सावकारीला पैसा! sakal
पश्चिम महाराष्ट्र

विटा, कवठेमहांकाळमधून खासगी सावकारीला पैसा!

भिशीच्या नावाखाली पोसलीय साखळी; सगळ्यांचे हात ओले

सकाळ वृत्तसेवा

सांगली : काल-परवापर्यंत अर्धा कप चहा प्यायला महाग असलेली पोरं अचानक लाखो रुपयांची उलाढाल करू लागली. गुंठाभर शेती नसणारा टुमदार बंगला बांधून चारचाकीतून फिरायला लागला. अचानक श्रीमंती आली तरी कोठून? उत्तर सोपं आहे, एक तर त्याला लॉटरी लागलीय किंवा तो खासगी सावकार झालाय. चहाला महाग असणारा सावकारीने पैसा कसा देतोय, तर उत्तर आहे विटा, कवठेमहांकाळ.

या दोन तालुक्यांतून खासगी सावकारीसाठीची रसद जिल्हाभर पुरवली जात आहे. खासगी सावकारीच्या साखळीचा विस्तार भिशीच्या माध्यमातून झाला आहे. त्यात महिला आहेत, तरुण आहेत, निवृत्त कर्मचारी आहेत, अनेक व्यापारी आहेत. त्यात छोटे-छोटे सोने-चांदीचे व्यापारी आहेत. याशिवाय भिशी आहेत. आधी भिशीचा डाव मोडावा लागेल आणि मग सावकारांच्या गळ्याला हात घालावा लागेल. म्हैसाळ (ता. मिरज) येथे नऊ जणांचा बळी गेल्यानंतर आता तरी पोलिसांनी जागे व्हावे, हीच अपेक्षा. सगळ्या यंत्रणांच्या हातावर पाणी घालून पोसलेल्या या व्यवस्थेचे कंबरडे मोडण्याची गरज आहे. गोरगरिबांच्या घराची राखरांगोळी होत असताना पोलिसांनी घटना घडल्यानंतरच कारवाई करून उपयोग नाही.

विटा हे सर्वार्थाने संपन्न शहर आहे. सांगली जिल्ह्यातील जमिनींचे सर्वाधिक भाव विट्यात आहेत. त्याचे कारण स्पष्ट आहे, या भागात पैसा प्रचंड आहे. हे पैसे मुरवायचे कोठे, हा पैसा सांगली, मिरजेसह जिल्ह्याच्या अनेक शहर आणि गावांत जातोय. काही मोजक्या लोकांचे कोट्यवधी रुपये खासगी सावकारीत लागले आहेत. त्या-त्या ठिकाणचे खासगी सावकार हा पैसा बाजारात फिरवत आहेत. महिना पाच टक्के ते दहा टक्के अशी वेगवेगळी व्याज आकारणी आहे. स्थानिकाला दोन टक्के आणि बाकीचे मूळ गुंतवणूकदाराला, अशी वाटणी आहे. सगळी रिस्क स्थानिकाची. त्याने मुख्य व्यक्तीचे नाव घ्यायचे नाही, ही अट आहे. कवठेमहांकाळ तालुक्यात सावकारांकडे मुंबईतून पैसे येतो. काही महाभाग पवनचक्की, जमीन उलाढालीतून मोठे झाले आहेत. तोच पैसा सावकारीसाठी वापरायला सुरवात केली. गावोगावचे चिल्लर सावकार कवठेमहांकाळमधील एका गावातील सावकाराकडून पैसे नेतात.

तीन कोटी पुरवणारे किती कोटींचे मालक?

म्हैसाळ येथे वनमोरे परिवाराला तीन कोटींचे कर्ज देणारे खासगी सावकार स्वतः किती कोटीचे मालक आहेत, या मंडळींचा उत्पन्नाचा मार्ग काय, त्याचे रेकॉर्ड आहे का, केवळ पोलिसच नव्हे तर सर्व शासकीय यंत्रणा यामागे लावल्या गेल्या पाहिजेत. लोकांच्या तक्रारी आल्यानंतर आणि काहीवेळा यंत्रणांनी स्वतः अशी मोहीम राबवून त्याला दणका देणे गरजेचे आहे. नोंदणीकृत सावकारांच्या उलाढालींचीही चोख तपासणी करणे गरजेचे आहे.

जमिनींवरच डोळा...

खासगी सावकाराकडून पैसे घेणारे बहुतांश गरीब, मध्यमवर्गीय आहेत. त्यांच्याकडून अनेकदा काहीही तारण न घेता पैसे दिले जातात. गुंडगिरीच्या जोरावर वसूल करता येतात, याची खात्री असल्याने ही पद्धत राबवली जाते. काही ठिकाणी मात्र जमिनींचे कागद, घराचे कागद तारण घेतले जातात. अर्थ एकच, जमिनींवर डोळा ठेवून मुदलावर व्याज आणि व्याजावर पुन्हा व्याज वाढवत जायचे आणि जमिनी घशात घालायच्या.

पोलिसांना सगळे माहिती

म्हैसाळमध्ये नऊ लोकांचा बळी गेला आहे. पोलिसांना सगळे माहिती आहे. जिल्ह्यातील सावकार कोण, त्यांची किती उलाढाल आहे, पिचलेले लोक कोण आहेत, मात्र कारवाई होत नाही. भिशी मोडल्या जात नाहीत. तक्रारदारांना संरक्षण मिळत नाही. सावकारातील नावेच इतकी मोठी आहेत, की दहशत निर्माण होते. त्याविरोधात बोलायला लोक पुढे येतच नाहीत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींची संक्रांत होणार गोड! ४ दिवसात जमा होणार ३ हजार... अधिकृत घोषणा!

Santosh Deshmukh Case : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढील सुनावणी २३ जानेवारीला

Vashi Crime : ‘तुझाही संतोष देशमुख करू’ म्हणत सरपंचाला मारहाण; पवनचक्कीच्या कामावरून घडली घटना

Sagittarius Horoscope 2026 : विवाहाचे योग जुळणार? गुरू-शनीच्या कृपेने धनु राशीच्या व्यक्तींचे नवीन वर्ष ठरणार खास!

Akola News: अकोल्याचे जवान वैभव लहाने यांना वीरमरण; वीर जवानाच्या स्मृतीस जिल्ह्याकडून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण!

SCROLL FOR NEXT