-
पश्चिम महाराष्ट्र

सोलापूरात आता मुंबईची चटपटीत स्पेशल कच्छी दाबेली (video)

सुस्मिता वडतिले

सोलापूर : लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वांनाच चटपटीत पदार्थं खायला नेहमीच आवडतात. दिवस असो वा रात्र त्याकरिता ते पदार्थ खाण्यासाठी कोण हॉटेल्स तर कोण चौपाटी जाते. कुटुंबातील व्यक्तींची आवड लक्षात घेता अनेक स्त्रिया, गृहीणी अगदी चटपटीत बाजारात मिळते त्याच पध्दतीने घरी पदार्थ बनवण्याचा नेहमी प्रयत्न करतात. अशीच मुंबईची चटपटीत स्पेशल कच्छी दाबेली आता सोलापूरात बनवली जात आहे. या कच्छी दाबेलीची सोप्पी रेसिपी पहा कशी आहे. 

कच्छी दाबेली साठी लागणारे साहित्य 
पाव किलो उकडलेले बटाटे, लाल मिरची, अर्धी वाटी भाजके शेंगदाणे, सजावटीकरिता बारीक शेव, टोमॅटो सॉस, अमूल बटर, मीठ, पाव. 

कृती : प्रथम कढईत तेल घालून त्यात लाल मिरचीची पावडर टाकावी. त्यानंतर उकडलेले बटाटे स्मॅश करून ते कढईत घालावे. तयार बटाट्याच्या भाजीत चवीनुसार मीठ वापरावे. यानंतर सर्व भाजी एकत्रित करून घेणे. त्यानंतर पावाला टोमॅटो सॉस लावावे. त्या पावामध्ये तयार बटाट्याची भाजी भरायची. त्यानंतर डाळिंबाचे दाणे व शेव भरायची. आवडीनुसार भाजके शेंगदाणे वापरायचे आणि नंतर कच्ची दाबेली अमूल बटर लावून भाजून घेणे. तयार गरमागरम कच्ची दाबेली सर्व्ह करावी. 

टीप : कच्ची दाबेली खाल्यानंतर त्यामध्ये वापरलेल्या डाळिंबामध्ये कॅल्शिअम, फॉस्फरस, लोह मोठ्या प्रमाणात मिळतात. यामुळे कच्ची दाबेलीसोबत बहुगुणकारी डाळिंबाचे फायदे हे आरोग्यास फायदेशीर ठरतात. 

कच्छी दाबेलीचा गरम मसाला बनवण्यास लागणारे साहित्य 
धने, जिरे, दालचिनी, लवंग, चाट मसाला, काळी मिरी, बडीशेप, लाल मिरची हे सर्व एकत्र मस्त खरफुस भाजून घेवून मिक़्सरमधून बारीक करुन घेणे. 

असे बनवले जातात खारे शेंगदाणे 
भाजलेले शेंगा, लाल तिखट, चाट मसाला, चवीनुसार मीठ. हे सर्व साहित्य एकत्र केल्यानंतर खारे शेंगदाणे तयार होतात. 

हेही वाचा - यामुळे नंदीध्वज ठरते आकर्षणाचा केंद्रबिंदू 
मला लहानपणापासून पाककलेची आवड आहे. मी तयार केलेले सर्व पदार्थ माझ्या कुटुंबातील सदस्यांना खूप आवडतात. त्यामुळे मी अनेक वेगवेगळे पदार्थ घरीच बनवते. मी सकाळ साठी एक उखाणा घेते, "माझा आवडता रंग अबोली...प्रमोदसाहेबांचे नाव घेते, सकाळ ची टीम आलीय माझ्या घरी मी त्यांना खाऊ घालणार आहे मुंबईची स्पेशल चटपटीत कच्छी दाबेली'. 
विद्या गाडे, गृहीणी  
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update: सोलापुरी चादर देत पंतप्रधानांचे सिद्धेश्वरनगरीत स्वागत

Wagholi Crime News : अष्टविनायक महामार्गावर अपघात; तिघांचा उपचारा दरम्यान मध्यरात्री मृत्यु

Aamir Khan: इम्रान खान करणार कमबॅक,भाच्यासाठी अमिर करणार असे काही की...!

Team India squad T20 WC24 : आज हार्दिक पांड्याचा लागणार निकाल; टी-20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची होणार घोषणा, 'ही' 9 नावे निश्चित

Bank Loan: ग्राहकांना बँकाकडून कर्ज मिळणे होणार अवघड; रेटिंग एजन्सीचा दावा, काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT