murder of Ajit Pawars aided assistants brother  
पश्चिम महाराष्ट्र

ब्रेकिंग ; अजित पवारांच्या स्वीय सहाय्यकांच्या भावाचा निर्घृण खून ; डोक्‍यात कोयत्याने वर्मी घाव 

सकाळ वृत्तसेवा

भिलवडी (सांगली) : खटाव (ता. पलूस) येथील माजी सरपंच व राष्ट्रवादीचे नेते आनंदराव धोंडिराम पाटील (वय 54) यांचा भरदिवसा धारदार कोयत्याने निर्घृण खून करण्यात आला. दुपारी साडेअकरा ते बाराच्या सुमारास शेतातून घराकडे मोटारसायकलवरून जात असताना हा हल्ला झालाने परिसरात खळबळ उडाली आहे. सांगलीतील शासकीय रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. दरम्यान, आनंदराव यांचे कनिष्ठ बंधू गजानन पाटील (अप्पर जिल्हाधिकारी) हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे स्वीय सहाय्यक आहेत. हल्ल्याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. पोलिस कसून तपास करीत आहेत. दोन संशयित हल्लेखोरांनी दुचाकीवरून येऊन हा हल्ला केल्याचे प्राथमिक तपसात पुढे आले आहे, असे पोलिसांनी सांगितले. 

घटनास्थळावरून व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, की आनंदराव पाटील यांची खटाव-माळवाडी रस्त्यावर द्राक्षबाग आहे. आज सकाळी आनंदराव पाटील नेहमीप्रमाणे द्राक्षबागेत गेले होते. धाकटा मुलगा विश्‍वजितही शेतात आला होता. तेथून दुपारी ते मोटारसायकलवरुन (एमएच 10 एम 7030) घरी परतत होते. गावानजीकच्या गजानन अण्णा पाटील यांच्या शेतानजीक त्यांच्यावर कोयत्याने हल्ला झाला. डोक्‍यात घाव वर्मी बसल्याने ते रस्त्याकडेच्या हरभरा पिकात कोसळले. त्यांची दुचाकी रस्त्याकडेला पडली होती. घाव जोरदार असल्याने ते रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. काही वेळातच त्यांचा मुलगा विश्‍वजित रस्त्यावरून घरी येत असताना येथे आला. त्याला वडील रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले. त्यांना तत्काळ सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्‍टरांनी घोषित केले. घटनास्थळी मोटारसायकल, रक्ताने माखलेला धारदार कोयता, दोन मोबाईल, चष्मा पडलेला होता. घटनास्थळी लोकांची बराच काळ गर्दी केली होती. गावात मात्र शांतता होती. सिव्हील हॉस्पिटल परिसरात मात्र अनेक राजकीय नेत्यांनी कार्यकर्त्यांसह गर्दी केली होती. 

""घटनेनंतर तत्काळ पोलिस घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी पंचनामा करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास कसोशीने सुरू आहे.'' 

-मनिषा दुबुले, अप्पर पोलिस अधिक्षक, सांगली 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Legislative Council election : पुणे विधानपरिषद निवडणुकीत मोठी घडामोड; सुनील टिंगरे यांनी उमेदवारी अर्ज घेतला मागे

Monsoon Update News : आनंदवार्ता ! मॉन्सूनची केरळनंतर कर्नाटकात हजेरी, महाराष्ट्रात 'या' दिवशी दाखल होणार; हवामान विभागाचा नवा अंदाज समोर

कमळीच्या आनंदावर पडणार विरजण! आजोबांच्या मृत्यूचं सत्य अखेर समोर; प्रोमो पाहून प्रेक्षकही दुःखी

Pune Lonavala Railway: 'पुणे-लोणावळा रेल्वेमार्ग फुल्ल!' ८८% क्षमतेने धावणाऱ्या मार्गावर नव्या लोकल फेऱ्यांना ब्रेक, रेल्वे प्रशासनासमोर मोठे आव्हान

Latest Marathi News Live Update : नांदेड जिल्ह्यात मान्सून पूर्व पावसाचे आगमन

SCROLL FOR NEXT