More than 700 players in state level Kabaddi tournament 
पश्चिम महाराष्ट्र

राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत 700हून अधिक खेळाडू 

सकाळ वृत्तसेवा

नगर ः ""कबड्डी खेळाचा प्रचार व प्रसार होऊन जिल्ह्यात राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडू तयार व्हावेत, यासाठी महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने शहरामध्ये किशोर गट अजिंक्‍यपद व निवडचाचणी स्पर्धेचे आयोजन केले आहे. 23 ते 25 जानेवारी असे तीन दिवस जिल्हा कबड्डी संघटनेतर्फे रेसिडेन्शिअल हायस्कूलच्या मैदानावर या स्पर्धा घेण्यात येतील. राज्यस्तरीय स्पर्धा पाच वर्षांपासून घेण्यात येत असून, राज्यातून 700च्या वर खेळाडूंचा यात सहभाग असेल,'' अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष दादा कळमकर, सचिव शशिकांत गाडे यांनी दिली. 

नगरमध्ये आज पत्रकार परिषद झाली. प्रा. सुनील जाधव उपस्थित होते. गाडे म्हणाले, ""जिल्ह्याने आजतागायत अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडू राज्याला दिले. स्पर्धेसाठी राज्यातील 25 जिल्ह्यांतून 50 संघ सहभागी होणार आहेत. यासाठी मैदानावर लाल मातीची सहा मैदाने तयार करण्यात येणार आहेत. जवळपास पाच हजार प्रेक्षक बसतील अशी गॅलरी तयार करण्यात येणार आहे. 

राष्ट्रीय दर्जाचे 60 पंच 
स्पर्धेसाठी 30 ते 35 लाख रुपये खर्च येणार आहे. राज्यभरातून राष्ट्रीय दर्जाचे 60 पंच येणार आहेत. खेळाडू, पंच यांची जेवणाची, राहण्याची व्यवस्था करण्यात येईल. विजेत्यांना करंडक देऊन सन्मानित करण्यात येईल. नगरवासीयांसाठी ही पर्वणी असून, स्पर्धा पाहण्यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नाही. जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेने मैदान मोफत उपलब्ध करून दिले आहे. 

दिग्गज मंत्र्यांना आमंत्रण 
स्पर्धेचे उद्‌घाटन गुरुवारी (ता. 23), तर समारोप शनिवारी (ता. 25) होणार आहे. राज्य कबड्डी संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांना या कार्यक्रमासाठी आमंत्रित केले आहे. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, कॅबिनेट मंत्री शंकरराव गडाख, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनाही आमंत्रित करण्यात आले आहे.'' 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अग्रलेख : शोध हरवलेल्या आवाजाचा!

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 5 जुलै 2025

Latest Maharashtra News Updates : विजयी मेळाव्यानिमित्त ठाकरे बंधू येणार एकाच व्यासपीठावर, शिवसेना-मनसेचा आज भव्य मेळावा

मन, मेंदू आणि आपण

हौस ऑफ बांबू : सहासष्ट आणि नव्याण्णव..!

SCROLL FOR NEXT