Mother Suicide With Two Children In Savarde Sangli Marthi News 
पश्चिम महाराष्ट्र

घरातील भांडणावरून बाहेर पडली आणि तीने केले हे कृत्य...  

सकाळ वृत्तसेवा

तासगाव (सांगली)  : सावर्डे येथे घरातील भांडणावरून एका महिलेने आपल्या दोन चिमुरड्यांसह विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. आठ तारखेपासून ही महिला घरातून बाहेर पडली होती. आज त्या तिघांचे मृतदेह सापडले.


याबाबतची माहिती अशी...

सावर्डे येथे बाळासाहेब सदाकळे पत्नी चंदाराणी, तीन मुले, आई, बहिणीसह राहतात. आठ जानेवारीला बुधवारी चंदाराणी यांचे सासू आणि नणंदेशी भांडण झाले, मात्र त्यावेळी पती काही बोलला नाही म्हणून रागाने हिंदूराज (वय ७), अभिराज (वय ५) या दोन मुलांना घेऊन त्या बाहेर पडल्या. १० जानेवारी रोजी तासगाव पोलिसांत त्या बेपत्ता असल्याची तक्रारही देण्यात आली होती, मात्र आज लोढे रस्त्यावरील दिलीप पाटील यांच्या विहिरीत चंदाराणी, अभिराज आणि हिंदुराज यांचे मृतदेह तरंगताना दिसले. हा प्रकार समजताच ग्रामस्थांनी विहिरीकडे धाव घेतली.

दोन चिमुरडयासह आईने केला जिवनाचा त्याग

तिघांचे मृतदेह बाहेर काढून तासगाव येथे ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. तेथे शवविच्छेदन झाले. तासगाव पोलिसांत आत्महत्येची नोंद झाली आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत फिर्याद दाखल झाली नव्हती. चंदाराणी यांच्या पतीचा बेकरी, विद्यार्थी वाहतुकीचा व्यवसाय आहे. त्यांना हर्षद नावाचा आणखी एक नऊ वर्षांचा मुलगा आहे. अचानक घडलेल्या या प्रकाराने गावात खळबळ उडाली आहे.
 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुण्यात २१ वर्षीय शिकाऊ डॉक्टर तरुणीनं उचललं टोकाचं पाऊल, नवव्या मजल्यावरून उडी मारत संपवलं आयुष्य

Pune Crime : मद्याच्या नशेत तरुणीचा विनयभंग करणाऱ्या पोलिस हवालदाराला अटक; हवालदाराला निलंबित करण्याचे दिले आदेश

Bail Pola Water Scarcity : पावसाचा खंड! पोळ्याला बोअरवेलच्या पाण्यावर बैलराजाची खांदेमळणी

Marathi News Live Updates : नागपूर RTO च्या परमिट विभागातील कथित अनियमिततेवरून मनसे आक्रमक

Swimming Competition : १३ वर्षीय विदीची ८१ किमी जलतरणात झेप; देश पातळीवर झालेल्यामुर्शिदाबाद स्पर्धेत द्वितीय क्रमांक

SCROLL FOR NEXT