Mohiddin Mulla's murder was due to financial dispute; The suspect is on police radar
Mohiddin Mulla's murder was due to financial dispute; The suspect is on police radar 
पश्चिम महाराष्ट्र

मोहिद्दीन मुल्लाचा खून आर्थिक वादातूनच; संशयित पोलिसांच्या रडारवर

शैलेश पेटकर

सांगली : वारणानगर येथील नऊ कोटींच्या लूट प्रकरणातील मुख्य संशयित मोहिद्दीन अबुबकर मुल्ला याचा खून आर्थिक वादातूनच झाल्याचे प्राथमिक तपासात पुढे आले आहे. संशयित हल्लेखोर पोलिसांच्या रडारवर असून, त्यांच्या शोधासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषणसह स्थानिक पोलिसांची पथके रवाना करण्यात आल्याची माहिती पोलिस उपाधीक्षक अजित टिके यांनी "सकाळ'शी बोलताना दिली.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, की मृत मोहिद्दीन मुल्ला हा वारणानगर येथील शिक्षक कॉलनीतील झुंझार सरनोबत यांच्या बंगल्यात 2016 मध्ये झालेल्या 9 कोटी 18 लाख रोकड चोरी प्रकरणातील मुख्य सूत्रधार आहे. मिरजेजवळील बेथेलहेमनगरमध्ये तो राहात होता. तो आलिशान बुलेटसह चैनी करत असताना एलसीबीच्या पथकाच्या नजरेत आला.

संशयावरून 12 मार्च 2016 मध्ये त्याच्या घरावर छापा मारला. तेव्हा 3 कोटींची रोकड जप्त केली. त्यानंतर पोलिसांनी 15 मार्च 2016 पर्यंत तपासासाठी पुन्हा वारणानगर येथे छापे मारले. या छाप्यावेळी त्यांनी कोट्यवधी रुपयांवर डल्ला मारल्याचे स्पष्ट झाले. एकूण 9 कोटी 18 लाख रुपयांवर पोलिसांसह मुल्ला याने डल्ला मारला, अशी फिर्याद श्री. सरनोबत यांनी दिली होती.

यामुळे तत्कालीन सांगली एलसीबीचे निरीक्षक विश्‍वनाथ घनवट, सहायक निरीक्षक सूरज चंदनशिवे, हवालदार शंकर पाटील, दीपक पाटील, रवींद्र पाटील, कुलदीप कांबळे, शरद कुरळपकर आणि मोहिद्दीन याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला. त्यामुळे नऊ कोटी रोकड चोरी प्रकरणात पोलिस अधिकाऱ्यांना अटक केल्यामुळे राज्यात खळबळ उडाली. 

मोहिद्दीन मुल्ला हा वर्षानंतर जामिनावर मुक्त झाल्यावर विजयनगर येथे एका अपार्टमेंटमध्ये राहत होता. साधारणपणे सहा महिन्यांपूर्वी त्याने कुपवाड एमआयडीसी पोलिस ठाणे हद्दीत जुगार क्‍लब चालवण्याचा प्रयत्न केला; परंतु विशेष पोलिस पथकाने छापा टाकून त्याच्यावर कारवाई केली. या कारवाईनंतर मुल्ला हा क्‍लब चालवण्यासाठी सांगली परिसरात जागा शोधत असल्याची माहिती पोलिस तपासात पुढे आली आहे.

सिव्हिल हॉस्पिटलजवळील गणेशनगर, रमामातानगर परिसरात तो जागा शोधत होता. यात त्याचा संशयित हल्लेखोरांशी आर्थिक कारणातून वाद झाला होता. काल रात्री संशयितांनी त्याला गाठले. रमामातानगरमध्ये इमारतीच्या जिन्याजवळच्या पॅसेजमध्येच कोयत्याने वार करून खून करण्यात आला. 

दरम्यान, खुनाची घटना घडल्यानंतर शहरात खळबळ उडाली. पोलिसांनी तत्काळ पथके तयार केली. काही संशयित पोलिसांच्या रडारवर असून, त्यांना लवकरच ताब्यात घेण्यात येईल, असे पोलिस सूत्रांनी सांगितले..

संपादन : युवराज यादव

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mayawati: "जोपर्यंत तो पूर्ण..." मायावतींनी तडकाफडकी भाच्याला राष्ट्रीय संयोजक पदावरून हटवले

Covishield Vaccine: "बनवणारही नाही अन् विकणारही नाही," दुष्परिणाम समोर आल्यानंतर कोव्हिशिल्डबाबत मोठा निर्णय

Morning Breakfast: जर तुम्हाला मॅगी खायला आवडत असेल तर 'ही' रेसिपी नक्की ट्राय करा

Sakal Podcast : मोहोळ की धंगेकर, पुण्यात कोणची हवा? EVM हॅक करायसाठी मागितले दीड कोटी रुपये

Latest Marathi News Live Update : अरुणाचल प्रदेशात भूकंपाचे धक्के, रिश्टर स्केलवर 3.1 तीव्रता

SCROLL FOR NEXT