ST-Bus 
पश्चिम महाराष्ट्र

ऐन दिवाळीत थांबणार 'लालपरी'!

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : आचारसंहितेचे कारण पुढे करुन सरकारकडून राज्य परिवहन महामंडळाच्या वर्ग-3 च्या कर्मचाऱ्यांना अग्रीम देण्यास टाळाटाळ केली जात आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना यंदाची दिवाळी अंधारात घालवावी लागणार आहे.

शासनाने यावर तोडगा काढावा, अन्यथा 23 किंवा 25 ऑक्‍टोबरला राज्यभरात एकही बस रस्त्यावर दिसणार नाही, असा इशारा एसटी कामगार संघटनेने शासनाला दिला आहे. राज्य सरकारी सेवेतील वर्ग-3 च्या कर्मचाऱ्यांना दिवाळी, रमजान ईद, ख्रिसमस, पारशी नववर्ष, संवत्सरी, रोस-होशना, वैशाखी पौर्णिमा (भगवान बुध्द जयंती), स्वातंत्र दिन, प्रजासत्ताक दिन, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अग्रीम दिला जात आहे. मात्र, राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना मागच्या वर्षी तो मिळालाच नाही. यावर्षीही आचारसंहितेचे कारण पुढे केले जात आहे.

दरम्यान, मागच्या वर्षीच्या वेतनवाढीमुळे कर्मचाऱ्यांचा ग्रेड पे वाढल्याचे कारणही दिले जात आहे; परंतु मूळ ग्रेड पे नुसार अग्रीम द्यावा, अशी मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. शासन व कर्मचाऱ्यांचा वाद ऐन दिवाळीत होणार असल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होणार, असे चित्र दिसत आहे.

ठळक बाबी :-

- राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे साडेबारा हजारांचा फेस्टिवल ऍडव्हॉन्स मिळावा
- चार हजार 800 रुपयांपर्यंत ग्रेड पे असणाऱ्यांना साडेबारा हजारांची उचल मिळावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
- वेतन कराराच्या तरतुदीला राज्य शासन बगल देत असल्याचा संघटनेचा आरोप
- आंदोलन 23 की 25 ऑक्‍टोबरला करायचे यावर निर्णय होऊ शकला नाही.
- एसटी कामगार संघटनेच्या जिल्हाध्यक्षांकडून मागविला अभिप्राय
- कामगार संघटनेच्या जिल्हाध्यक्षांसह अन्य पदाधिकाऱ्यांची उद्या (बुधवारी) मुंबईत बैठक

राज्य शासनाच्या 23 ऑक्‍टोबर 2019 च्या निर्णयानुसार चार हजार 800 रुपयांपेक्षा कमी ग्रेड पे असलेल्या वर्ग 3 च्या कर्मचाऱ्यांना 12 हजार 500 रुपयांचे अग्रीम (फेस्टिवल ऍडव्हॉन्स) देणे आवश्‍यक आहे. मात्र, शासन आता आचारसंहितेचे कारण पुढे करत आहे. त्यामुळे 23 अथवा 25 ऑक्‍टोबरला आंदोलन करण्याबाबत दिशा ठरणार असून शासनाला तसे पत्रही दिले आहे.
- संदीप शिंदे, अध्यक्ष, महाराष्ट्र एसटी कामगार संघटना

वाचा आणखी महत्त्वाच्या बातम्या :

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune FDA Action: सहा तास पाठलाग, मार्गही बदलला; अखेर चाकणमध्ये गुटख्याचा ट्रक पकडला, १.१३ कोटींचा मुद्देमाल जप्त

Pune Crime: केतनला लोहगडावर नेण्यासाठी बनावट ‘माही’ अकाउंट; हत्येपूर्वी रेकीपासून दोन अपयशी प्रयत्नांपर्यंतचा कट उघड

iPhone लंगर! चक्क 'इतक्या' लोकांना मोफत मिळणार आयफोन; फक्त ‘ही’ अट पूर्ण करावी लागणार

Pune Ganesh Visarjan: पुण्यात सहा दिवसांत ५३ हजार ८५२ गणेशमूर्तींचे विसर्जन; ६८ हजार किलो निर्माल्य संकलित

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT