Murder crime sakal
पश्चिम महाराष्ट्र

Murder: खंडेराजुरीत तरूणाचा चाकू भोसकून खून, परीसरात खळबळ

Crime: एकापाठोपाठ दोन खुनाच्या घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.

सकाळ वृत्तसेवा

Miraj News: खंडेराजुरी (ता. मिरज) येथे होळकर चौकात पुर्वीच्या वादातून तरूणावर चाकूने सपासप वार करून निर्घृण खून करण्यात आला. सुमित जयवंत कांबळे (वय २१) असे मृत तरूणाचे नाव आहे. काल रात्री नऊच्या सुमारास ही घटना घडली.

संशयित सूरज आठवलेसह पाच साथीदारांना ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे समते आहे. त्याता दोन अल्पवयीन मुलांचाही सहभाग असल्याचे समजते आहे. पुर्वीच्या वादातूनच हा खून झाला असावा, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. दरम्यान, एकापाठोपाठ दोन खुनाच्या घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.

घटनास्थळ व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, सुमित कांबळे हा खंडेराजुरीत कुटुंबासह राहतो. तो सध्या सैन्य दल भरतीची पुर्व तयारी करत होता. काही दिवसांपुर्वी खंडेराजुरीत झालेल्या मिरवणूकीत सुमित आणि संशयितांत वाद झाला होता.crim

या वादाची धुसपुस कायम होती. काल रात्री सुमित चौकात थांबला होता. त्यावेळी संशयित आणि त्याच्यात पुन्हा वाद झाला. वाद टोकाला गेल्यानंतर संशयिताने चाकूने सपासप वार केले. त्यातील एक वार वर्मी असल्याने रक्तस्त्राव झाला. त्यातच त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर गावात एकच खळबळ उडाली.

दरम्यान, मिरजेतील शासकीय रुग्णालयात काल रात्री उशीरा उत्तरीय तपासणी करण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ पंचनामा केला. संशयित सूरज आठवलेसह काही जण ताब्यात घेतल्याचे समजते आहे. त्यात अल्पवयीन मुलांचाही सहभाग आहे, असे पोलिसांनी सांगितले. निरीक्षक भैरू तळेकर यांच्यासह पथक घटनास्थळी दाखल होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी पंतप्रधान मोदींना जीवे मारण्याची धमकी, मेलबर्न पोलिसांकडून तपास

IND vs ENG, 2nd T20I: अभिषेक-ईशानची फिफ्टी हुकली, पण तिलक वर्माची दमदार फिनिशिंग, भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध १९० धावा पार

Pune Rain Alert: पुण्यात सलग पावसाची रिपरिप; घाट परिसरासाठी पुढील दोन दिवस ‘रेड’ अलर्ट, प्रशासनाचे नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

Mumbai News: श्वानांचा ९३ नागरिकांना चावा, विधानसभेत मुद्दा गाजला; भटक्या कुत्र्यांसाठी महायुती सरकारचा मोठा निर्णय

Sports Teacher Recruitment : क्रीडा शिक्षक भरती रखडल्याने विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात; आझाद मैदानात ८ जुलैपासून बेमुदत धरणे आंदोलन

SCROLL FOR NEXT