Motorcycle use for rice harvesting 
पश्चिम महाराष्ट्र

अरेच्चा..! भात मळणीसाठी होतोय मोटारसायकलचा वापर...

दत्तात्रय वारके

कोल्हापूर - महापूर आणि परतीच्या पावसाने थैमान घातल्याने सुगी बरीच पुढे गेली. त्यात पैरापद्धतीमुळे मजूर मिळेनात, अशी अवस्था आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी घरच्याच मनुष्यबळावर दुचाकीच्या मळणीचा आधार घेतला आहे. पारंपरिक खळ्यावरच्या मळण्या कालबाह्य झाल्यामुळे खाटावरच्या झोडणीवर जोर दिला जात असल्याने माणसे ज्यादा लागतात. यामुळे दुचाकीच्या मळणीकडे अनेकांचा कल आहे.

बैल आणि रोळच्या मदतीने आधी व्हायची मळणी

यंदा महापूर व परतीच्या पावसाने अक्षरशः शेती व शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान केले. पावसाच्या या आसमानी संकटामुळे शेती कामे पुढे ढकलली गेली. यामध्ये प्रामुख्याने सुगीतील भातमळणीला खोळंबा बसला. पूर्वी भातकापणी करून मोठाल्या खळ्यावर कापलेले भात गोलाकार रचले जायचे. मग दोन-चार दिवसांनी पहाटे वा सायंकाळी बैल व दगडी रोळने पुरुष गडीमाणसाद्वारे मळणी काढली जात होती. कालौघात बैलांच्या संख्येत घट होऊ लागली अन्‌ ट्रॅक्‍टर अथवा मळणी मशिनद्वारे मळण्या होऊ लागल्या. याही कमी कमी होत गेल्या. त्यानंतर लाकडी खाटावरच्या झोडण्यांना बळ आले. अलीकडे खाटावरच्या मळण्याच सर्वत्र पाहायला मिळत आहेत.

शेतकऱ्यांना दुचाकीवरची मळणी परवडतेय

पण खाटावरच्या मळण्यांना मनुष्यबळ व इतर सामग्री ज्यादा लागत असल्याने शेतकऱ्यांना डोकेदुखी होऊ लागली. त्यामुळे काही शेतकऱ्यांनी त्यावर शक्कल लढवत दुचाकी मळणीचा प्रयोग सुरू केला. गतसाली बोटावर मोजण्याइतपत शेतकऱ्यांनी दुचाकीवर मळणी काढली. यंदा तर त्यामध्ये वाढ होऊन अनेक शेतकऱ्यांनी दुचाकीवरची मळणी परवडते म्हणत सुगी आवरुन घेतली. पारंपरिक खळ्यावरच्या मळणीसारखे कापलेले भात तरटी अथवा ताडपत्रीवर अंथरूण दुचाकीचा सभोवताली फेर धरून मळण्या काढल्या गेल्या. कमीत कमी मनुष्यबळामुळे मजूूर व वेळेचीही बचत होत असल्याचे शेतकऱ्यांतून बोलले जात आहे.

खळ्यावरच्या भातमळण्या बंद पडल्यामुळे भातझोडणी खाटावरच होऊ लागली; परंतु यासाठी भात कापणारी, आणणारी, झोडणारी व इतर अशी भरपूर माणसे लागायची. गेल्यावर्षी दुचाकीचा सहज म्हणून प्रयोग केला व यंदा सगळीच भात सुगी दुचाकीच्या साह्याने केल्याने कष्ट, मनुष्यबळ व वेळेची बचत झाली.
- गुरुनाथ पोवार, शेतकरी, बिद्री

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nehal Modi: नीरव मोदीचा भाऊ नेहल मोदीला अटक; पंजाब नॅशनल बँक घोटाळाप्रकरणी मोठी कारवाई, पुढील कारवाई काय?

IND vs ENG 2nd Test: रिषभ पंतची ट्वेंटी-२० स्टाईल फटकेबाजी! इंग्लंडच्या गोलंदाजांची धुलाई करून रचला इतिहास, चेंडूसह बॅटही हवेत...

Sanaswadi Fire : इंडिका कंपनीला आग! संपूर्ण गावात आग आणि धूर, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Sunil Tattkare : महाराष्ट्राची आर्थिक स्थिती उत्तम; निधी वाटपावरून तटकरेंनी फेटाळले कुरबुरीचे आरोप

Badlapur Firing Case : बदलापूर फायरिंगमधील देशी पिस्तूल, मोटरसायकल हस्तगत; एकाला अटक

SCROLL FOR NEXT