीस रुपये भाडे देऊन जवळपासच्या दुकानात ठेवावे लागत होते. भाविकांची गैरसोय लक्षात घेऊन पोलिसांनी मोबाईल बंदी उठवली होती. आता बंदीमुळे पुन्हा भाविकांची गैरसोय होणार आहे.

 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Crime: शाब्दिक वादाला हिंसक वळण! रागाच्या भरात १५ वर्षीय मुलावर चाकूहल्ला अन्...; विरारमध्ये नेमकं काय घडलं?

World Cup 2027: विराटला सांभाळण्यासाठी गंभीरने RCB चा फॉर्म्युला वापरावा? माजी सहकाऱ्याचा मोठा सल्ला म्हणाला...

Farmer Relief: अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा; राज्य सरकारकडून ३३४.९८ कोटींच्या मदतीला मंजुरी, मकरंद पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

T20 WC India Semifinal Scenario : द. आफ्रिकेच्या पोरींनी बाजी मारली, भारतीय संघाची झोप उडवली; उपांत्य फेरीत कोण पोहोचणार अन् कसे?

Monsoon Skin Care: पावसाळ्यात चेहऱ्यावर येईल 'ग्लो'! फॉलो करा या ५ सोप्या स्कीन केअर टिप्स

SCROLL FOR NEXT