Maruti nagade Sakal
पश्चिम महाराष्ट्र

अनैतिक संबंधातून भेंडवाडच्या एकाचा खून

अनैतिक संबंधाच्या संशयावरून रायबाग तालुक्यातील भेंडवाड येथील युवकाचा खून करून मृतदेह कनॉलमध्ये टाकण्यात आला.

सकाळ वृत्तसेवा

रायबाग - अनैतिक संबंधाच्या संशयावरून रायबाग तालुक्यातील भेंडवाड येथील युवकाचा खून करून मृतदेह कनॉलमध्ये टाकण्यात आला. मारुती नगाडे (वय 25) असे मयताचे नाव आहे. रविवारी (ता. 5) ही घटना उघडकीस आली. या प्रकरणी संशयित आरोपीला अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले.

याबाबत पोलिस ठाण्यातून समजलेली माहिती अशी, भेंडवाड येथील रहिवासी मारुती नगाडे (वय 25) गेल्या चार दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार त्यांच्या कुटूंबियांकडून रायबाग पोलिस स्थानकात केली होती. मात्र रविवारी गोकाक तालुक्यातील कॅनॉलमध्ये बेवारस प्रेत निदर्शनास आले. या वेळी घटनास्थळाला रायबाग पोलिसांनी भेट देऊन चौकशी केली असता सदर मृतदेह मारुती नगाडे याचा असल्याचे निदर्शनास आले.

त्यानुसार पोलिसांनी गावात चौकशी केली असता मारुती नगाडे याचे त्याच गावातील एका महिलेशी अनैतिक संबंध होते. या संशयावरून गावातीलच रहिवासी भीमाप्पा तट्टीमनी याने मारुती नगाडेच्या डोक्यात लोखंडी रॉडने जबरदस्त वार करून त्याचा खून करून मृतदेह गोकाक तालुक्यातील कालव्यात टाकल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले. सदर आरोपीला अटक करून त्याला न्यायालयात हजर करून त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. घटनेची नोंद रायबाग पोलिस ठाण्यात झाली असून रायबाग पोलिस स्थानकाचे मंडल पोलिस निरीक्षक एच. डी. मुल्ला अधिक तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दुष्काळात वगळलेल्या तालुक्यांचाही यादीत समावेश; मंत्रिमंडळ बैठकीत राज्य सरकारचा निर्णय

Central Railway: प्रवाशांनो लक्ष द्या! मध्य रेल्वेवर ७५ दिवसांचा विशेष ब्लॉक, मेल/एक्सप्रेसच्या वेळापत्रकात बदल

Retirement Planning: रिटायरमेंटनंतर आरामात जगण्यासाठी 1.5 कोटी पुरेसे नाही? HDFC पेन्शनच्या अहवालातून मोठा खुलासा

Marathi News Live Updates: १७ डिसेंबरनंतर बघू, सरकारला जरांगे पाटलांचा थेट इशारा; तीन महिन्यांची मुदत संपल्यानंतर पुढची भूमिका काय?

Community Book Bank: ममदापुरात लोकसहभागातून जिल्हा परिषद शाळेत बुक बँक सुरू; ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी अवांतर वाचनाचे नवे दालन

SCROLL FOR NEXT